14 ठिकाणी नदी पातळीमापक केंद्रांची उभारणी अलिबाग : प्रतिनिधी पावसाळ्यात महाड, पोलादपूर परिसराला पूर आणि भुस्खलन अशा आपत्तींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत महाड, पोलादपूर परिसरातील दरडप्रवण क्षेत्रात 26स्वयंचलित पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. तर 14 ठिकाणी स्वयंचलित नदीपातळी मापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. …
Read More »खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची कसरत
नदीच्या पाण्यातून नेले लोखंडी खांब; कर्मचार्यांची कार्यतत्परता कर्जत : बातमीदार मुसळधार पावसात खोपोली-कर्जत मार्गालगतचे चार खांब कोसळमुळे कर्जत तालुक्यातील पळसदरी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचार्यांनी पावसातही नवीन लोखंडी खांब नदीपलिकडे नेऊन उभे केल्यावर तीन दिवसानंतर त्या भागातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. महावितरण कर्मचार्यांच्या धाडस व मेहनतीचे कौतुक होत …
Read More »ग्रामरक्षक सुरक्षादल होणार पोलिसांचा ‘तिसरा डोळा’
अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत मापगावमध्ये पहिले दल स्थापन अलिबाग : प्रतिनिधी कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम पोलीस यंत्रणा करीत असली तरी ती प्रत्येक गावाला सुरक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे आपले गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तरुणांनी उचलणे महत्त्वाचे आहे. यासाठी पोलीस विभागाकडून प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत ग्रामरक्षक सुरक्षादल स्थापन केले जात आहे. …
Read More »अलिबागच्या कलाकारांनी साकारलेला चित्रपट आषाढ
अलिबाग : रामप्रहर वृत्त अलिबागच्या कलाकारांनी संपूर्णतः अलिबागमध्येच बनवलेला आषाढ हा पूर्ण लांबीचा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीस येऊ घातला आहे. मनिष अनसुरकर निर्मित, लिखीत व दिग्दर्शित आषाढ या चित्रपटाचा ट्रेलर, आषाढी एकादशी निमित्त विविध समाज माध्यमांवर प्रदर्शित होत आहे. अलिबाग परिसरातील चौल, नागावसारख्या निसर्गरम्य परिसरात चित्रीत केलेला आषाढ हा चित्रपट …
Read More »मोहोप्रे गावात जनावरांसाठी लसीकरण शिबिर
महाड : प्रतिनिधी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न आचळोली कृषी महाविद्यालय आणि महाड पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोप्रे येथे 29 जून रोजी जनावरांचे विशेष रोगप्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 308 पशुधनांचे लसीकरण करण्यात आले. वातावरणातील बदल, आद्रता, पाऊस यामुळे जनावरांना घटसर्प, …
Read More »मेक कळसगिरी मोअर ग्रीन उपक्रमाला रोह्यातील संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन नुकताच मेक कळसगिरी मोअर ग्रीन हा उपक्रम राबविला. या वेळी सुमारे 65 जणांनी तांबडी सवाणे परिसरात प्रत्येकी दिडशे बियांची लागवड केली. त्यामुळे अंदाजे दोन हजार झाडे रूजतील व कळसगिरी हिरवागार होण्यात मदत होईल असा अंदाज आहे. सह्याद्रीच्या रांगांतील कळसगिरीला अधिक हिरवेगार करण्याच्या …
Read More »नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलल्याने कडाव परिसरातील शेती पाण्याखाली
कर्जत : बातमीदार तालुक्याच्या कड़ाव भागातील एका फार्महाऊस मालकाने मातीचा भराव करून नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलल्याने स्थानिकांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतात उगवलेली भाताची रोपे कुजून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील कडाव परिसरातील सर्वे नंबर 83/2 या जमिनीत काही महिन्यांपुर्वी मातीचा भराव करण्यात आला आहे. हा भराव …
Read More »चुकीच्या धोरणांमुळे सहकारी बँका अडचणीत येतात -सतीश मराठे
जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाच्या अलिबाग कार्यालयाचे उद्घाटन अलिबाग : प्रतिनिधी ढिसाळ व्यवस्थापन, चुकीची धोरणे, व्याजदर ठरवण्यातील समस्या, मार्केटींगकडे दुर्लक्ष यामुळे सहकारी बँका व पतसंस्था अडचणीत येतात, असे मत रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अलिबाग येथे स्वमालकीचे नवीन कार्यालय घेण्यात आले …
Read More »द्रुतगती मार्गावर खोल दरीत कार कोसळली; तीन जण गंभीर जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी बोरघाट उतरताना आडोशी गावाच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (दि. 8) दुपारी इरटीका कार द्रुतगती मार्गाच्या लोखंडी पट्टीचे संरक्षक कठडे तोडून 40 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इरटीका कार (टीएस 08,जीएन-1219) द्रुतगती …
Read More »म्हसळा तालुक्यात संततधार
आठवड्यात 611 मिमी पावसाची नोंद; बळीराजा गुंतला शेतात म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. चालू हंगामात पाऊस उशीरा सुरू झाला असला तरी त्याने मागील वर्षाची सरासरी गाठली आहे. म्हसळा तालुक्यात आजपर्यंत एकूण 1094 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात गेल्या आठवड्यात 611 मिमी पाऊस …
Read More »