Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नदीतील गाळ काढण्याचा खर्च भार शासनाला सोसेना

 मागेल त्याला गाळ देण्याचा निर्णय; कोकण महसूल विभागाच्या सचिवांनी दिला आदेश महाड ः प्रतिनिधी महाप्रलयकारी पुरामुळे 21 ते 23 जुलै 2021 मध्ये कोकणातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याला मोठा पुराचा तडाखा बसला होता. पुन्हा पावसाळ्यात पूर स्थिती येऊ नये यासाठी खाडी व नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले होते. मात्र नदीपात्रातील …

Read More »

शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या वक्तव्याचा कर्जत भाजपकडून निषेध

कर्जत : बातमीदार भ्रष्टाचार्‍यांचे कर्दनकाळ भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटक करावी यासाठी 7 एप्रिल रोजी शिवसेनेने कर्जत येथे आंदोलन केले. त्या वेळी स्थानिक शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. आमदार थोरवे यांच्या या वक्तव्याचा …

Read More »

मुरूडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

मुरूड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरूड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी अचानकपणे आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्याकडे दिले आहेत. कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप दांडेकर यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री, खासदार व आमदार असतानासुद्धा शासकीय कार्यालयात राष्ट्रवादीच्या …

Read More »

आम्ही कधीच जमिनीची दलाली केली नाही

शेकापच्या जयंत पाटीलांकडून सुनील तटकरेंवर टीकास्त्र; फसवणुकीचा बदला घेण्याचा इशारा धाटाव : प्रतिनिधी आम्ही जमिनीची दलाली कधी केली नाही. ज्यांनी केली त्यांच्याकडे पैसे कुठून आले याची चौकशी लावणार असल्याचा इशारा शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांना रोहा तालुक्यातील मेढा येथे दिला. रोहा तालुक्यातील …

Read More »

भाजप युवती मोर्चा मुरूड तालुका अध्यक्षपदी भाविका किल्लेकर

मुरूड : प्रतिनिधी भाजप युवती मोर्चा मुरूड तालुका अध्यक्षपदी भाविका परेश किल्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाविका किल्लेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष परेश किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भाविका …

Read More »

मिठेखार ग्रामपंचायत उपसरपंचपदी जीवन सुतार यांची बिनविरोध निवड

रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात भाजपची पहिली ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या मिठेखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जीवन सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. योगेश पाटील यांनी राजीनामा दिल्याने मिठेखार ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद रिक्त झाले होते. ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सुवर्णा चवरकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. या वेळी भाजपचे जीवन सुतार यांची …

Read More »

रायगडात ऊन अन् पाणीटंचाईच्या झळा

अलिबाग : प्रतिनिधी एकीकडे वाढता अंग पोळून काढणारे ऊन तर दुसरीकडे वाढती पाणीटंचाई असा दुहेरी त्रास सध्या रायगडकर सहन करीत आहे. उकाड्या सोबत पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यातील जनतेला सोसाव्या लागत आहेत. रायगडात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडत असला तरी एप्रिल आणि मे या दोन महिन्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी तळ गाठते. नदी, धरणातील …

Read More »

नादुरूस्त ई-पॉस मशीन व इंटरनेट अभावी सुधागडात धान्य मिळविताना अडचणी

शिधापत्रिका धारक व दुकानदारांमध्ये खटके; रास्तभाव दुकानदार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन पाली : प्रतिनिधी नादुरूस्त ई-पॉस मशीन तसेच इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे सुधागड तालुक्यातील रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत आहेत. परिणामी शिधापत्रिका धारकांना धान्य मिळवितांना अडचण निर्माण होत आहेत. दुकानदारांचीदेखील गैरसोय होत आहे. परिणाम शिधापत्रिका धारक व …

Read More »

भाजप आदिवासी मोर्चा कर्जत तालुका अध्यक्षपदी माथेरानचे संदीप कदम

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्ष आदिवासी मोर्चाचे कर्जत तालुका अध्यक्ष पदी माथेरानचे माजी नगरसेवक संदीप कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेरळ येथे झालेल्या भाजप तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत कदम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची  बैठक नेरळ येथे झाली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा …

Read More »

‘आरसीएफ‘कडून मच्छिमारांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आमदार रमेश पाटील यांची केंद्रीय रसायन मंत्री यांची भेट

मुरूड : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्त बाधित मच्छीमार बांधवांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. (आरसीएफ) कडून न्याय व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजप आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय रसायन व खत मंत्री भगवंत खुबा यांच्याकडे केली. रायगड जिल्ह्यातील थळ व नवगाव येथील  आरसीएफ कंपनीच्या प्रकल्पामुळे …

Read More »