Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

निजामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहासाठी जागा द्यावी

माणगाव प्रांताधिकारी दिघावकर यांना निवेदन   माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुउद्देशीय सभागृह उभारणीसाठी शासकीय जमीन मिळावी, यासाठी प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर निवेदन देण्यात यांना प्रांताधिकारी कार्यालय माणगाव येथे सोमवारी (दि.18) सकाळी निवेदन देण्यात आले. या वेळी बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज रवींद्र तांबे, …

Read More »

रोह्यात पं.स. शिक्षण विभागात 93 पदे रिक्त

पाच वर्षे गट शिक्षणाधिकारीविनाच तालुक्यात कारभार   रोहे : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. चांगले विद्यार्थी घडावेत, हा या मागचा उद्देश आहे, परंतु रोहा तालुक्यात गेले पाच वर्ष गटशिक्षणाधिकारी पदच भरले गेले नाही. गेले पाच वर्ष शिक्षण विस्तार अधिकारी हा विभाग सांभाळत आहेत. रोहा पंचायत …

Read More »

माथेरान दस्तुरी नाका येथील पर्यटक मार्गदर्शन केंद्र बंद

कर्जत : बातमीदार माथेरान या पर्यटनस्थळी येणार्‍या पर्यटकांना माथेरान पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी माथेरान गिरिस्थान नगर परिषदेने माहिती केंद्र बनविले आहे. हे माहिती केंद्र बंद असून यामुळे माथेरानमध्ये पहिल्यांदा पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांची गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. माथेरान या वाहनांना बंदी असलेल्या पर्यटनस्थळी पर्यटकांना वाहनतळावर उतरल्यानंतर पर्यटनस्थळांची माहिती देणारे …

Read More »

आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेत नेरळ महाविद्यालयाला सुवर्णपदक

कर्जत : बातमीदार मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालय रग्बी स्पर्धेत नेरळ येथील मातोश्री टिपणीस वरिष्ठ महाविद्यालयाने मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकाविले. मुंबई विद्यापीठाची रग्बी स्पर्धा 12 ते 16 एप्रिल या कालावधीत कल्याण येथील बिर्ला कॉलेज येथे झाली. या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी नॅशनल स्पर्धेत नेरळ येथील विद्या मंदिर मंडळाच्या मातोश्री सुमती टिपणीस …

Read More »

पॉवरलिफ्टर अमृता भगतचा सत्कार

कर्जत : बातमीदार नेरळजवळील शेलू गावातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी अमृता ज्ञानेश्वर भगत हिने केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तिच्या या यशाबद्दल शेलू येथील घरी जाऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य संघाकडून राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतील क्लासिक गटाच्या वयोगट 47 ते 52 किलो वजनी गटात राज्याचे …

Read More »

आदिवासी कुटूंबांची शासनाकडून फसवणूक; जमीन कागदोपत्री; घरे-रस्त्याचा मात्र पत्ताच नाही!

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतमधील कळंबोली येथील आदिवासी कातकरी समाजाच्या कुटुंबांना शासनाच्या वन हक्क कायद्याखाली जमिनी देण्यात आल्या होत्या. त्या जमिनींचे हस्तांतरण त्या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले होते, मात्र 2015पासून आजपर्यंत ही आदिवासी कुटुंबे आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. दरम्यान, कळंबोली …

Read More »

महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडिता गर्भवती

महाड ः प्रतिनिधी एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने यातून ही मुलगी गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील कोतूर्डे आदिवासीवाडीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कोतूर्डे आदिवासीवाडीतील 15 वर्षांच्या अल्पवयीन …

Read More »

नाराज सुरेश लाड काय निर्णय घेणार?; पुढील भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

खोपोली ः प्रतिनिधी कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी दुसर्‍यांदा राजीनाम्या दिल्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते घायाळ झाले असून पदाधिकार्‍यांमार्फत लाड यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे, पण लाड हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सध्या तरी रायगड जिल्हा राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे …

Read More »

रोशन खडे ठरला ‘खोपोली श्री’चा मानकरी

खापोली ः प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीपक ब्रदर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकी गायकवाड आणि पदाधिकार्‍यांच्या पुढाकारातून रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन आणि खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने या वर्षीही खोपोली श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि. 16) करण्यात आले होते. स्पर्धेत चार वेगवेगळ्या गटांत …

Read More »

महाडमध्ये अर्ध मॅरेथॉन, क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

महाड ः प्रतिनिधी वेदा जनजागृती मंचच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक धाव शहीदांसाठी ही हाफ मॅरेथॉन आणि राजमाता महिला क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांचे बक्षीस वितरण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या बक्षीस वितरण समारंभास पद्मश्री पुरस्काराने सन्मानित महाडचे …

Read More »