मुरूड : प्रतिनिधी शहरातील शेगवाडा परिसरातील क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव अथवा ठराव शिवसेनेच्या काळात झालेला नाही, तो त्या पूर्वीच्या काळात झाला असून या घटनेशी आमचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा मुरूडच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. शहरातील शेगवाडा परिसरात क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलून …
Read More »महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे खालापूर तहसीलदारांना निवेदन
खोपोली : प्रतिनिधी भटके विमुक्त जाती जमातीच्या शासकीय पदोन्नतीमधील आरक्षण सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ खोपोली शहर भाजपच्या भटके-विमुक्त सेल तर्फे खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांना निवेदन देण्यात आले. भाजपचे खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, भाजप भटके-विमुक्त अध्यक्ष संतोष लोहार, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंदुलकर, …
Read More »सब भूमी गोपालकी! सरकारचे राष्ट्रीय भूमीधोरण आवश्यक
विविध प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनींची उपलब्धता सहज सुलभ होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भूसंपादन कायद्यात होऊ घातलेले बदल देशवासीयांचा सातबारा उतारा हे भाडेकराराचे पत्र असावे आणि शेतसारा हा भाडेपावतीचा कागद ठरावा, असे चित्र उभे करीत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका महसूल विभागाची असून या महसूल विभागांतर्गत भूमिअभिलेख विभागासह नोंदणी विभागामध्येदेखील होणारे बदल …
Read More »अलिबागेत दोन ट्रकची समोरासमोर ठोकर, एकजण जखमी
अलिबाग : प्रतिनिधी येथील आरसीएफ कॉलनीजवळ बुधवारी (दि. 13) दोन ट्रकची समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात एका ट्रकचा चालक जखमी झाला. त्याच्यावर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. उसर येथून एचपी गॅस घेऊन ट्रक चालक हा बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास …
Read More »द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा बर्निंग थरार
खोपोली, खालापूर, मोहोपाडा : प्रतिनिधी मुबंई-पुणे द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री बाराच्या सुमारास एका आयशर टेम्पोने अचानक पेट घेतला. या घटनेत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. मुबंईकडून पुण्याकडे जाणारा आयशर टेम्पो काही तांत्रिक बिघाड असल्याने महामार्गावरील रसायनी हद्दीत बंद पडला होता. पोलिसांच्या गस्ती पथकाने त्या टेम्पोला एका बाजुला करुन बँरिगेट्स लावले होते. …
Read More »नेरळकर पीत आहेत गढूळ पाणी
जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याचा परिणाम कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ गेल्या काही दिवसापासून गढूळ पाणी पीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर साथीच्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. नेरळ पूर्व भागात गढूळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चादेखील नेला होता. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणार्या योजनेतील …
Read More »कोर्टाची जनजागृती बाईक रॅली
पेण : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण देशात जागरूकता आणि संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ हे घोषवाक्य घेऊन पेण न्यायालयाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती. पेण न्यायालयाच्या न्या. आर. एन. मुजावर व सहदिवाणी न्या. पी. सी. …
Read More »नेरळमधील शिबिरात पाचशे महिलांचे लसीकरण
कर्जत : बातमीदार मिशन कवच कुंडल मोहिमेंतर्गत कर्जत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात सोमवारी (दि. 11) तब्बल 26 ठिकाणी लसीकरण शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंगेश म्हसकर मित्र मंडळाच्या वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नेरळ गावात सोमवारी महिलांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. त्या वेळी …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेणमध्ये भाजपचे बूथ जनसंपर्क अभियान
पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेणमध्ये भाजपच्या जनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत वढाव पंचायत समिती गणाची बैठक नुकतीच वढाव येथे झाली. भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी बूथ प्रमुखाची फार महत्त्वाची भूमिका असते, असे मत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी या वेळी व्यक्त केले. …
Read More »पेणमध्ये तलाठ्यांचे धरणे आंदोलन
पेण : प्रतिनिधी ई-महाभूमी प्रकल्प राज्य समन्वय अधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संवर्गासंदर्भात असंवैधानिक शब्द वापरल्यामुळे तलाठी वर्गात संताप उसळला आहे. पेणमधील तलाठी संघटनेने सोमवारी (दि. 11) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जगताप यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. तलाठी संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष आर. जे. सूर्यवंशी, उपाध्यक्ष एस. एल. विधाते, …
Read More »