जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी सर्व शासकीय कर्मचार्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि. 29) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांचे वतीने एक तासाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी …
Read More »नेरळमध्ये पर्यावरणपूरक आकाशकंदिल
दिवाळीनिमित्त महिला बचत गटांचे विविध उपक्रम कर्जत : बातमीदार नेरळ येथील यशवंती महिला बचत गटाच्या सदस्यांनी दिवाळी सणासाठी आकाशकंदिल बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. रोजगार निर्मिती म्हणून बनवलेले हे पर्यावरणपूरक कंदिल उल्हासनगर आणि कल्याण येथील बाजारात ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. नेरळ येथील रणरागिणी महिला बचत गटाच्या अध्यक्ष वर्षा बोराडे यांनी …
Read More »विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे -राम मोहिते
वळके हायस्कूलच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन रेवदंडा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते गाठण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जेएसडब्ल्यू कंपनीचे सिएसआर विभाग प्रमुख राम मोहिते यांनी बुधवारी (दि. 27) वळके येथे केले. साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या सामाजीक दायित्व विभागाच्या वतीने कोएसोच्या वळके येथील नारायण कमळ्या गायकर माध्यमिक शाळेत नवीन प्रयोगशाळा उभारण्यात …
Read More »पर्यावरण जनजागृतीसाठी मुरूडमध्ये पथनाट्य, सायकल रॅली
मुरूड : प्रतिनिधी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण जनजागृतीसाठी मुरूड शहरात गुरुवारी (दि. 28) नगर परिषदेतर्फे पथनाट्ये सादर करण्यात आली. या वेळी सायकल रॅलीही काढण्यात आली होती. मुरूड नगर परिषदेतर्फे गुरुवारी शहरातील बाजारपेठेत पथनाट्ये सादर करण्यात आली. वायुप्रदुषण आणि आजारी व्यक्तींना त्रास होऊ नये, यासाठी येणार्या दिवाळीमध्ये …
Read More »चला मतदार यादीत नाव नोंदवू…
मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2022 या दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या मोहिमेविषयी माहिती… भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर …
Read More »राज्यसभा सदस्य समितीची अलिबागला भेट
अलिबाग : प्रतिनिधी राज्यसभा व उपविधान समिती महाराष्ट्राच्या पाच दिवसांच्या दौर्यावर आली आहे. गुरुवारी (दि. 28) या समितीने अलिबागला भेट दिली. अलिबाग समुद्रकिनारी जल प्रदूषणाबाबत असणार्या कायद्याचे पालन प्रशासनाकडून केले जात आहे की नाही, याबाबत या समितीने पाहणी केली. या वेळी समितीने कुलाबा किल्ल्यालाही भेट दिली. राज्यसभेच्या बारा खासदारांचा समावेश …
Read More »कर्जत आगारातून एकही बस धावली नाही
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्जत आगारातील सर्व कार्मचार्यांनी गुरुवारी (दि. 28) काम बंद आंदोलन केले. त्यामुळे कर्जत आगारातून एकही एसटी गाडी बाहेर पडली नाही. राज्यातील एसटी कामगारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली आहे. वेतनवाढ आणि राज्य शासनात विलिनीकरण …
Read More »रायगड विभागात एसटी कर्मचार्यांचा बंद
अनभिज्ञ प्रवासी बसच्या प्रतीक्षेत अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या टाळेबंदीत सहा महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. आता कुठे लालपरी सर्व मार्गांवर पूर्ण क्षमतेने धावत होती, तितक्यात पगारवाढीसह इतर मागण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर गेले. परिणामी रायगडात गुरुवारी (दि. 28) प्रवाशांचे हाल झाले. संपाबाबत अनभिज्ञ असलेले प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत उभे असलेले पहायला …
Read More »विनामास्क फिरणार्यांवर होणार कारवाई
पाली नगरपंचायतीचा इशारा पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू आहे. मात्र मास्क न घालणार्या व कोरोना नियमांचे पालन न करणार्यांवर दंडात्मक करवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे प्रशासक दिलीप रायण्णावार यांनी बुधवारी (दि. 27) दिली. धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत, …
Read More »पारंपरिक पणत्यांबरोबर चायना मेड पणत्याही बाजारात दाखल
पेण : प्रतिनिधी दिपावली म्हणजे दिव्यांचा सण, म्हणजे अंधःकारातून उजेडाकडे नेणारा तेजोमय सण. या सणात अंधःकारालाही प्रकाशमय करणार्या पारंपरिक मातीच्या पणत्या पेण बाजारपेठेत दाखल झाल्या असून, यामध्ये चायनीज पणत्यांचेही आक्रमण झालेले दिसत आहे. दीपावली उंबरठ्यावर आली असून पेणच्या कुंभारवाड्यात बनविण्यात येणार्या पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर चायनीज पणत्यांही बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या …
Read More »