Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माणगाव बसस्थानकाची दुरवस्था; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

प्रवासी संतप्त, भाजपचा आंदोलनाचा इशारा माणगाव : प्रतिनिधी माणगाव बसस्थानकात प्रचंड खड्डे पडले असून, या समस्येकडे गेल्या अनेक वर्षापासून राज्य परिवहन (एसटी) महामंडळ दुर्लक्ष करीत आहे. पालकमंत्री व स्थानिक आमदार आदिती तटकरे बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे लक्ष देतील काय, असा सवाल प्रवासी व नागरिक उपस्थित करीत आहेेत. दरम्यान, या बस्थानकातील रस्त्याचे काम …

Read More »

प्रेषिता तरेची राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेसाठी निवड

पाली ः प्रतिनिधी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 47वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा 19 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत बंगळुरू येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी बेणसे येथील प्रेषिता दत्ताराम तरे हिची निवड झाली आहे. स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पुणे डेक्कन जिमखाना जलतरण तलावात खुली निवड चाचणी घेण्यात …

Read More »

प्रदीर्घ संघर्षांनंतर मिळविलेले यश रोमहर्षक -आमदार प्रशांत ठाकूर; रोठ बुद्रकमध्ये ग्रामसचिवालयाचे उद्घाटन, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

धाटाव ः प्रतिनिधी रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर आलेले सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर मिळविलेले यश हे रोमहर्षक असल्याचे त्यांच्या भावनेतून दिसून येते. या यशासाठी त्यांनी 25 वर्षे त्यांच्या विरोधकांविरुद्ध लढा दिला. हे करीत असताना त्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला. प्रसंगी गुन्हे दाखल होऊन तुरूंगात जावे लागले, मात्र …

Read More »

महाडमध्ये कोरोनाचा विसर; मंत्र्यांच्या उपस्थितीत गर्दी आणि धक्काबुक्की

महाड ः प्रतिनिधी महाड नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. 16) पार पाडला. या वेळी झालेली गर्दी आणि धक्काबुक्की पाहता पालिकेलाच कोरोनाचा विसर पडल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, या सोहळ्यास आलेल्या तीन मंत्र्यांनी महाडकरांना केवळ दिवाळीच्या कोरड्या शुभेच्छा, तर तटकरेंना कानपिचक्या दिल्या. महाड पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज नवीन …

Read More »

अलिबागेत अल्पवयीन मुलीला देहविक्रीला लावण्याचा प्रयत्न; फार्महाऊस मालक, महिलांसह चौघांना अटक

अलिबाग : प्रतिनिधीघरातून पळालेल्या अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने देहविक्रीच्या नरकात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार अलिबाग तालुक्यात उघडकीस आला आहे, मात्र या मुलीने अत्यंत हुशारीने या नराधमांच्या तावडीतून पळ काढत मांडवा सागरी पोलीस ठाणे गाठले आणि स्वतःची सुटका करून घेतली. या प्रकरणी दोन महिला व एका फार्महाऊस मालकासह चौघांना …

Read More »

रोह्यात श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव

सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना रोहे : प्रतिनिधी ग्रामदैव श्री धावीर महाराज पालखी उत्सवाला शनिवारी (दि. 16) पहाटे सुरुवात झाली. मंदिरात  धार्मिक विधी, पूजा, आरती झाल्यानंतर रायगड पोलीस दलाच्या वतीने रोह्याचे निरीक्षक संजय पाटील आणि  पोलीस पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र सलामी दिली. पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, भाजप उत्तर …

Read More »

शिवभक्तांनी बांधले अलिबागच्या कुलाबा किल्ल्याला तोरण

अलिबाग : प्रतिनिधी इतिहासाची साक्ष म्हणून अलिबाग समुद्रात उभा असलेल्या कुलाबा किल्ल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी (दि. 15) शिवभक्तांनी गोंड्याच्या फुलांचे तोरण बांधले. तसेच किल्ल्यातील तोफांचेही यथासांग पूजन केले. अलिबागमधील गडवाट प्रवास सह्याद्रीचा, स्वराज्याचे शिलेदार, मावळा प्रतिष्ठान या संस्थांचे सदस्य दरवर्षी कुलाबा किल्ल्याला तोरण बांधून आणि शस्त्रपूजन करून दसरा सण साजरा …

Read More »

देशभक्ती रूजविण्याचे काम रा.स्व.संघ करतो -सुजित टिळक

खोपोलीत विजयादशमी उत्सव साजरा खोपोली : प्रतिनिधी प्रत्येक भारतीयाच्या मनात शाखेच्या माध्यमातून देशभक्ती रुजविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. शतक किंवा शतकोत्तर सोहळे साजरे करण्यात संघाला स्वारस्य नाही, तर हा देश लवकरात लवकर परम वैभवाला नेऊन समाज व संघ कसा एकरूप होईल हे संघाचे उद्दिष्ट स्वयंसेवकाला पहावयास आवडेल, असे …

Read More »

रस्त्यासाठी आदिवासींचा रास्ता रोको

नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर आंदोलन कर्जत : बातमीदार वन जमिनीच्या अडथळ्यामुळे माथेरानच्या डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्यांना जाणारा रस्ता रखडला आहे. वर्षानुवर्षे रस्त्याची मागणी पुर्ण होत नसल्याने या पाच आदिवासी वाड्यांमधील लोकांनी शनिवारी (दि. 16) नेरळ-माथेरान घाटरस्त्यावरील वाहतूक अर्धा तास बंद पाडली. या वेळी महिलांनी आदिवासी नृत्य करीत आंदोलन अधिक काळ टिकवून ठेवले. …

Read More »

रोह्यात आज विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ ब्रुदुक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन व जलशुद्धीकरण आरओ प्लांटचे भूमिपूजन शनिवारी (दि. 16) सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार …

Read More »