Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

सुधागडात आरोग्यदायी कंदमुळांचे भरघोस उत्पादन

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात सध्या आरोग्यदायी विविध कंदमुळांचे भरघोस उत्पादन मिळत आहे. आदिवासी बांधव तालुक्यातील विविध ठिकाणी कणक, करंदे, चाई, आळू, वरा, लोंढी व रताळी आदी कंदमुळांची विक्री  करताना दिसत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाव कमी मिळत असला तरी यातून आदिवासींना  चांगला रोजगार मिळत आहे. सुधागड तालुक्यातील बहुतांशी …

Read More »

कर्जतमध्ये बालोत्सवाचा शुभारंभ

चिमुरड्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नांगुर्ले येथे शिबिर कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील बालकलाकारांना हक्काचं व्यासपीठ देणार्‍या उत्कर्ष इव्हेंट्स आयोजित बालोत्सव 2021 चा मंगळवारी (दि. 9) शुभारंभ करण्यात आला. हा बालोत्सव चार दिवस चालणार असून, त्याला चिमुरड्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बालोत्सवानिमित्ताने कर्जत तालुक्यातील नांगुर्ले येथील जुरासिक फार्ममध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन  …

Read More »

माणगाव शहरात चोरी; पाच लाखांचे दागिने घेऊन चोरटे पसार

माणगाव : प्रतिनिधी शहरातील इशरत प्लाझा बिल्डींगमधील एका घरातील पाच लाख 20 हजार 50 रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने चोरून  अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी घडली. विजय दत्तू सत्वे (वय 49, रा. इशरत प्लाझा, बी विंग, रूम नं. 411, कचेरी रोड, माणगाव) यांच्या  उघड्या दरवाजातून मंगळवारी …

Read More »

रस्त्याअभावी गरोदर आदिवासी महिलेची परवड

आसलवाडीतील बेबी दरवडा यांचा डोलीतून प्रवास कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांपर्यंत पोहचण्यासाठी  रस्ता सुस्थितीत नसल्याने वाहने ये-जा करू शकत नाहीत. त्यामुळे आसलवाडीमधील एका गरोदर महिलेला बुधवारी (दि. 10) डोली करून जुम्मापट्टीपर्यंत न्यावे लागले. माथेरानच्या पायथ्याशी 12 आदिवासी वाड्या असून त्या वन जमिनीवर वसल्या आहेत. या वाड्यांपर्यंत …

Read More »

माथेरान शटलसेवेत वाढ

माथेरान : प्रतिनिधी मध्य रेल्वेने माथेरान ते अमनलॉज या शटलसेवेच्या  फेर्‍यांत वाढ केली आहे. माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून, पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेस अनेक प्रवाशांना माथेरान ते अमनलॉज शटलसेवेचे तिकीट उपलब्ध होत नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सोमवारपासून शटलसेवेच्या फेर्‍यांत वाढ केली आहे. त्यामुळे …

Read More »

हा एसटीची मालमत्ता हडप करण्याचा डाव

अ‍ॅड. महेश मोहिते यांचा ठाकरे सरकारवर आरोप; संपकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत भाजप संघर्ष करणार पेण : प्रतिनिधी महामंडळास डबघाईस आणून एसटीची कोट्यावधींची मालमत्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव असून, त्यासाठी कर्मचार्‍यांना वेठीस धरून आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे गरीब एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे, असा आरोप भाजपचे …

Read More »

वाकण-खोपोली राज्य महामार्ग जमीन अधिग्रहण; बाधित शेतकर्‍यांची उच्च न्यायालयात धाव, जनहित याचिका दाखल

पाली : प्रतिनिधी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गासाठी करण्यात आलेल्या जमीन अधिग्रहणाबाबत बाधित शेतकर्‍यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका (21600/2021) दाखल केली आहे. भूसंपादन प्रक्रियेत बाधित शेतकर्‍यांना योग्य तो मोबदला व जलद नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्ग बेकायदा जमीन अधिग्रहण संदर्भात बाधित शेतकरी सचिन गजानन …

Read More »

महाडमधील शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा धरणे आंदोलन, किसान क्रांती संघटनेचा इशारा

महाड : प्रतिनिधी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फळ पीक आणि भात पिकाचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना विम्याची रक्कम आणि शासकीय नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळाली नाही तर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष तुकाराम देशमुख यांनी  पत्रकार परिषदेत दिला. या वेळी …

Read More »

पालीत प्रवाशांची गैरसोय व खोळंबा

पाली : रामप्रहर वृत्त एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे दिवाळीची सुट्टी संपून निघालेले प्रवाशी व चाकरमान्यांचे पुरते हाल होत आहेत. एसटी बंद असल्याने सुधागडातील प्रवाशांना मंगळवारी (दि. 9) खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. मात्र अनेक खाजगी वाहतूकदार अव्वाच्या सव्वा दर लावून प्रवाशांची लूट करताना दिसत होते. वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील अनेक बस थांबे …

Read More »

संपामुळे दुसर्‍या दिवशीही लालपरी आगारातच; खाजगी वाहतूकदारांची चांदी, प्रवाशांच्या खिशाला चाट

अलिबाग : प्रतिनिधी सन्मान्य तोडगा न निघाल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा संप सलग दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि. 9) सुरूच राहिला आहे. त्यामुळे एरव्ही गजबजलेल्या आगारांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट पहायला मिळत होता. त्यामुळे एसटीने नियमित प्रवास करणार्‍यांची मात्र मोठी गैरसोय झाली आहे. त्यांनी आपला मोर्चा खाजगी प्रवासी वाहतूकीकडे वळवला आहे. एसटीच्या रायगड विभागातील सर्व …

Read More »