Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खालापूर नगरपंचायत निवडणुकीची प्रतीक्षा

नऊ महिने लोकप्रतिनिधींशिवाय कारभार खोपोली : प्रतिनिधी कोरोनामुळे मुदत संपल्यानंतरदेखील निवडणूक होऊ न शकल्याने खालापूर नगरपंचायतीचा कारभार गेल्या नऊ महिन्यांपासून लोकप्रतिनिधींशिवाय सुरू आहे. खालापूर नगरपंचायतीचा पाच वर्षाचा कालावधी जानेवारी 2021 मध्ये पूर्ण झाला. तत्पूर्वी नोव्हेंबर 2020मध्ये नगरपंचायतीच्या 17 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक होण्याची चिन्हे होती. राजकीय …

Read More »

पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांची बदली

पोलादपूर : प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांची सातारा येथे बदली झाली आहे. पोलादपूर तालुका कृषी कार्यालयामधील कर्मचार्‍यांनी त्यांना नुकताच निरोप दिला, त्या वेळी धुमाळ यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कैलास धुमाळ हे गेल्या तीन वर्षांपासून पोलादपूर तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. महाड उपविभागीय कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील …

Read More »

माथेरानमध्ये घोड्यांच्या आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

कर्जत : बातमीदार अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (नागपूर), पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ, मुंबई), तसेच माथेरान नगर परिषद व स्थानिक अश्वपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरानमधील टेनिस कोर्ट येथे घोड्यांची आरोग्य तपासणी आणि नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 16 घोड्यांची …

Read More »

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांचे आवाहन खोपोली : प्रतिनिधी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या शक्यतेमुळे गणेशोत्सवात नियमांचे पालन करा, असे आवाहन खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी बुधवारी (दि. 1) खालापूर येथे केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खालापूर येथील नेताजी पालकर सभागृहात बुधवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी …

Read More »

जवान धीरज साळुंखे यांच्यावर अंत्यसंस्कार

पोलादपूर : प्रतिनिधीतालुक्यातील धीरज शाम साळुंखे या जवानाचा बुधवारी (दि. 1) दिल्ली येथे लष्करी इस्पितळात तर सचिन चिकणे या जवानाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. धीरज यांच्या पार्थिवावर लोहारे (ता. पोलादपूर) येथे गुरूवारी (दि. 2) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी दोन्ही जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.दिल्ली येथील लष्करीतळामध्ये जवान धीरज साळुंखे …

Read More »

महावितरणच्या पाली कार्यालयात घंटानाद आंदोलन; वीजसमस्यांबाबत मनसे आक्रमक, राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील जनता मागील कित्येक वर्षापासून वीजसमस्येने हैराण झाली आहे. अनियमित वीजपुरवठा आणि वाढीव बिले यामुळे येथील जनतेत असंतोष खदखदत होता. वारंवार खंडित होणारी वीज व तालुक्यातील पथदिवे चालू करण्यात आले नाहीत, याकडे लक्ष वेधण्यासाठी सुधागड मनसेतर्फे गुरुवारी (दि. 2) पाली महावितरण कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले. …

Read More »

भाजपतर्फे माथेरानमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर

माथेरान : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या माथेरान मंडळाने नुकताच   हॉटेल रंगोली येथे मोफत नेत्र तपासणी आणि आधार कार्ड दुरुस्ती शिबिर आयोजित केले होते. त्याचा लाभ सुमारे पाचशे नागरिकांनी घेतला. रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश …

Read More »

पोसरी-साळोख रस्त्याची दुरवस्था; गणेेत्सोवापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी

कर्जत : बातमीदार स्थानिक आमदारांच्या पोसरी गावासमोरून साळोख गावाकडे जाणारा सहा किलोमीटर लांबीचा रस्ता खड्डेमय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त केला नसल्यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत. कर्जत तालुक्यातील पोसरी-साळोख या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सात गावे …

Read More »

गरज सरो आणि वैद्य मरो!

करोनाचा उद्रेक सुरू झाल्यावर शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात हजारो अधिकारी, कर्मचार्‍यांना नियुक्त केले होते. आता करोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने डॉक्टर वगळता इतर कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोराना उद्रेकाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता इमानेइतबारे सेवा देणार्‍या आरोग्य विभागातील या कंत्राटी कर्मचार्‍यांची सेवा …

Read More »

माणगाव स्टेशनमधील समस्या सोडवाव्यात

रेल्वे प्रवासी संघटनेचे कोकण रेल्वेच्या प्रबंध निर्देशकांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी तालुका रेल्वे प्रवासी संघटना आणि मेवाड युवक मंडळाच्या प्रतिनिधींनी बुधवारी (दि.1) माणगाव रेल्वे स्थानकांत कोकण रेल्वेचे प्रबंध निर्देशक संजय गुप्ता यांची भेट घेवून स्थानकातील प्रवासी समस्या व सुविधांबाबत चर्चा केली व निवेदन दिले. कोकण रेल्वेचे प्रबंध निर्देशक संजय गुप्ता …

Read More »