Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा

खोपोली : प्रतिनिधी दोन वर्षे कोरोना संकट व त्या अनुषंगाने लावण्यात आलेली बंधने व गरीब आदिवासी कुटुंबांवर ओढवलेले आर्थिक संकट याची जाणीव ठेवत खोपोली सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी (दि. 5) आदिवासी व अन्य विविध समाजांतील 44 गरीब जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा साजरा करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी दोन …

Read More »

पालीत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम

पाली : प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सुधागड-पाली अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी (ता. 4) पाली पंचायत समिती प्रांगणात करण्यात आले. या अभियानाची जनजागृती करण्यासाठी पोषण रॅली काढण्यात आली. या वेळी उपस्थितांनी पोषण शपथ घेतली. रांगोळी व गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सकस आहार प्रात्यक्षिक दाखविण्यात …

Read More »

चौल नाक्यावर वाहतूक कोंडी

रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग व मुरूड रस्त्यावर वाढत्या वाहतुकीचा ताण मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चौल नाक्यावर पडत असून, येथे नित्य वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. दिवसेंदिवस अलिबाग व मुरूड तालुक्यात पर्यटकांच्या वाढत्या संख्येने येथील मुख्य रस्त्यावर वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी येथील रस्त्याला वाहतुकीचा ताण पडून वारंवार वाहतूक कोंडी …

Read More »

माथेरानला पाणीपुरवठा करणारा शारलोट तलाव गळातच

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष कर्जत : बातमीदार माथेरानमधील पर्यटनस्थळांपैकी एक, तसेच संपूर्ण माथेरानला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो त्या शारलोट तलावात गाळाचे साम्राज्य असून या वर्षीही शारलोट तलाव गाळमुक्त होण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. माथेरानमध्ये आलेला पर्यटक हा पर्यटनस्थळ शारलोट तलावाला आवर्जून भेट देतोच. सभोवताली गर्द वनराई, पश्चिमेला दरी असे …

Read More »

बाप्पाच्या स्वागतासाठी श्रीवर्धन बाजारपेठ फुलली

नारळाबरोबरच यंदा केवडाही महागणार! श्रीवर्धन : प्रतिनिधी कोरोनामुळे गतवर्षी सण, उत्सव साजरे करण्यावर शासनाने काही बंधने घातली होती, मात्र यंदा निर्बंधात  शिथिलता दिल्यामुळे गणेशोत्सवासाठी श्रीवर्धन बाजारपेठ चांगलीच सजलेली दिसत आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी लागणार्‍या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे तसतशी पूजा आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची …

Read More »

महावितरणची कर्जतमध्ये थकबाकीदारांवर कारवाई

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वीज महावितरण विभागाने थकबाकीदारांच्या विरोधात जोरदार कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे महावितरणच्या वसुलीमध्ये विक्रमी रक्कम जमा झाली असून, कर्जत तालुक्यातील थकबाकीदार ग्राहकांना आपली वीजजोडणी कापली जाण्याची भीती वाटू लागली आहे. कर्जत तालुक्यात 76 हजार वीजग्राहक असून त्यातील असंख्य ग्राहकांकडे करोडो रुपयांची थकबाकी आहे. 9 …

Read More »

रोहा शहर ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र चाळके

रोहे : प्रतिनिधी ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शहर अध्यक्षपदी रवींद्र चाळके यांची तर सरचिटणीसपदी प्रकाश कोळी व खजिनदारपदी महेंद्र मोरे यांची निवड करण्यात आली ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शाखेची  बैठक शुक्रवारी (दि. 3) येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा कार्यकारिणी सदस्य मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत संघटनेच्या रोहा …

Read More »

मुरूड तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी समीर शिंदे

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत राहणारे भाजपचे तरुण कार्यकर्ते समीर भारत शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या मुरूड तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सुधागड, पाली येथील जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शिंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ग्रामीण भागात पक्षाचे काम करीत असताना …

Read More »

बोरघाटात कार कोसळली; तरुण सुखरूप

खोपोली : प्रतिनिधी लोणावळ्याहून खोपोली शहरात बोरघाटातून उतरत असलेली एक कार गुरुवारी (दि. 2) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खोल दरीत कोसळली. या कारमधील जखमी तरुणाचे प्राण अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेच्या पथकाने वाचविले. सागर वावळे हा तरुण नाईट फुटबॉल खेळण्यासाठी गुरुवारी रात्री आपल्या मारुती झेन कारने लोणावळा येथून खोपोलीकडे येत होता. …

Read More »

विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ

सासरच्या नऊ जणांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा माणगाव : प्रतिनिधी विवाहितेचा मानसिक छळ व मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या नऊ जणांवर गोरेगाव (ता. माणगाव) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा गोरेगावकर यांचे लग्न 2015 मध्ये अर्जुन बाळाराम गोरेगावकर (वय 32, रा. विद्यानगर लोणेरे, ता. माणगाव) यांच्याबरोबर झाले. लग्न झाल्यानंतर …

Read More »