Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

लसीकरणाच्या गर्दीत कोरोना रुग्णाचाही प्रवेश रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा व चौल परिसरात कोरोना संसर्ग रोगाचा वाढता प्रादूभाव आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न राबविले जात आहेत, मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला आहे. या लसीकरणाच्या गर्दीत कोरोना रुग्णसुद्धा प्रवेश करत असल्याने कोरोना संसर्ग रोगाचा प्रादूर्भाव कमी होण्याऐवजी …

Read More »

पोशिर येथील गणेश घाट आणि रस्त्याचे नुकसान

कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब रस्त्यावरील पोशिर या गावातील गणेश विसर्जन घाटाचे पोश्री नदीला आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. या महापुरामुळे गणेशघाटासह तेथील रस्त्याचेही नुकसान झाले आहे. पोशिर गावातील गणेश विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाट हा चिकनपाडा गावाच्या पुढे असलेल्या पोश्री नदीच्या तीरावर आहे. तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या या गणेश …

Read More »

वाल्मिकी मच्छीव्यावसायिक सहकारी संस्था

आज मी जरी सहकार क्षेत्रामध्ये अनेक पदांवर काम करीत असलो तरी माझ्या सहकारामधील कामगिरीचे बीज मात्र पन्नास वर्षांपूर्वी आम्ही स्थापन केलेल्या वाल्मिकी सहकारी मच्छीव्यावसायिक संस्थेमध्येच आहे.  02 ऑगस्ट 1971 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेला आज बघताबघता 50 वर्ष पूर्ण झाली.  आज या निमित्ताने गेल्या पन्नास वर्षामधील सा-या घटना झर्रकन् आठवल्या. …

Read More »

तळीयेच्या पुनर्वसनासाठी जागेची पाहणी

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या गावाचे तत्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी पर्यायी जागा शोधण्याची कार्यवाही सुरू होती. तळीये गावाजवळन एका 90 गुंठे पर्यायी जागेची प्रशासनाकडून शनिवारी (दि. 31) पाहणी करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, तहसीलदार …

Read More »

पडक्या भिंती बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे; महाड पूरग्रस्तांची संघर्षकथा

पनवेल : नितिन देशमुख रायगड जिल्ह्यात जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात तळई येथे दरड कोसळून 52 जणांचा मृत्यू झाला आणखी 42 जण बेपत्ता आहेत. महाड शहर पुराने धुवून नेले. होत्याचे नव्हते झाले. तेथील जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे, महाड पूर्वपदावर येण्यास अजून काही दिवस लागतील. पोलादपूर तालुक्याठी दरड …

Read More »

मासेमारीसाठी मुरूडमधील होड्या सज्ज

कोळी बांधवांची लगबग वाढली; सामानाची जुळवाजुळव मुरूड : प्रतिनिधी मच्छिमारीवर घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी संपत असल्याने मुरूडमधील कोळी बांधवांची खोल समुद्रात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्याची पूर्व तयारी म्हणूून होड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, जाळ्यांची दुरुस्ती पुर्ण करून कोळी बांधव होड्यांमध्ये तेल, बर्फ, मीठ, मसाला व वाण सामानाची जुळवाजुळव करताना दिसत …

Read More »

अलिबाग, मुरुडमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी

अलिबाग : जिमाका पर्यटक व नागरिकांना अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास उपविभागीय अधिकार्‍यांनी बंदी घातली आहे. अलिबाग तालुक्यातील तिनविरा धरण, उमटे धरण व मुरुड तालुक्यामधील गारंबी धरण व धबधबा, आंबोली धरण, फणसाड धरण, सवतकडा धबधवा व नागशेत या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जाण्यास अलिबाग उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत ढगे यांनी …

Read More »

फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांना मदत

पेण : प्रतिनिधी रायगड फोटोग्राफर असोसिएशन या संस्थेच्या प्रतिनिधींनी नुकतेच महाडमधील पूरग्रस्त भागात जाऊन धान्य व कपड्यांचे वाटप केले. महाडसह बाजुच्या गावांना महापुराचा मोठा फटका बसला असून, शेती व घरांत पुराचे पाणी घुसून आतोनात नुकसान झाले आहे. रायगड फोटोग्राफर असोसिएशनकडून महाडमधील 200 पुरग्रस्त कुटुंबांना धान्य व कपड्यांचे वाटप करण्यात आले. …

Read More »

ताकई रस्त्याची दुरावस्था

खोपोली : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील ताकई रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्यामुळे आपघाताच्या घटना वाढत आहेत. चार महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन झाले मात्र अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी नगराध्यक्षा सुमन औसरमल यांची भेट घेत ठेकादार आणि अभियत्यांवर विरोधात संताप व्यक्त केला. ताकई रस्त्याच्या कामासाठी एमएमआरडीएने …

Read More »

जांभुळपाड्याला दरडींचा धोका

दोन वर्षे उलटूनही उपाययोजना नाही पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावावरही दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, तेथील दोन कुटुंबे दहशतीखाली वावरत आहेत. तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली होती, त्याला दोन वर्षे होऊनही अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही. वर्‍हाड-जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील जांभुळपाडा येथे रविंद्र …

Read More »