माणगाव : प्रतिनिधी ठाणे येथील युवा भारत सामाजिक संघटनेमार्फत महाड परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना गुरुवारी (दि. 5) जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. संघटनेचे युवा सदस्य सागर पाटील, सुरेश मोरे, किशोर गुंडवार व त्यांच्या सहकार्यांनी महाड तालुक्यातील पूरग्रस्त गावांत जाऊन तेथील ग्रामस्थांना किराणा सामान, गव्हाचे पीठ, डाळ, तांदूळ, साखर, चहा पावडर, साबण, …
Read More »नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने केली पूरग्रस्तांना मदत
कर्जत : बातमीदार नेरळमधील राजेंद्रगुरूनगर आणि राही हॉटेल परिसरात राहणार्या लोकांच्या घरात 22 जुलै रोजी महापुराचे पाणी घुसले होते. तेथील पूरग्रस्तांना नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने नेरळमधील पूरग्रस्तांना एक महिना पुरेल एवढे रेशन व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष …
Read More »खोपोलीतील पूरग्रस्तांना शासनाने मदत करावी
भाजप नगरसेविकेचे तहसीलदारांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील अनेक घरांत पूराचे पाणी घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरग्रस्तांना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अपर्णा मोरे यांनी गुरुवारी (दि. 5) खालापूरचे तहसीलदार इरेश चपलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 11 …
Read More »नेरळमध्ये निर्माण झाले अनेक कचरा डेपो
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाकडे 100 कंत्राटी कामगार असूनदेखील शहराच्या काही भागात नवीन कचरा डेपो तयार झाले आहेत. रस्त्याने जाणारे नागरिक प्लास्टिक पिशवीत आणलेला कचरा नव्याने तयार झालेल्या कचरा डेपोत फेकून देतात. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नेरळ हद्दीत ग्रामपंचायतीच्या 24 ठिकाणी कचरा कुंड्या आहेत. मात्र प्रशासनाकडून …
Read More »पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या आशा पल्लवित
कर्जत : प्रतिनिधी पेण को ऑप बँकेसंदर्भात ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळालेच पाहिजेत, बँकेचे असेंट विकून पैसे द्यावेत किंवा राष्ट्रीयकृत बँकेत विलीनीकरण करावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे केली आहे. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पेण अर्बन बँक …
Read More »फार्मा पार्कचा अहवाल राज्यपालांनी मागवला; शेतकर्यांच्या विरोधाची दखल
अलिबाग ः प्रतिनिधी मुरूड व रोहा तालुक्यातील प्रस्तावित फार्मा पार्कला स्थानिक शेतकर्यांचा विरोध आहे. याची दाखल घेऊन या प्रस्तावित फार्मा पार्कचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडून मागवला आहे. प्रस्तावित फार्मा पार्कला परिसरातील भूमिपुत्रांचा विरोध आहे. याबाबत भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »रायगडवाडी परडीमधील जमिनीला भेगा
महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीमधील परडीमध्ये जमिनीला भेगा पडल्या आहेत. या भेगा दिवसेंदिवस वाढतच असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट आहे. स्थानिक प्रशासनाने येथील कुटुंबांना गावातच इतरत्र स्थलांतरीत केले असून भूगर्भशास्त्र विभागाकडून या परिसराची पाहणी केली जाणार आहे. रायगडवाडीमधील परडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तेथील …
Read More »एक हात मदतीचा…
विकलांग तरुणाची टपरी भाजप युवामोर्चाने उभारली महाड : प्रतिनिधी महापुरात महाडमध्ये कोणाचेच काही वाचले नाही. येथील एका विकलांग युवकाच्या उपजीविकेचे साधन असणारी टपरीही वाहून गेली. भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी ही टपरी पुन्हा उभी करुन या युवकाला मदतीचा हात दिला आहे. सर्वांचे सर्वतोपरी नुकसान करणार्या महाडच्या महापूरात विकलांग युवक …
Read More »पेब किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या 12 ट्रेकर्सला दाखवला मार्ग
कर्जत : बातमीदार माथेरानच्या डोंगर रांगेत असलेल्या पेब किल्ला अर्थात विकटगड येथे डोंबिवली येथील 12 ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी आले होते. सायंकाळी परत येताना कोसळलेल्या दरडीमुळे ते ट्रेकर्स रस्ता भरकटले. माथेरान पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमने पाऊस सुरू असताना अंधार्या रात्रीत तीन तास शोध घेत या ट्रेकर्सना माथेरान घाट रस्त्यावर आणले. डोंबिवली …
Read More »सुधागडातील खुरावले फाटा ते वाघोशी रस्त्याची दुर्दशा
एका वर्षाच्या आत तब्बल अडीच कोटी रुपये पाण्यात पाली : प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अडीच कोटी रुपये निधी खर्च करून सुधागड तालुक्यातील खुरावले फाटा ते वाघोशी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र एका वर्षाच्या आत या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून तो जागोजागी …
Read More »