Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

भाजपचे अण्णा कंधारे यांच्यातर्फे आरोग्यविषयक साहित्याचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी कोरोना काळात सक्रीय असणार्‍या मुरूडमधील सामाजिक संस्थांना भाजपचे ज्येष्ठनेते अण्णा कंधारे यांनी मास्क, सॅनिटायझर, पाण्याचा जार, वाफ घेण्याचे मशीन अशा वस्तूंचे वाटप केले. मुरूडमधील ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, श्रीराम पतसंस्था, महात्मा फुले पतसंस्था, श्री काळभैरव पतसंस्था या ठिकाणी नागरिकांचे येणे-जाणे सतत सुरू असते. तेथील कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात …

Read More »

संपूर्ण रायगड जिल्हा आता तिसर्‍या स्तरात

निर्बंध काही प्रमाणात शिथिल अलिबाग ः प्रतिनिधीसंपूर्ण रायगड जिल्ह्याने आता कोरोनाच्या तिसर्‍या स्तरात प्रवेश केला आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध जिल्ह्यात शनिवार (दि. 7)पासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले.राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने महाराष्ट्र शासनाने राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी केली. रायगड जिल्हाचा रुग्णवाढीचा दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्राचा …

Read More »

फार्मा पार्क प्रकल्पात लक्ष घालणार

शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाला राज्यपालांचे आश्वसन अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग्ज फार्मा पार्क प्रकल्पात आपण लक्ष घालू आणि स्थानिक शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे.मुरूड व रोहा या तालुक्यातील वाघूळवाडी ते तळेखार विभागात असलेल्या 15 गावांची जमीन संपादित करून तेथे फार्मा पार्क प्रकल्प …

Read More »

किरीट सोमया यांनी घेतली कोर्लई ग्रामपंचायतीकडून माहिती

ठाकरे-वायकरांचा मालमत्ता घोटाळा रेवदंडा ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मालमत्ता खरेदी घोटाळ्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 3) मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिली.रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर या परिवारांनी वास्तुविशारद कै. अन्वय नाईक यांच्याकडून …

Read More »

माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी, वाहनांच्या रांगा

कर्जत : प्रतिनिधी पर्यटकांसाठी माथेरान खुले केल्यानंतर आलेल्या पहिल्या वीकेण्डमध्ये वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी माथेरानमध्ये शनिवारी (दि. 3) पर्यटकांची गर्दी उसळली. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाका परिसरात तसेच नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना माथेरामध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे केवळ पर्यटनावर अबलंबून असलेल्या स्थानिक नागरिक …

Read More »

पेण वरवणेत जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते वृक्षारोपण

पेण : प्रतिनिधी कृषी दिनाचे औचित्य साधून पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पेण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत 14 शासकीय व 10 अनुदानित आश्रम शाळांमध्ये गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी चौधरी …

Read More »

कर्जतमधील धरणे, पाझर तलाव यंदा तरी ओव्हरफ्लो होणार का?

कर्जत : बातमीदार तालुक्यात दुबार शेतीसाठी आणि सिंचनासाठी बांधण्यात आलेली धरणे आणि पाझर तलाव गतवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षणतेने भरली नव्हती. यावर्षी तरी पुरेसा पाऊस पडून हे जलाशय ओव्हर फ्लो होतील का? याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. कर्जत तालुक्यात 90 टक्के क्षेत्रावर भातशेती केली जात होती. उन्हाळ्यातदेखील भातशेती करता यावी …

Read More »

पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे खोळंबली; महाड तालुक्यातील शेतकरी चिंतेत

महाड : प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपासून महाड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे थांबली आहे. भाताची रोपे करपू लागली असून, चाळीस टक्यापेक्षा अधिक शेतकर्‍यांची लावणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाल्याने जुनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतीची कामे सुरू झाली. त्यानंतरच्या 15 दिवसांमध्ये नागरणी, …

Read More »

कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी कृतीदल कार्यान्वित

अलिबाग : जिमाका कोरोनामुळे निधन झाल्यानंतर त्या पालकांवर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हे कृतीदल कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहणार आहे. कोरोनामध्ये आई, वडिलांचा मृत्यू होऊन रायगड …

Read More »

सामाजिक बहिष्कारात रायगड राज्यात दुसर्‍या क्रमांकावर

पाली : प्रतिनिधी जात पंचायत व गावकीचा मनमानी कारभार रोखण्यासाठी राज्य शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केला आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कायद्या अंतर्गत राज्यात आतापर्यंत एकशेचार गुन्हे दाखल झाले असून यात रायगड जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोकणात काही बाबतीत आजही जुन्या …

Read More »