रोहे : प्रतिनिधी चक्रीवादळात रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या 50 शाळांमधील 77 वर्गखोल्यांची पडझड झाली आहे. सध्या कोरोना संसर्ग नसलेल्या गावांतील शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत, मात्र वर्गखोल्या नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांना कुठे बसवायचे असा प्रश्न तालुक्यातील शिक्षकांना पडला आहे. रोहा तालुक्यात जि. प.च्या 237 …
Read More »महाडचे कुर्ला धरण ओव्हरफ्लो; परिसरातील खोदकामामुळे मातीचा गाळ वाढणार
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कुर्ला गावाजवळ असलेल्या धरणातून महाड शहराला पाणीपुरवठा केला जातो. हे धरण आता तुडुंब भरून वाहू लागले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने धरणाची दूरवस्था झाली आहे. भिंतीत रानटी वनस्पतींची रोपटी उगवल्याने धरण धोक्याचे बनत असतानाच शेजारील खाजगी जागेत होत असलेल्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात माती …
Read More »कर्जत पोलिसांनी उधळली फार्महाऊसमधील पार्टी
34 जणांवर गुन्हा दाखल कर्जत ः बातमीदारकोविड-19च्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून कर्जत तालुक्यातील एका फार्महाऊसमध्ये सुरू असलेली मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील पर्यटकांची पार्टी पोलिसांनी उधळली. या प्रकरणी 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील अविज व्हिलेज फॉर्म हाऊस रेस्टॉरंटमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसून पार्टी …
Read More »कोरोनाचे नियम मोडल्याने माणगावात चार दुकाने सील
माणगाव : प्रतिनिधी कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माणगाव नगरपंचायतीने शहरातील चार दुकानांना टाळे ठोकले असून काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. माणगाव शहर तसेच तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. ती आटोक्यात आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अनेक नागरिक व व्यापारी कोरोनाविषयक नियमांचे राजरोस उल्लंघन करताना दिसत आहेत. पोलीस व …
Read More »माथेरान पर्यटकांनी गजबजले; व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये उत्साह
माथेरान : रामप्रहर वृत्त बंदी उठताच माथेरानमध्ये रविवारी (दि. 27) पर्यटकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांत उत्साह संचारला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घातल्याने माथेरानचा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे येथील नागरिक व व्यावसायिक अडचणीत आले होते. पर्यटकांसाठी माथेरान खुले करावे, अशी मागणी भाजपतर्फे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली …
Read More »किल्ले रायगडाला हवे आधुनिक पद्धतीचे संरक्षण
कोकणामध्ये दरवर्षी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होतो. अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडतात आणि त्यामध्ये जीवितहानीप्रमाणे वित्तहानीदेखील मोठ्या प्रमाणात होते. या विजेमुळे अनेक ऐतिहासिक वास्तूंचेदेखील नुकसान होत असल्याने किल्ले रायगडासह कोकणामध्ये असलेल्या पुरातन ऐतिहासिक वास्तूंचे विजेपासून संरक्षण करण्यासाठी शासनाकडून वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी …
Read More »सुधागडात 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू
पाली : प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरते न ओसरते तोच तिसर्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आल्याने चिंतेत भर पडली. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लसीकरणावर भर दिला जातोय. सुधागडातील पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात 18 ते 44 वयोगटासाठी शनिवार (दि. 26) पासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार 18 ते …
Read More »आदिवासी बालकाची भट्टी मालकाच्या ताब्यातून सुटका
अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलिसांच्या तत्परतेमुळे रोहा तालुक्यातील चिंचवली खोंडावाडी येथील आदिवासी कुटुंबातील सहा वर्षांच्या मुलाची नांदेड येथील कोळसाभट्टी मालकाच्या ताब्यातून सुटका झाली. हा मुलगा दीड महिन्यानंतर आपल्या घरी आला आहे. चिंचवली खोंडावाडी येथील सुनील अप्पा जाधव, राहुल सुनील जाधव (वय 6), गुलाब वसंत पवार, वसंत पवार, संतोष भास्कर पवार …
Read More »पेण एसटी आगारातील कार्यशाळेची दुरवस्था; कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात
पेण : प्रतिनिधी दुर्गंधीयुक्त, अस्वच्छ परिसर आणि अपुर्या सोयी सुविधा यामुळे पेण एसटी आगारामधील कार्यशाळेतील कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून, या परिस्थितीची माहिती असतानादेखील वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचार्यांत नाराजी व्यक्त होत आहे. एसटीच्या पेण आगारातील कार्यशाळेच्या पत्र्याची शेड जुनी झाली असून, त्यातील काही पत्रे फुटले असल्याने पावसाचे …
Read More »कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी अनाथाश्रम शोधण्याची प्रशासनाची धावपळ; जिल्हाधिकार्यांकडून स्थळांची पाहणी
कर्जत ़: बातमीदार कोरोनामुळे आई, वडिल गमालेल्या मुलांचा सांभाळ शासन करणार आहे. या अनाथ बालकांसाठी प्रशासनाने बालसुधारगृह आणि अनाथाश्रम यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कर्जत आणि नेरळ येथील स्थळांची पाहणी केली. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. यात अनेक लहानग्यांनी आपले आई-वडिल …
Read More »