Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात तीन जण ठार

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधीमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी हद्दीत गुरुवारी (दि. 1) चार वाहनांचा भीषण अपघात घडला. यात एक कार पूर्णपणे जळून खाक होऊन त्यातील तिघांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला.आडोशी हद्दीतील तीव्र उतारावर एका कंटेनरने आय 10 कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे ती कार पुढील पुढील ट्रकवर धडकली व तिने पेट …

Read More »

फार्मा पार्क प्रकल्पाबाबत राज्य शासनाची भूमिका दुटप्पी

अ‍ॅड. महेश मोहिते यांचा आरोपराज्यपालांना भेटून भूमिका मांडणार अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील प्रस्तावित फार्मा पार्कला स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प येणार नाही असे राज्य शासन सांगते. त्याचवेळेस स्थानिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य शासन या प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका घेऊन स्थानिक शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहे, असा …

Read More »

माथेरानमधील डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवेत, कोरोना काळात ठरले देवदूत

कर्जत : बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्येसुद्धा जाणवला. मात्र तुटपुंजी आरोग्य व्यवस्था असताना येथील डॉक्टरांनी धीराने कोरोनाशी दोन हात करून रुग्णांना कोविड मुक्त केले. शासनाचे डॉ. प्रशांत यादव, डॉ. प्रांजल सिंग, नगर परिषदेचे डॉ. उदय तांबे या तिन्ही डॉक्टरांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. माथेरानच्या बी. जे. हॉस्पिटलमध्ये फक्त प्रथमोपचार …

Read More »

उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांनी साकारल्या 412 परसबागा

अलिबाग : प्रतिनिधी महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणार्‍या  ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद‘ च्या माध्यमातून 15 जून  ते 15 जुलै या कालावधीमध्ये माझी पोषण परसबाग विकसन मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यात उमेद अभियानातून सामूहिक व वैयक्तिक स्वरुपात 412 परसबागांची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये स्वयं सहाय्यता समूह तसेच ग्रामसंघांच्या पदाधिकार्‍यांनी …

Read More »

खालापुरात रानडुकरांचा उच्छाद; शेतकर्‍यांच्या भातशेतीची नासधूस

खालापूर ः प्रतिनिधी आधीच विविध समस्यांमुळे बळीराजा त्रस्त असताना खालापूर तालुक्यातील माणकिवली परिसरात शेतकरीवर्गापुढे नवे संकट उभे राहिले आहे. येथील भातरोपांची रानडुकरांनी नासधूस केल्याने शेतकर्‍यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे हे शेतकरी संकटात सापडले आहेत. खालापूर तालुक्याला औद्योगिक नगरी म्हणून ओळख प्राप्त असताना येथील बहुतांशी शेतकरी आपला वडिलोपार्जित शेती …

Read More »

पावसाळ्यातही खालापूरकर कोरडे; पाणीपुरवठा योजना तीन दिवसापासून बंद

खोपोली : प्रतिनिधी वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडल्याने खालापूर शहरातील कुटुंबांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून विहिरीचा आश्रय घेतला आहे. खालापूर तालुक्यातील कलोते धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी सुमारे सहा किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेतील वीज पंप जळणे, कधी …

Read More »

माणगाव पुलाजवळील कचरा उचलला; दै. रामप्रहरच्या वृत्ताची नगरपंचायतीकडून दखल

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमधील काळ नदी पुलाजवळ केरकचरा टाकण्यात येत होता. तो पावसात कुजून परिसरात पसरलेल्या दुर्गंधीने रिक्षा चालक, प्रवासी, नागरिक हैराण झाले होते. त्याबाबत बुधवारी (दि. 30) दै. रामप्रहर वृत्त प्रसिद्ध होताच  माणगाव नगरपंचायतीला जाग आली. मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी नगरपंचायतीचे सफाई कामगार पाठवून सदरचा कचरा त्वरीत …

Read More »

स्थानिकांना न्याय द्या; अन्यथा उपोषण; विळे भागाड ग्रामस्थांचा इशारा; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विळे भागाड एमआयडीसीमधील पोस्को कंपनीतील भंगाराच्या मलिद्यासाठी बाहेरील पुढार्‍यांनी स्थानिकांच्या विरोधात गुंडगिरी चालू केली आहे, ती त्वरित थांबवून भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी विळे भागाड ग्रामस्थांनी रायगडच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.तीस वर्षांपूर्वी माणगाव तालुक्यांतील विळे भागाड येथील जमीन कवडीमोल भावात संपादित करुन तेथे …

Read More »

रायगडात हॉटेल, रिसॉर्ट 50 टक्के क्षमतेने होणार खुली

अलिबाग ः प्रतिनिधीराज्यातील कोरोना प्रादुर्भाव अधिक असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये रायगडचा समावेश आहे. त्यामुळे शासनाच्या अनेक निर्बंधांतून रायगडकरांची अद्याप तरी सुटका झालेली नाही. लेव्हल-4मध्ये असलेल्या रायगडमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने केवळ 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत, तर हॉटेल आणि रिसॉर्टला 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी जारी …

Read More »

खालापुरातील विश्रामगृह दुरुस्तीवर उधळपट्टी; सार्वजनिक बांधकाम विभागाची मेहरनजर; कर्मचारी निवासांची मात्र दूरवस्था

खोपोली : प्रतिनिधी दुरूस्तीचे ग्रहण लागलेल्या खालापुरातील शासकीय विश्रामगृहावर होणारी उधळपट्टी थांबवा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापुर्वी विश्रामगृहावर थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की  ओढवलेली होती.  खालापूर शहरात 1984 साली महाराष्ट्र शासनाने  विश्रामगृह इमारत बांधली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित विश्रामगृहाची …

Read More »