Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माथेरानमध्ये पावसाचे धूमशान; 21 दिवसांत ओलांडला 1100 मिलिमीटरचा टप्पा

कर्जत : बातमीदार पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या तुफान पर्जन्यवृष्टी होत आहे. 1 जूनपासून सुरू झालेल्या पावसाने गेल्या 21 दिवसांत 1100 मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. माथेरानला सरासरी 3050 इतका पाऊस पडतो. या वेळी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा वेग मंदावला होता. 12 जूनपर्यंत जेमतेम 500 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, …

Read More »

अरुणराव दाते : सामाजिक कार्याला वाहून घेतलेले संघ कार्यकर्ते

रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अरुणराव दाते यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख. रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अरुण माधव दाते यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, हे सांगून कुणाला खरं वाटणार नाही. तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि क्रियाशीलता आजही त्यांच्या ठिकाणी ओसंडून वाहत …

Read More »

नेरळ ग्रामपंचायत सत्ताबदलाच्या उंबरठ्यावर

सध्याची नेरळ ग्रामपंचायतमधील राजकीय स्थिती पाहता शिवसेनेकडे सात, तर भाजप-राष्ट्रवादी-शेकाप यांच्याकडे स्वतःचे नऊ आणि सेनेला रामराम करून आरपीआयमध्ये प्रवेश केलेले एक तसेच सेनेच्या नेरळ ग्रामपंचायतमधील सदस्यांच्या गोटात घेतला जात नसलेला एक सदस्य असे 11 सदस्य आज सत्ताधारी गटाकडे आहेत. सेनेकडे हक्काचे सात सदस्य असून नजीकच्या काळात नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवडणूक …

Read More »

कर्जत-माथेरान मिनीबस पुन्हा सुरू

भाजपच्या मागणीला यश कर्जत ः बातमीदारयंदा कोविड काळात लॉकडाऊन लागल्यानंतर बंद करण्यात आलेली कर्जत-माथेरान मिनीबस सेवा तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू करण्याचा निर्णय कर्जत एसटी आगाराने घेतला आहे. यासाठी स्थानिकांची अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने मागणी केली होती. त्यानुसार सोमवार (दि. 21)पासून ही बससेवा सुरू झाली आहे.माथेरानमधील सर्वसामान्य जनतेकडे वाहन …

Read More »

दि. बा. पाटील यांच्या आत्मदहन करण्याच्या निश्चयाने सरकार हादरले!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… सरकारबरोबर अनेक बैठका होऊनही शेतकर्‍यांच्या जमिनीचा प्रश्न सुटत नसल्याचे पाहून लोकनेते दि. …

Read More »

नेरळ ग्रामपंचायत सत्ताबदलाच्या उंबरठ्यावर

रायगड जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून मिरवणारी नेरळ ग्रामपंचायतीमधील सत्ता शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायतीमध्ये नजीकच्या काळात राजकीय समीकरणे बदलणार अशी चिन्हे आहेत. थेट सरपंच म्हणून निवडून आलेले रावजी गोमा शिंगवा यांचे आकस्मिक निधन झाल्याने आता नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सदस्यांतून निवडले जाणार …

Read More »

डिकसळ-भिवपुरी रस्त्याची दुरुस्ती

कर्जत ः बातमीदार डिकसळ गावातून भिवपुरी रोडकडे जाणारा उमरोली ग्रामपंचायतीने बांधलेला सिमेंटचा रस्ता खराब झाला होता. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, तेथील व्यावसायिकांनी दगड, खडी टाकून रस्ता सुस्थितीत केल्याबद्दल भिवपुरी रोड रेल्वेस्टेशन प्रवासी संघाने त्यांचे आभार मानले आहेत. मध्य रेल्वेच्या कर्जत एण्डकडे असलेल्या …

Read More »

खालापुरात लाखोंचा गहू जप्त; दोघांना अटक

खोपोली ः प्रतिनिधी  काळ्या बाजारात विक्रीकरिता नेण्यात येत असलेला सुमारे साडेचौदा लाखांचा गहू स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग-रायगड यांनी खालापूर टोलनाक्यावर पकडला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. साकीनाका मुंबई येथील गोडाऊनमधील रेशनवर वितरित करण्यासाठी आणलेला गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस …

Read More »

शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘दिबांं’चा सरकारला अंतिम इशारा!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… 1984च्या आंदोलनानंतर सरकारशी वाटाघाटी झाल्या. त्या वेळी विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार …

Read More »

‘दिबां’च्या कर्मभूमीत होणार्‍या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे -आमदार प्रशांत ठाकूर

पेण ः दि. बा. पाटील 86व्या वर्षी आजारी असतानाही 2012 साली आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्यांची जन्मभूमी व कर्मभूमीत होणार्‍या विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव मिळाले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. त्यांचे नाव राज्यातील इतर प्रकल्पांना देता येईल, परंतु ‘दिबां’नी या भूमीसाठी …

Read More »