अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलिसांच्या तत्परतेमुळे रोहा तालुक्यातील चिंचवली खोंडावाडी येथील आदिवासी कुटुंबातील सहा वर्षांच्या मुलाची नांदेड येथील कोळसाभट्टी मालकाच्या ताब्यातून सुटका झाली. हा मुलगा दीड महिन्यानंतर आपल्या घरी आला आहे. चिंचवली खोंडावाडी येथील सुनील अप्पा जाधव, राहुल सुनील जाधव (वय 6), गुलाब वसंत पवार, वसंत पवार, संतोष भास्कर पवार …
Read More »पेण एसटी आगारातील कार्यशाळेची दुरवस्था; कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात
पेण : प्रतिनिधी दुर्गंधीयुक्त, अस्वच्छ परिसर आणि अपुर्या सोयी सुविधा यामुळे पेण एसटी आगारामधील कार्यशाळेतील कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून, या परिस्थितीची माहिती असतानादेखील वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचार्यांत नाराजी व्यक्त होत आहे. एसटीच्या पेण आगारातील कार्यशाळेच्या पत्र्याची शेड जुनी झाली असून, त्यातील काही पत्रे फुटले असल्याने पावसाचे …
Read More »कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी अनाथाश्रम शोधण्याची प्रशासनाची धावपळ; जिल्हाधिकार्यांकडून स्थळांची पाहणी
कर्जत ़: बातमीदार कोरोनामुळे आई, वडिल गमालेल्या मुलांचा सांभाळ शासन करणार आहे. या अनाथ बालकांसाठी प्रशासनाने बालसुधारगृह आणि अनाथाश्रम यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कर्जत आणि नेरळ येथील स्थळांची पाहणी केली. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. यात अनेक लहानग्यांनी आपले आई-वडिल …
Read More »किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक साजरा
महाड : प्रतिनिधी दाट धुके आणि अधूनमधून पडणारा पाऊस अशा वातावरणात किल्ले रायगडावर बुधवारी (दि. 23) तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेकाचा तिथीनुसार येणारा वर्धापनदिन शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकण कडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा …
Read More »ऑनलाइन शिक्षण सुरू, पण स्मार्टफोन आणि इंटरनेटचे विघ्न
पाली : प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र स्मार्टफोनचा अभाव आणि इंटरनेटचा व्यत्यय यामुळे ऑनलाइन शिक्षण ग्रामीण, दुर्गम, आदिवासी वाडी व वस्तीवरील मुलांपर्यंत पोहचणे दुरापास्त झाले आहे. परिणामी कोणी स्मार्टफोन देते का स्मार्टफोन असे बोलण्याची वेळ पालक व शिक्षकांवर आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी व पालकांकडे …
Read More »आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे धरणे आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या रायगड शाखेतर्फे बुधवारी (दि. 23) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या रायगड शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण निरगुडा, भारत मुक्ती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष विजय आवास्कर, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष समीर घासे, बुद्धिस्ट …
Read More »पेण खारेपाटात कोरोना रुग्णसंख्या वाढली; वढाव गावात प्रतिबंधात्मक कारवाई
पेण : प्रतिनिधी दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने पेण तालुक्यातील खारेपाट भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. या भागातील बेनवले गावापाठोपाठ प्रशासनाने वढाव गावाला कोरोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, ग्रामस्थांना गावाबाहेर तर बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वढाव गावात …
Read More »रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण मतदारसंघात औषधांच्या किटचे वाटप
पेण : प्रतिनिधी कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून पेण विधानसभा मतदारसंघात औषधांच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. पेण तालुक्याच्या हमरापूर विभागातील दादर, रावे, कळवे, सोनखार, जोहे, हमरापूर आदी गावांत जाऊन जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी औषधांचे किट वाटप केले. या वेळी भाजपचे …
Read More »शिरगाव आदिवासीवाडीत घर, तर रायगडवाडीत विहीर कोसळली
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील शिरगाव आदिवासीवाडी येथे सोमवारी (दि. 21) रात्री एका घरकुलाची भिंत कोसळली. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही, तर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील विहीर कोसळली. यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगडवाडी गावात सुमारे 20 वर्षांपूर्वी ही विहीर पक्क्या स्वरूपात बांधली होती. त्यानंतर किरकोळ …
Read More »पाणलोट क्षेत्राचे सुयोग्य व्यवस्थापन गरजेचे
महाराष्ट्रातील 307.58 लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 174.73 लाख हेक्टर क्षेत्र वहितींखाली आहे. यातील 82 टक्के क्षेत्र पावसावर आधारित कोरडवाहू क्षेत्रात मोडते. यामुळे राज्याचे बहुतांश कृषी व्यवस्थापन कोरडवाहू शेती व्यवसायावर अवलंबून आहे. जलसिंचन आयोगाच्या अहवालावरून राज्यात प्रवाही सिंचनाद्वारे जास्तीत जास्त 56 लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास वाव आहे. ही बाब विचारात …
Read More »