मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रविवार (दि. 9) पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात करण्यात आली. या वेळी मुरुड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप, नांदगाव उपकेंद्राचे डॉ. नजिर कबले, उसरोली सरपंच मनीष नांदगावकर, नांदगावचे उपसरपंच अस्लम हलडे, माजी सभापती चंद्रकांत कमाने, जितेंद्र दिवेकर, जमिर बकवाल, आरोग्य …
Read More »भावाच्या लग्नातील अतिरिक्त खर्च टाळून कोविड रुग्णालयाला आर्थिक मदत; आरपीआयचे युवा नेते प्रमोद महाडिक यांचे सर्व स्तरातून कौतुक
खोपोली : प्रतिनिधी कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत आरपीआयचे युवा नेते प्रमोद महाडिक यांनी त्यांचे बंधू प्रवीण यांचा विवाह सोहळा रविवारी (दि. 9) अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला. या लग्न सोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून महाडिक यांनी खोपोलीतील नियोजित कोविड रुग्णालयाला 25 हजारांच्या मदतीचा धनादेश कोविड रुग्णालय कमिटीचे सदस्य नरेंद्र गायकवाड यांच्याकडे …
Read More »वरवठणे कोविड सेंटर बंद पडण्याच्या मार्गावर; एकही रुग्ण दाखल नाही
म्हसळा ः प्रतिनिधी तालुक्यातील वरवठणे आयटीआयमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये तालुक्यातील एकही पॉझिटीव्ह किंवा लक्षणे असलेला रग्ण दाखल झालेला नाही. त्यामुळे हे सेंटर बंद पडण्याच्या मार्गावर आहे. म्हसळा तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 475 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून, 54 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरूपी …
Read More »स्कूलबस मालक आणि चालकांवर उपासमारीची वेळ; शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी
रोहे : प्रतिनिधी कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद असल्यामुळे रोह्यातील स्कूल बस मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकारने ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी येथील स्कूल बस मालक करीत आहेत. रोहा तालुक्यात काही नावाजलेल्या शाळा आहेत. त्या वस्तीपासून दूर असल्याने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत …
Read More »माणगाव बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप; कोरोनाविषयक नियमांची पायमल्ली
माणगाव : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत सोमवारी (दि. 10) सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे या बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप आले होते. हे दृश्य पाहून माणगाव तालुक्यातून कोरोना हद्दपार कसा होणार, असा सवाल प्रशासनाला पडला आहे. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे शनिवार, रविवारी माणगाव बाजारपेठेत शुकशुकाट होता. …
Read More »माथेरानमध्ये अश्वखाद्याचे वाटप; हायडॅक कंपनीतील कामगार-अधिकार्यांची घोडेवाल्यांना मदत
कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये पर्यटन व्यवसाय बंद असून पर्यटकांअभावी येथील घोड्यांची उपासमार होत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पनवेलमधील दानशूरांनी माथेरानमध्ये येऊन घोड्यांसाठी 250 बॅग भुसा (चारा) दिला. माथेरानमध्ये एकूण 460 घोडे असून त्याचा वाहतुकीसाठी वापर होतो. लॉकडाऊनमुळे माथेरानमधील पर्यटन व्यवसाय थांबल्याने तेथील घोड्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हायडॅक …
Read More »जागेचा वाद विकोपाला; मुरूड पोलीस ठाण्यात 80 जणांवर गुन्हा दाखल; राजपुरी येथील घटना
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी येथील हरिदास बाणकोटकर यांच्या अंगणातील घराला लागणार्या साहित्याची नासधूस केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार राजपुरी कोळीवाड्यातील 80 जणांवर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हरिदास बाणकोटकर यांचे राजपुरी येथे घर असून तेथे ते त्यांची पत्नी व मुलांसह राहतात. त्यांनी आपल्या अंगणात घराला …
Read More »महाडची आरोग्य यंत्रणा सक्षम कधी होणार?
महाड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या आकाराने विस्तीर्ण तालुका आहे. तसेच याचा जवळपास 80 टक्के प्रदेश हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. तालुक्यातील 134 ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये जवळपास 250 आदिवासी वाड्या-वस्त्या आहेत. सह्याद्रीच्या रांगेचा बहुतांश विस्तार महाड तालुक्यात पसरला आहे. तालुक्याच्या एका टोकाच्या गावातून महाडला यायला जवळपास 35 ते 40 किमीचे अंतर कापावे लागते. …
Read More »पनवेलपेक्षा अलिबागमध्ये उपचाराधीन रुग्ण जास्त
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनोबाधितांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. 9) सलग तिसर्या दिवशी एक हजारहून कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांत तब्बल 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात 908 जणांना कोरोनाची लागण झाली. सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 620वर पोहचली. दिवसभरात एक हजार 20 …
Read More »निर्बंधामुळे रायगडातील पर्यटन व्यावसायिक संकटात
अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत. डिसेंबर ते मार्च महिन्यात जोमाने सुरू असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा ओस पडल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे गेले वर्षभर राज्यात निर्बंध आहेत. त्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात देशभरात टाळेबंदी लागू …
Read More »