Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माथेरानमध्ये पोचले दोन हजार किलो अश्वखाद्य

पशुसंपत्ती पशुसंवर्धन विभागाचे आर्थिक योगदान कर्जत : बातमीदार लॉकडाऊनच्या काळात माथेरानमधील पर्यटन व्यवसाय थांबल्याने तेथील घोड्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे विभागीय सहआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के आणि त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी  सरसावले आहेत. त्यांनी दोन हजार किलो …

Read More »

महाड, पोलादपुरात वादळापूर्वीच पडझड

पोलादपूर : प्रतिनिधी चक्रीवादळ येण्यापूर्वीच शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी वादळी पाऊस सुरू झाला. पोलादपूर तालुक्यातील धारवली, भोराव माटवण रस्ता आणि महाड तालुक्यातील राजेवाडी मोहल्ल्यातील मदरसा या भागात घरे आणि छप्परांचे वादळी वार्‍यामुळे नुकसान झाले. भोराव माटवण रस्तालगतच्या विजेच्या काँक्रीटच्या खांबाचा कनेक्टर्स जोडलेला भाग तुटून लोंबत असल्याचे दिसून आले तर काही …

Read More »

दि. बा. पाटील : लढवय्ये लोकनेते

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका आजपासून दै. राम प्रहरमध्ये क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत…महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची कास धरून …

Read More »

कर्जत तालुक्यात रमजान ईद साधेपणात

कर्जत : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी (दि. 14) रमजान ईद मशिदीत न जाता आपल्या घरीच साजरी केली. रमजान ईदच्या दिवशी सकाळी मशिदीत जावून सामुदायिक नमाज पठण करण्याची मुस्लिम धर्मिंयांची परंपरा आहे. त्यानंतर मोठ्या उत्साहात एकमेकांना शुभेच्छा देत ईद साजरी करून रोजाची सांगता करीत असतात. मात्र यंदा …

Read More »

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्याला प्राधान्य

अलिबाग : प्रतिनिधी ताउत्के चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बाधित होऊ नये, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा, जिल्ह्यातील रुग्णालयांमधील वीज पुरवठा अखंडित रहावा, याला प्रधान्य देण्यात आले असून, तशा सूचना संबंधीत अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात डोलवी, पनवेल …

Read More »

पेणमधील शवदाहिनीला आग; कोणतीही जीवितहानी नाही

पेण : प्रतिनिधी मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी पेणमधील स्मशानभूमीत उभारलेल्या डिझेल शवदाहिनीला शुक्रवारी (दि. 14) दुपारी आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे नगर परिषद प्रशासनातर्फे सांगण्यात आले. भोगावती नदीजवळ पेण नगर परिषदेची वैकुंठधाम स्मशाभूमी आहेत. तिथे डिझेल शवदाहिनीही आहे. या शवदाहिनीला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली.  पॅनलमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही …

Read More »

खोटे दस्ताऐवज तयार करून दुसर्याची जमिन बळकावली

नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार खोटे दस्ताऐवज तयार करून काही इसमांनी नेरळजवळील माणगाव तर्फे वरेडी येथील जमीन स्वतःच्या नावावर केल्याची घटना घडली आहे. याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणारे महंमद अफाक इसाक अन्सारी यांंच्या वडिलांनी माणगाव तर्फे वरेडी (ता. …

Read More »

वादळामुळे बोटी किनार्यावर

मुरुड : प्रतिनिधी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुरुड तालुकयातील सर्व मच्छिमारांनी आपल्या बोटी किनार्‍यावर साकारल्या आहेत. गेल्या चार – पाच दिवसांपासून बोटी किनार्‍यावर असल्याने मुरूडच्या बाजारात मासळी दिसेनासी झाली आहे. ताजी मासळी नसल्याने खवय्ये नाराज आहेत. भारतीय हवामान विभागाने 14 ते 16 मे दरम्यान कोकण किनारपट्टीवर वादळी वार्‍यांसह पावसाची शक्यता …

Read More »

रोहा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोहा शहरात 7 मेपासून  कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र तो हटवल्यानंतर गुरुवारी (दि. 13) रोहा बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. रोहा तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून कडक लॉकडाऊन  लावण्यात आला होता. मात्र …

Read More »

कर्जतमधील श्री धापया महाराजांची जत्रा यंदाही रद्द

कर्जत : प्रतिनिधी कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक वर्षांपासून होणारी जत्रा यंदाही कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. या जत्रेच्या निमित्ताने होणारी  कुस्ती स्पर्धाही रद्द करण्यात आल्याने यंदा हा आखाडा कुस्ती विना राहणार आहे. ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय्य तृतीयेला दोन दिवसांची जत्रा …

Read More »