नेरळ विकास प्राधिकरणातून 15 लाखांचा निधी मंजूर कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील गणेशनगर पायरमाळ भागातील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा कराळे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी नेरळ विकास प्राधिकरणाकडून 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पायरमाळ येथील ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा कराळे यांच्या …
Read More »खरसई ग्रामपंचायत कर्मचार्याला मारहाण
म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील खरसई ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचार्याला गुरुवारी (दि. 6) सकाळी मारहाण करण्यात आली. याबाबत पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत भिंकू पयेर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली आहे. खरसई ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत हे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे एका भागातील पाणी बंद करून दुसर्या भागात …
Read More »खोपोली बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; वाहतुकीचीही कोंडी खोपोली : प्रतिनिधी 8 ते 12 मे या कालावधीत भाजी व फळ व्यापारी मार्केट बंद ठेवणार असल्याने, शुक्रवारी (दि. 7) खोपाली भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि या मार्केटकडे जाणार्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. या परिसरातील वाहतूक …
Read More »महाडमध्ये लसीकरणात सावळागोंधळ
महाड : प्रतिनिधी तरुणांच्या लसीकरणला महाडमध्ये जरी शुक्रवारी (दि. 7) मुहूर्त सापडला असला तरी लोकांची गर्दी, संभ्रम आणि गोंधळामुळे भिक नको पण कुत्रा आवर अशी म्हणायची वेळ आली आहे. शनिवारपासून नियमीत लसीकरणाला सुरूवात होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले आहे. महाड ग्रामीण रुग्णालयात 16 फेब्रुवारी 2021 पासून …
Read More »पेणमध्ये मास्क, सॅनिटायझरचे वाटप
पेण : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडतर्फे पेण तालुक्यातील कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांना नुकताच मास्क व सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. क्लबचे प्रेसिडेंट शशिकांत भगत, व्हाईस प्रेसिडेंट प्रमोद पाठक, सेक्रेटरी राजेश मुळे, विरेंद्र पटेल, डायरेक्टर सुदर्शन शेळके, प्रशांत भगत, प्रांजल पाठक, हेमंत भगत, चेतन तांडेल, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे …
Read More »मुरूडमधील आरोग्य केंद्रांना वैद्यकीय साहित्याची भेट
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचा उपक्रम मुरुड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या मुरुड शाखेतर्फ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंग गन, बीपी ऑपरेटिंग मशीन, ग्लुकोमीटर, फोर इन वन स्टिमर आणि सॅनिटायझरची भेट देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुरुड ग्रामिण रुग्णालय तसेच तालुक्यातील बोर्ली, नांदगाव, आगरदांडा …
Read More »आदर्श विवाह सोहळा : अकरा जणांच्या उपस्थितीत निवृत्त मुख्याधिकार्यांच्या कन्येचा विवाह
कर्जत : प्रतिनिधी येथील नगर परिषदेचे सेवानिवृत्त मुख्यधिकारी दादाराव अटकोरे यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा अवघ्या अकरा जणांच्या उपस्थितीत संपन्न करून कोरोना महामारीच्या काळात समाजापुढे एक आदर्श ठेवला. शासनाने कितीही निर्बंध आणले तरी त्याचे तंतोतंत पालन होतेच असे नाही. मध्यतंरी विवाह सोहळ्यासाठी 50 जणांची उपस्थिती असावी असा आदेश होता मात्र …
Read More »अलिबाग येथील कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन
अलिबाग : वैवाहिक वादाची तसेच कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे जलदगतीने व सामोपचाराने निकाली निघावीत या हेतूने अलिबाग येथे सुरु करण्यात आलेल्या कौटुंबिक न्यायालयाचे मंगळवारी (दि. 5) उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. रायगडच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे, पालकमंत्री …
Read More »कर्जतमध्ये 18 ते 45 वयोगटासाठीही लसीकरण
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार शहरात तीन तीन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापैकी पहिले लसीकरण केंद्र गुरुवारी (दि. 6) सुरू करण्यात आले. आज पहिलाच दिवस असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांनी पहाटे पाच वाजल्यापासूनच गर्दी केली होती. या केंद्रावर 18 ते 45 वयोगटासाठीही लसीकरण करण्यात आले. कर्जत उप जिल्हा …
Read More »आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई; सुधागडातील दांड कातकरवाडीतील महिलांची घोटभर पाण्यासाठी वणवण
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आदिवासी वाड्यांना भीषण पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, दांड कातकरवाडीतील लहानग्यांसह वृद्ध महिलांची घोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात फरफट होत असल्याचे चित्र दिसून येतंय. उन्हाळ्यात उद्भवणार्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील काही गावात नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. तर बहुतांश ठिकाणी नदी, विहिरी, तलावांतील पाण्याचा वापर …
Read More »