Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

भंगार गोदामातील कचर्‍याला आग

महाड औद्योगिक क्षेत्राजवळील घटना : धुरामुळे नागरिकांना त्रास महाड : प्रतिनिधी महाड औद्योगिक क्षेत्रातील कांबळे तर्फे महाड या गावाजवळ असलेल्या बंद भंगार गोदामातील रासायनिक कचरा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लावल्याने गेली चार दिवस धुमसणार्‍या आगीतून निघणार्‍या धुरामुळे परिसरातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील …

Read More »

चौकमध्ये स्वच्छतेला सुरूवात; सरपंच रितु ठोंबरे यांचा पुढाकार

चौक : प्रतिनिधी चौक बाजारपेठेमधील अतिक्रमण हटवल्यावर तेथील स्वच्छ करून सरपंच रितु ठोंबरे यांनी मोकळ्या हवे बरोबर स्वच्छ चौक करण्यास सुरूवात केली आहे. चौक गाव हे बकाल स्वरूप घेऊन होते. सरपंच रितु ठोंबरे व त्यांच्या टीमने अतिक्रमण मोहीम सुरू करून ती यशस्वी केली. अतिक्रमण हटविण्यात आल्यावर त्या जागेत मच्छी, चिकन …

Read More »

बापूजी महाराजांच्या यात्रेला अलोट गर्दी

माणगाव तालुक्यातील नांदवीचे ग्रामदैवत ; खालूबाजाच्या तालावर पालखी नाचवली अलिबाग : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील नांदवीचे ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यानिमित्ताने पंच क्रोशीतील हजारो भाविकांनी श्री बापूजी महाराज यांचे दर्शन घेतले. उत्सवानिमित्त मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर मूर्तीला वस्त्रालंकारानी सजवण्यात …

Read More »

माणगावजळ अपघातात तिघांचा मृत्यू

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर माणगावच्या इंदापूरजवळ शुक्रवारी (दि. 7) सकाळी 6.30च्या सुमारास मारुती इस्टीलो कार आणि आयशर टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात मुंबईच्या बोरीवली येथील तावडे कुटुंबातील आजीसह दोन नातवांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो (जीए 03 के 5990) म्हापसे (गोवा) …

Read More »

भाजप स्थापना दिनी कर्तृत्ववान ज्येष्ठांचा सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांनी देश प्रगती करतोय -आमदार प्रशांत ठाकूर महाड : प्रतिनिधी आज आपला भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे प्रगती करीत आहे तसेच भारतीय जनता पक्षाला जगात एक स्थान निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाड येथे केले. भाजप स्थापना दिनानिमित्त …

Read More »

पेणच्या गणेशमूर्तिकारांनी घेतली आमदार महेंद्र दळवी यांची भेट

पेण : प्रतिनिधी पेणच्या श्री गणेश मुर्तीकारकांनी आपल्या विविध मागण्या तसेच पीओपी वरील बंदी कायमची उठविण्याची मुख्य मागणी घेऊन उपजिल्हाप्रमुख रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गेल्या काही वर्षांपासून पेणच्या गणेश मुर्तीकारांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. पेण शहरासह तालुक्यातील शेकडो तरुण या …

Read More »

मच्छीमारांच्या समस्या शासनाने तातडीने सोडवाव्यात

आमदार रमेश पाटील यांची मागणी; केंद्राकडे पाठपुरावा करणार -मंत्री मुनगंटीवार मुरुड : प्रतिनिधी कोकण किनारपट्टीवरील सागरी जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या समस्यांबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये भाजप आमदार व कोळी महासंघाचे …

Read More »

जिते सरपंचासह असंख्य कार्यकर्ते भाजपत

गावच्या विकासकामातून कायापालट करणार : जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनी व हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत जिते ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया म्हात्रे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार रवीशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर व जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपत प्रवेश केला. या प्रवेशामुळे पेण …

Read More »

शिवपुण्यतिथीनिमित्त हजारो शिवभक्तांचे किल्ले रायगडावर अभिवादन

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि परिसरातील प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील -ना. मंगलप्रभात लोढा महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 343व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर गुरुवारी (दि. 6) हजारो शिवभक्तांनी अभिवादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, …

Read More »

म्हसळ्यात कॅपिझ शेलचा अवैध साठा जप्त; पाच जण ताब्यात

अलिबाग : प्रतिनिधी वन विभागाच्या पथकाने म्हसळा तालुक्यातील देवघर येथे सुरू असलेल्या कॅपिझ शेल या सागरी वन्यजीवाच्या अवशेषांचा अवैध व्यापारावर मंगळवारी (दि. 4) धाड टाकली. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रोहा उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून देवघर येथील सर्व्हे क्रमांक 1/3 या ठिकाणी कॅपिझ शेलच्या …

Read More »