Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

धुळेवाडी संघ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा मानकरी

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील तळवडे येथील जय गणेश क्रिकेट संघाने आणि शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मिलिंद विरले यांनी पुढाकार घेऊन आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. चार दिवस रंगलेली ही स्पर्धा जय भवानी धुळेवडी या संघाने स्थानिक तळवडे बुद्रुक येथील महालक्ष्मी इलेव्हन संघाचा पराभव करून जिंकली व आमदार चषक पटकाविला. …

Read More »

चौल-भोवाळे संघ सीपीएलचा विजेता

रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा हरेश्वर मैदानात नुकतीच चौल प्रीमिअर लीग (सीपीएल) मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा रंगली. या स्पर्धेत श्री दत्त चौल-भोवाळे संघाने विजेतेपद पटकाविले, तर खास बॉईज आग्राव संघ व्दितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. स्पर्धेत चौल ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या चौल, सराई, आग्राव, चुनुकोळीवाडा या परिसरातील खेळाडूंचा सहभाग होता. स्पर्धेत …

Read More »

पेणजवळ भीषण अपघात; तिघे ठार, पाच जण जखमी

पेण ः प्रतिनिधी पेण-खोपोली मार्गावर पेणजवळ वाक्रुळ येथे रविवारी (दि. 19) संध्याकाळी ट्रक आणि इकोची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर पाच जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व मयत आणि जखमी हे संत बाळूमामांच्या यात्रेसाठी इको (एमएच ए-1003)मधून कोल्हापूरच्या दिशेने चालले होते, तर ट्रक (एमएच 43- बीजी …

Read More »

रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका; माजी उपनगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

धाटाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्लात भाजपने सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. रोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 18) पनवेल येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे रोह्यात …

Read More »

महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

कर्जतकरांनी घेतले कपालेश्वराचे दर्शन; तालुक्यातही महाशिवरात्री साजरी कर्जत : प्रतिनिधी महाशिवरात्री असल्याने कर्जत तालुक्यातील महादेवाच्या प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तालुक्यातील प्रत्येक मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. बहुतांश मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी कपालेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री …

Read More »

धनुष्यबाण चिन्ह मिळताच शिंदे गटाचा खोपोलीत जल्लोष

खोपोली : प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देताच राज्यात शिंदे गटाने जल्लोष साजरा केला. या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील जागेत एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करीत मिठाईचे वाटप केलेयावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी …

Read More »

मोहाचीवाडी-फणसवाडी रस्त्याचा लोकार्पण सोहळा

आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती कर्जत : प्रतिनिधी नेरळ ग्रामपंचायतीमधील मोहाचीवाडी ते फणसवाडी या रस्त्याचे काँक्रिटकरण करण्यात आले आहे. कर्जत राज्यमार्ग रस्ता ते मोहाची वाडी आणि तेथून पुढे फणसवाडी या रस्त्याची अनेक वर्षे दुरवस्था झाली होती. 2009 मध्ये या रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर दहा …

Read More »

धनुष्यबाण चिन्ह मिळताच नागोठण्यात जल्लोष

नागोठणे : प्रतिनिधी बाळासाहेब् ठाकरे यांच्या विचारावर चालणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला शिवसेनेच नाव आणी धनुष्यबाण चिन्ह मिळताच बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांनी नागोठणे येथील शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या जल्लोषात साजरा केला. बाळासाहेबांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणी ते विचार …

Read More »

मुरुडमध्ये शिंदे गटाचा जल्लोष; फटाके फोडले

मुरुड : प्रतिनिधी भारतीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्य बाण चिन्ह व शिवसेना नावाची मान्यता मिळताच शनिवारी मुरुड शहरातील बाजारपेठेत मोठ्या संख्येने शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. तसेच सर्वाना पेढे भरून तोंड गोड करण्यात आले. आज कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला विजयाच्या मोठ्या घोषणा सुद्धा देण्यात …

Read More »

वृक्षांची कत्तल आणी वणव्यामुळे दुर्मिळ पक्ष्यांचे अधिवास संपुष्टात

खोपोली : प्रतिनिधी वृक्षांच्या बेसुमार तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्याचबरोबर पक्ष्यांचे निवासस्थान असलेल्या वृक्षांवर आपण घाव घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पक्ष्यांचे अधिनिवास नष्ट होत चालले आहेत. पूर्वी जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्ष असायचे त्याचबरोबर पक्ष्यांचे मंजुळ स्वरही कानी पडत असत. मात्र मानवानी स्वताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी  वृक्षांच्या मुळावर घाव …

Read More »