Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतमध्ये ज्येष्ठ नागरिक सभागृहाचे भूमिपूजन

कर्जत : प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधण्याच्या कामाचे   भूमिपूजन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगर परिषद क्षेत्रातील नाना मास्तर नगर येथील व्यायाम शाळेवर पत्र्याची शेड टाकण्याचा शुभारंभही करण्यात आला. नगर परिषदेचे बांधकाम सभापती विवेक दांडेकर, स्थानिक नगरसेवक भारती पालकर, धनंजय दुर्गे,  मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगर …

Read More »

ग्रामविकास अधिकार्याचे दर्शन झाले दुर्लभ

नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प कर्जत : बातमीदार नेरळचे ग्रामविकास अधिकार्‍याचे ग्रामपंचायत कार्यलयात दर्शन दुर्लभ झाले आहे. बॉडीगार्ड तरुणांच्या गराड्यात असलेले ग्रामविकास अधिकारी अनंत सुळ यांची शहरातील नागरिकांना प्रतीक्षा लागून राहिली असून, ग्रामविकास अधिकार्‍याविना ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सलग तीन वर्षे एकही ग्रामविकास अधिकारी काम करू शकला नाही. …

Read More »

जलदुर्गांवर जाण्यासाठी तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा

मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा व पद्मदुर्ग या समुद्रातील किल्ल्यांवर जाण्यासाठी तरंगती जेट्टी व्हावी, अशी अपेक्षा गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यटक व स्थानिक नागरिक करीत आहेत. मात्र पुरातत्व विभाग व महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड या खात्यांमध्येच सुसंवाद नसल्याने या ठिकाणी तरंगती जेट्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तरंगती …

Read More »

हेटवणे धरणाच्या तीन हजार एकर क्षेत्रातील भातलागवडीचे काम पूर्ण

पेण : प्रतिनिधी हेटवणे धरण कालव्याच्या शेतीसाठी सोडण्यात येणार्‍या सिंचनाच्या पाण्यावर आधारित भात लागवडीच्या 3000 एकर क्षेत्रातील भातपीक लागवडीच्या काम शेतकरी बांधवांनी पूर्ण क्षमतेने करून 10 दिवसांचा कालावधी लोटला आहे. शेतकरी बांधवांनी उन्हाळी हंगामात तब्बल 1300 एकराहून अधिक क्षेत्रावर भातपीक लागवड केल्याने या अगोदर असलेल्या 1700 एकर क्षेत्रात भर पडून …

Read More »

रायगड जिल्ह्यात जमावबंदी लागू

अलिबाग : प्रतिनिधीराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढीस लागला असून, रायगड जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी …

Read More »

रखडलेला भीमाशंकर मार्ग होणार राष्ट्रीय महामार्ग

रस्ते वाहतूक मंत्रालयाची तत्त्वता मान्यता नेरळ : बातमीदारभीमाशंकर या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी आणि जवळचा मार्ग ठरू शकेल अशा पनवेल-नेरळ-खेड-मंचर या राज्यमार्गाचे काम रखडले आहे. राज्य सरकारने हा प्रकल्प अडगळीत टाकला असून, या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग असा दर्जा द्यावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक कर्जतचे …

Read More »

कर्जतचे प्रसादबुवा पाटील यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान

कर्जत : बातमीदार भजनभूषण गजाननबुवा पाटील यांचे चिरंजीव आणि देशविदेशात भजनाचे कार्यक्रम करणारे प्रसादबुवा पाटील यांना नवी मुंबई येथील अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कै. गजाननबुवा पाटील यांचा भजन गायनाचा वारसा प्रसादबुवा पाटील समर्थपणे जपत असून, प्रसादबुवा यांनी स्वतः अनेक ओव्या …

Read More »

नागोठणे ग्रामपंचायतीकडून नागरिकांना आवाहन

नागोठणे :  प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने पुन्हा डोके बाहेर काढले आहे. शहरात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नसला तरी,  नागरिकांनी पूर्ण दक्षता घेताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले आहे. नव्या कोरोनाविषयी जनजागृती होण्यासंदर्भात संपूर्ण शहरात दवंडीसुद्धा देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गतवर्षी  कोरोनाच्या …

Read More »

नागोठण्यात बिबट्याचे दर्शन

नागोठणे : प्रतिनिधी अनेक दशकानंतर नागोठणे शहराच्या परिसरात मंगळवारी रात्रीच्या दरम्यान एका व्यक्तीला बिबट्याचे दर्शन झाले. नागोठणे शहरात मुंबई- गोवा महामार्गालगत असणार्‍या एका हॉटेलच्या परिसरात वाघ फिरत असल्याचे एक व्यक्तीच्या निदर्शनास आले. त्याने उत्सुकतेने आपल्या मोबाइलवर त्याचे चित्रणसुद्धा केले. महामार्गावरून जाणार्‍या वाहनांच्या आवाजामुळे घाबरून हा वाघ तेथून निघून गेला. ही …

Read More »

कोरोनाचे नियम पाळणार्यांनाच बल्लाळेश्वराचे दर्शन

पाली : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा गडद होऊ लागले आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोरोना संदर्भातील नियम कठोर करण्यात आले आहेत. त्यानुसार मास्क न लावणार्‍यांना अष्टविनायक  क्षेत्रापैकी पाली (ता. सुधागड) येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेता येणार नसल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांनी बुधवारी (दि. 24) पत्रकारांना दिली.  जिल्हाधिकार्‍यांच्या …

Read More »