Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

किल्ले रायगड ते अलिबाग शिवज्योत

शिवजयंतीनिमित्त कुलाबा क्रीडा प्रबोधिनीच्या मावळ्यांचा उपक्रम अलिबाग ः प्रतिनिधीहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती बुधवारी (दि. 31) साजरी झाली. यानिमित्ताने अलिबागच्या कुलाबा क्रीडा प्रबोधिनीतर्फे किल्ले रायगड ते अलिबागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचे 125 किमी अंतर 12 तासांत शिवज्योत घेऊन धावत 50 शिवभक्तांनी पूर्ण केले.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे …

Read More »

तीन जणांचे बळी घेणार्या स्पॉटवर गतिरोधक

पोलीस प्रशासनाचा पुढाकार कर्जत : बातमीदार कर्जत-कल्याण राज्यमार्गावर सोमवारी झालेल्या  अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर या राज्यमार्गावरील अपघात प्रवण क्षेेत्रात गतिरोधक उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील डिकसळ येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर सोमवारी (दि. 29) भरधाव वेगाने आलेल्या हुंडाई एक्ससेंट कारने रिक्षेला धडक दिली …

Read More »

मुरूड पालिकेत सत्ताधारी-विरोधकांचे साटेलोटे

भाजपचे ज्येष्ठ नेते जनार्दन कंधारे यांचा आरोप मुरूड : प्रतिनिधी शहरातील बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, नागरिकांना अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, मात्र नगर परिषदेतील विरोधी पक्ष त्याबाबत बोलताना दिसत नाही. अर्थसंकल्पावरदेखील विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मुरूड नगर परिषदेतील विरोधी पक्षांचे सत्ताधारी पक्षाशी साटेलोटे असल्याचे दिसून …

Read More »

माजी जि. प. सदस्य अनिल नलावडे भाजपमध्ये

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांकडून स्वागत पोलादपूर ः प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल नलावडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी नलावडे यांचे स्वागत केले.या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, शहराध्यक्ष राजा दीक्षित, भाजपचे नेते राजू धुमाळ, …

Read More »

काजू बियांचा भाव घसरला; कोकणातील बागायतदार चिंताग्रस्त

महाड ः रामप्रहर वृत्त हवामानात सातत्याने होणारे बदल, किडीचा प्रादुर्भाव यामुळे यंदा काजूचे उत्पन्न हवे तसे हाती आले नाही, त्यातच काजू बियांचा भाव घसरल्याने काजू बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. कोकणातील मंडणगड, दापोली, लांजा, वेंगुर्ला,  सावंतवाडी, रत्नागिरी, महाड, पोलादपूर, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन परिसरात काजूची लागवड मोठ्या प्रमाणवर आहे. काही ठिकाणी …

Read More »

बकर्‍या चोरणार्‍यांना कर्जत पोलिसांच्या बेड्या

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शहरातील भिसेगाव परिसरात राहणार्‍या एका धनगराच्या घराशेजारील गोठ्यातून 11 मेंढी, बोकड, बकरी असा एकुण 60हजार रुपये किमतीचा माल  अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. कर्जत पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. भिसेगाव येथील जुन्या बस स्टॅन्ड परिसरात राहणार्‍या दीपक दिगंबर धनगर यांच्या घराच्या बाजुला असलेल्या गोठ्यातून अज्ञात …

Read More »

रायगडात 95 हजार जणांचे लसीकरण

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग हळुहळू वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 94 हजार 912जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात 41हजार 603ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात 16जानेवारीला करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरूवातीला आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पोलीस आणि …

Read More »

महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे काम ठप्प; प्रवाशांसह वाहनचालक त्रस्त

महाड : प्रतिनिधी महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ – पंढरपूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे त्यात अधिक भर पडली असून, नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहेत.म्हाप्रळ-पंढरपूर हा राज्यमार्ग महाडजवळून गेला आहे. …

Read More »

दर्जेदार शिक्षणावर भर देणे आवश्यक -संतोष दौंड; कर्जतच्या जांभिवली केंद्र शाळेत पुस्तक प्रकाशन सोहळा

कर्जत : प्रतिनिधी शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. कर्जत तालुका शिक्षणात अग्रेसर असावा यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. पुस्तक प्रकाशन करणे हे एक धाडसाचे काम आहे, असे प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड नुकतेच जांभिवली (ता. कर्जत) येथे केले. जांभिवली केंद्र शाळेतील शिक्षिका माधवी कोसमकर यांच्या ’जीवनगाथा’ या पुस्तकाचे …

Read More »

अलिबागच्या पांढर्‍या कांद्यावर राज्यातील पाच जिल्ह्यांत संशोधन

कर्जत : संतोष पेरणे                             अलिबागचा पांढरा कांदा हा चिखट चव देणारा असतो आणि त्यामुळे या कांद्याला मोठी मागणी असते. त्याचे उत्पादन राज्यातील अनेक भागात घेता यावे, यासाठी पांढर्‍या कांद्याला मानांकन मिळविण्याकरिता राज्य कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने भाताचे वाण विकसित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत कृषी संशोधन केंद्रात यावर्षी …

Read More »