Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खालापुरात दोन वाहने उलटली

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील महामार्गावर रविवारी (दि. 4) सकाळी दोन वाहने उलटण्याच्या घटना घडल्या असून, त्यात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई – पुणे महामार्गावरील हॉटेल बागेश्री जवळ रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास खोपोलीकडून पनवेलच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच-46,एएफ-2500)  उलटला तर खोपोली – पेण मार्गावर …

Read More »

पेणमध्ये हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

पेण : प्रतिनिधी महावितरणने थकीत वीज देयकांची वसुलीसाठी पेण तालुक्यात मोहीम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून दोन हजार वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे.  पेण तालुक्यात 58 हजार 220 वीज ग्राहक असून  त्यातील 19 हजार 195 जणांनी गेल्या सहा महिन्यांतील वीज देयके वेळेवर भरलेली नाहीत. या ग्राहकांकडून …

Read More »

कर्जत तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

सर्वाधिक 74 रुग्णांची नोंद; माथेरान ठरतेय हॉटस्पॉट कर्जत : बातमीदार तालुक्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू लागला आहे. रविवारी (दि. 4) कर्जत तालुक्यात 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, शनिवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात घाबराट पसरली आहे. मागील महिन्यापासून कर्जत तालुक्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले …

Read More »

नवोपक्रम स्पर्धेत कर्जत शिक्षण विभागाची बाजी

यु ट्यूब चॅनेल ठरतेय भारी कर्जत : बातमीदार तालुका शिक्षण विभागाच्या ’शिक्षण क्रांती’ यू ट्यूब चॅनलच्या कोरोना काळातील कामगिरीने राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आयोजित राज्यस्तरीय नवोप्रकम स्पर्धेत भरारी घेतली आहे. या उपक्रमाने कर्जत तालुका राज्यात चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्या प्रयत्नाने तसेच …

Read More »

ओलमण-चेवणे रस्ता आठ दिवसातच उखडला

कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख-ओलमन-चेवणे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता काही दिवसातच उखडला असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात  खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक संताप व्यक्त करत असून, संबंधीत अधिकार्‍यांनी  पाहणी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वर्षोनुवर्षे …

Read More »

अलिबागचे पोलीस ठाणे होणार बालस्नेही

अलिबाग : प्रतिनिधी येथीले पोलीस ठाणे लवकरच बालस्नेही होणार आहे. बालकांच्या तक्रारी निराकरण, गुन्ह्यात अडकलेल्या बालकांचे पुनर्वसन आणि समुपदेशन करण्याचा प्रयत्न या बालस्नेही पोलीस केंद्रामार्फत केला जाणार आहे. कोकणात पहिल्यांदाच ही संकल्पना पोलिसांच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. अलिबाग पोलीस ठाण्याच्या समोरील भागात या बालस्नेही पोलीस केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. …

Read More »

कर्जत तालुक्यात शिधापत्रिकेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम

गॅसजोडणीधारकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची भीती कर्जत : बातमीदार स्वस्त धान्य दुकादारांकडील शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी कर्जत तालुक्यात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांनी भरून द्यावयाच्या अर्जाच्या मागील भागात हमीपत्राचा मुद्दा दिला आहे. त्यात माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास सदर शिधापत्रिका …

Read More »

सुक्या मच्छीचा दुष्काळ

कोळी बांधवांची खळी पडली ओस रेवदंडा : प्रतिनिधी स्थानिक खाडीत मच्छीमारी करणार्‍या कोळी बांधवांच्या जाळ्यात फार थोडी मच्छी सापडत असल्याने  रेवदंडा परिसरात सुक्ुया मच्छीचा दुष्काळ जाणवत आहे. त्यामुळे पर्सीयन जाळ्याच्या बोटी व चक्रीवादळ यांच्या विळख्यात सापडलेल्या कोळी बांधवाची अवस्था बिकट झाली आहे. स्थानिक कोळी बांधव खाडीलगत तसेच समुद्रात काही अंतरावर …

Read More »

विधवा महिलेच्या जमिनीचे पैसे दलालाने लाटले

गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; कर्जत सापेले येथील घटना; आरोपी फरार कर्जत : बातमीदार तालुक्यातील सापेले गावामधील एका 62 वर्षीय विधवा महिलेच्या जमिनीची विक्री करून दलालाने ते पैसे हडप करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कर्जत पोलिसांनी संबंधीत दलालावर गुन्हा दाखल केला आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सापेले …

Read More »

सुधागडमधील शिळोशीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील शिळोशीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. शिळोशी येथील तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय गुरुवारी (दि. 1) कामधंद्याकरिता बाहेर गेले असता फिर्यादी यांची सात वर्षांची नात घराच्या ओटीवर एकटीच खेळत …

Read More »