पेण : प्रतिनिधी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण रामवाडी येथील डॉ. विशाल पाटील यांच्या पद्म सुपरस्पेशालिटी आय केयर सेंटर येथे नुकतीच पेण तालुक्यातील सुमारे 100रिक्षाचालकांसह वाहतूक पोलिसांची नेत्रतपासणी करण्यात आली. डॉ. विशाल पाटील यांनी वाहनचालकांची नेत्रतपासणी केली. वाहन चालवताना डोळ्यासमोर अंधार अथवा …
Read More »राष्ट्रीय सायकल स्पर्धेत अॅरड. गजानन डुकरे प्रथम; कर्जत दिवाणी न्यायालयात सत्कार
कर्जत : बातमीदार येथील अॅड. गजानन डुकरे यांनी विधी क्षेत्रा व्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात केलेला विक्रम हा न्यायालयासाठी आणि बार असोसिएशनसाठी मोठा सन्मानच आहे, असे गौरवोद्गार कर्जत दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश मनोज तोकले यांनी नुकतेच येथे काढले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट टायगर राईड विथ नॅशनल फ्लॅग या …
Read More »आडोशी बोगद्याजवळ बसची ट्रकला धडक; एक महिला जखमी; अन्य प्रवासी बचावले
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गुरुवारी (दि. 11) सायंकाळी भरधाव वेगाने जाणार्या बसने अज्ञात ट्रकला धडल दिली. या अपघातात एक महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली असून, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. सुदैवाने बसमधील अन्य प्रवासी बचावले आहेत. मुंबईकडे भरधाव वेगात चाललेल्या बसचा आडोशी बोगद्याजवळ ब्रेक निकामी झाल्याने बस …
Read More »अवैध वाळू उत्खननाविरोधातील राबगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण स्थगित
पाली : प्रतिनिधी अवैद्य वाळू उत्खननाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी (दि. 9) रात्री सुधागड तालुक्यातील राबगाव ग्रामस्थांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले. राबगाव हद्दीतील अंबा नदीमधून अवैध व अनधिकृतपणे सुरू असलेल्या वाळू उत्खननाविरोधात यशवंत भोईर, दिलीप मोरे, अनिल भोईर, भिमाजी भोईर, विठोबा …
Read More »ठाकरे कुटुंबीयांच्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करा
भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणीरायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन अलिबाग : प्रतिनिधीमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केली आहे. या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी द्यावेत, या मागणीसाठी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी (दि. 10) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर …
Read More »कर्जतमधील रूचिता सोलंकी घेणार दीक्षा
कर्जत : प्रतिनिधी येथील कांताबाई सोगमलजी सोलंकी परिवारातील रूचिता सोलंकी सोमवारी (दि. 15) दीक्षा (संन्यास) घेणार आहे. संन्यास घेणारी ती कर्जत शहरातील दुसरी मुलगी ठरणार आहे. सोलंकी परिवारातील सुभाष कविता सोलंकी यांची कन्या रूचिता (25) हिने इंटरिअर डिझायनर केले आहे. सामाजिक कर्तव्याचा त्याग करून ती सोमवारी आध्यात्मिक कर्तव्याचा स्वीकार करणार …
Read More »वरवठणे ग्रामपंचायत आघाडीच्या ताब्यात
शेकापचा बालेकिल्ला ढासळला नागोठणे : प्रतिनिधी विभागातील वरवठणे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून असणारा शेकापचा बालेकिल्ला 25 वर्षांनंतर ढासळला असून, बुधवारी (दि. 10) झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजप (आमदार रविशेठ पाटील समर्थक), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामविकास आघाडीने आपला झेंडा रोवला आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत आघाडीच्या ऋतुजा गणपत म्हात्रे यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी विजय अशोक …
Read More »आडावळे खुर्दमधील शौचालय घोटाळ्याप्रकरणी ठेकेदार, ग्रामपंचायतीची कानउघाडणी
दोन सीटसाठी नव्याने बांधकाम सुरू पोलादपूर : प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील खुर्द येथे चार सीटऐवजी केवळ दोन सीटचे शौचालय बांधून कामाच्या बिलापोटीची सर्व रक्कम दोष निवारण कालावधी संपुष्टात येण्यापूर्वीच काढण्यात आल्याच्या गैरव्यवहाराकडे तत्कालीन गटविकास अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार हेमंत युवराज भोईटे यांनी विद्यमान गटविकास अधिकारी धनंजय जगताप …
Read More »तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आंब्याचे चांगले पीक मिळू शकते
शेतमजूर कौशल्य विकास प्रशिक्षणात तज्ज्ञांचा दावा कर्जत : बातमीदार शेतमजूर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील वडवली येथे नुकतेच आंबा मोहोर संरक्षण व फवारणी या विषयाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. आंबा उत्पादक शेतकरी या शिबिरात मोठ्या संंख्येने सहभागी झाले होते. तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आंब्याचे चांगले पीक मिळू शकते, …
Read More »श्रीवर्धनमध्ये मोकाट घोडे व गुरांचा उच्छाद
श्रीवर्धन : प्रतिनिधी मोकाट घोडे व गुरांच्या मुक्त संचारामुळे श्रीवर्धनमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे मोकाट घोडे व गुरे शेती-मळेही उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे श्रीवर्धनमधील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत, मात्र त्याकडे नगरपालिका डोळेझाकपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. श्रीवर्धन शहरातील वाणी आळी, बाजारपेठ, एसटी बसस्थानक व आगार परिसरात मोकाट …
Read More »