ठाकरे सरकारने फसवणूक केल्याची भावना अलिबाग ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत, तर वीकेण्डला दोन दिवस लॉकडाऊन असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र रायगड जिल्ह्यात इतर दिवशीदेखील लॉकडाऊनसारखी अंमलबजावणी सुरू झाल्याने व्यापारीवर्ग संतापला आहे. ठाकरे सरकारने फसवणूक केल्याची भावना …
Read More »अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने राहणार बंद -जिल्हाधिकारी
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत, मात्र कुठल्या प्रकारची दुकाने सुरू राहणार कुठली बंद राहणार याबाबत स्पष्टता होत नसल्याने सामान्य नागरीक आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हा संभ्रम दूर केला आहे. निर्बंध कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने …
Read More »कर्नाळा अभयारण्याला ध्वनीरोधक यंत्रणेचे कवच
अलिबाग ः प्रतिनिधीमुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यालगत ध्वनीरोधक यंत्रणेचे कवच बसविण्यात आले आहे. अभयारण्यातील पक्षी आणि वन्यजीवांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी हे साऊंण्ड बॅरिअर्स अर्थात ध्वनिरोधक बॅरिअर्स बसविण्यात आले आहेत.मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. हा राष्ट्रीय महामार्ग कर्नाळा पक्षी अभयारण्यातून जातो. त्यामुळे महामार्ग …
Read More »पोलादपूरातील नेटवर्कची समस्या होणार दूर
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे आश्वासन पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील मोबाईल तसेच लँडलाइन संपर्काचा सद्यस्थितीत बट्टयाबोळ उडाला आहे. तालुक्यातील बीएसएलएलची दूरध्वनी व भ्रमणध्वनी तसेच इंटरनेट सेवा जवळजवळ परांगदा झाल्यामुळे खासगी कंपन्यांच्या सुविधेसाठीही ग्रामीण जनतेकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी नेटवर्कअभावी होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर …
Read More »पेणच्या बहिराम कोटक येथील बंधार्याला उधाणाचा तडाखा
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शेकडो एकर शेती बचावली पेण : प्रतिनिधी जागतीक बँकेच्या सहकार्याने पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले येथील 17 किलोमीटरच्या बंधार्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र दोन दिवसांच्या उधाणाचा फटका या योजनेच्या कामाला बसला असून या योजनेतील बहिराम कोटक गावाजवळच्या बाह्यकाट्याला सकाळी नऊच्या सुमारास खांड गेली. मात्र ग्रामस्थ अमरचंद पाटील, रामकृष्ण पाटील, …
Read More »कर्जत खांडस भागात वणवा
300 एकरमधील वनसंपदा नष्ट; जनावरांच्या चार्याचाही प्रश्न कर्जत : बातमीदार तालुक्यातील खांडस भागात शनिवारी (दि. 3)अचानक लागलेल्या वणव्यात तब्बल 300 एकर जमिनीवरील गवत, झाडेझुडपे जळून नष्ट झाली आहेत. त्यामुळे आता प्रामुख्याने या भागातील जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच पाणीटंचाई असलेल्या या भागात लागलेला हा वणवा सर्वांच्या डोळ्यात पाणी …
Read More »रेवदंड्यामध्ये विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई
रेवदंडा : प्रतिनिधी येथील बाजारपेठेत विना मास्क फिरणार्यांवर रेवदंडा ग्रामपंचायत कर्मचार्यांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे येथून जा-ये करणारे प्रवासी तसेच ग्रामस्थांना चांगलाच धाक बसला असून आता प्रत्येकांच्या चेहर्यावर मास्क दिसू लागला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेवदंंडा ग्रामपंचायतीने मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे तसेच सुरक्षीत अंतर ठेवण्याचे आवाहन केले …
Read More »खालापुरात दोन वाहने उलटली
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील महामार्गावर रविवारी (दि. 4) सकाळी दोन वाहने उलटण्याच्या घटना घडल्या असून, त्यात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई – पुणे महामार्गावरील हॉटेल बागेश्री जवळ रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास खोपोलीकडून पनवेलच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच-46,एएफ-2500) उलटला तर खोपोली – पेण मार्गावर …
Read More »पेणमध्ये हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
पेण : प्रतिनिधी महावितरणने थकीत वीज देयकांची वसुलीसाठी पेण तालुक्यात मोहीम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून दोन हजार वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पेण तालुक्यात 58 हजार 220 वीज ग्राहक असून त्यातील 19 हजार 195 जणांनी गेल्या सहा महिन्यांतील वीज देयके वेळेवर भरलेली नाहीत. या ग्राहकांकडून …
Read More »कर्जत तालुक्यात कोरोनाचा उद्रेक
सर्वाधिक 74 रुग्णांची नोंद; माथेरान ठरतेय हॉटस्पॉट कर्जत : बातमीदार तालुक्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू लागला आहे. रविवारी (दि. 4) कर्जत तालुक्यात 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, शनिवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात घाबराट पसरली आहे. मागील महिन्यापासून कर्जत तालुक्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले …
Read More »