Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अलिबाग ‘रोटरी’चा पदग्रहण सोहळा

डॉ. किरण नाबर यांची अध्यक्षपदी निवड अलिबाग : प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोरच्या अध्यक्षपदी डॉ. किरण नाबर यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष जगदिश राणे यांच्याकडून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. सचिवपदी निमिश परब यांची, तर खजिनदारपदी डॉ. राजेंद्र चांदोरकर यांची नियुक्ती झाली आहे. कार्यकारीणीचा पदभार समारंभ झुम मिटींगच्या …

Read More »

कोरोना संसर्ग वाढतोय, तरीही गांभीर्य नाही!

अनेक जण मास्कविना कर्जत : प्रतिनिधी – कर्जत शहरात नगर परिषदेने मास्क न लावणार्‍यांवर दंड आकारणीची मोहीम सुरू केली आणि लोक मास्क लावू लागले, मात्र अद्यापही अनेकांना याचे गांभीर्य समजत नाही की, आम्हाला काहीच होणार नाही या आविर्भावात ते वावरताना दिसतात. काही लोक ते लावायचा म्हणून लावतात तसेच बाजारपेठेत फिरणार्‍या …

Read More »

माणगाव पोलीस ठाण्यात झाला कोरोनाचा शिरकाव

अधिकारी व कर्मचार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह माणगाव : प्रतिनिधी – माणगाव पोलीस ठाण्यात कोरोनाने शिरकाव केला असून, येथील एका अधिकार्‍याचा व एका कर्मचार्‍याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलीसवाले धास्तावले आहेत. माणगावमध्ये एका पोलीस अधिकार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या अगोदर एका पोलीस कर्मचार्‍याला कोरोना झालेला आहे. उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालयापाठोपाठ आता …

Read More »

महाड बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाड : प्रतिनिधीगेल्या चार दिवसांत महाडमध्ये अचानक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी शहरात आठ दिवसांचा कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला महाडकरांनी सोमवारी (दि. 6) उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, शहरात दारूविक्री मात्र सुरूच आहे. महाडमध्ये शुक्रवारी अचानक 14 कोरोना रुग्ण आढळले असून, बाधितांची एकूण संख्या …

Read More »

रेवदंड्यातील चक्रीवादळग्र्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

रेवदंडा : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळ येऊन एक महिना उलटून गेला तरी राज्य शासनाकडून अद्याप काही ठिकाणी नुकसानभरपाईचे वाटप झालेले नाही. अशाच प्रकारे रेवदंडा व थेरोंडा येथील चक्रीवादळग्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. रेवदंडा परिसराला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील घरांची पडझड होऊन ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात बेघर …

Read More »

ग्राहकांना वाढीव वीज बिले दिल्याने भाजप आक्रमक

कर्जतमध्ये शिष्टमंडळाचे महावितरणला निवेदन कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात लॉकडाऊन काळामध्ये वीज मिटरचे रिडींग न घेता ग्राहकांना अवाजवी बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, वाढीव बिले तातडीने रद्द करून नवीन बिले ग्राहकांना द्यावीत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या उपअभियंत्यांची भेट घेऊन केली आहे. या …

Read More »

श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणतर्फे रोहा पोलीस ठाण्याला 20 बॅरीकेडस

रोहे : प्रतिनिधी – डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठण रेवदंडाच्या वतीने नेहमीच समाज प्रबोधनाचे कार्य चालु असते. समाह प्रबोधनाबरोबर अनेक समाज हिताचे उपक्रम राबविले आहे. समाज प्रबोधनाबरोबर समाज हिताचे उपक्रम राबविण्यात येत असुन या उपक्रमा अंतर्गत रोहा पोलीस स्टेशनला 20 बॅरीकेडस देण्यात आले आहेत. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्टान, रेवदंडा …

Read More »

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला; लावणीची कामे सुरू

माणगाव : प्रतिनिधी – गेल्या आठ ते दहा दिवस खंड घेतलेल्या पावसाने शनिवार 4 जुलै पासून पुनः दमदार सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून पुन्हा लावणींच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे.  7 जूनला सुरू झालेल्या पावसाने शेतातील तरवे तरारले होते. 22 जूनच्या आसपास लावणीच्या कामांना सुरुवात झाली होती. मात्र गेल्या दहा …

Read More »

चक्रीवादळग्रस्तांना मदतीचा हात

पाली ः प्रतिनिधी कोरोना आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद सेवा मंडळ, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ व ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील दर्यागाव, पंचशील नगर, झेंडेवाडी येथील 250 चक्रीवादळग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चक्रीवादळामुळे अनेक जणांचे नुकसान झाले असून घरातील जीवनावश्यक सामान व …

Read More »

नागोठण्यात वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव

नागोठणे ः प्रतिनिधी शहरासह विभागाची कोरोना रुग्णांची दोन महिने पाटी कोरी असतानाच काही दिवसांपासून कोरोनाने येथे शिरकाव करीत रोज आपली संख्या वाढतीच ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात चार दिवसांपूर्वी ब्राम्हण आळीतील एका सरकारी कर्मचार्‍याला कोरोनाची लागण लागल्यावर संबंधित व्यक्तीच्या 55 वर्षीय आईलाही कोरोनाने गाठले आहे. येथील सूर्यदर्शन कॉलनीच्या परिसरात चार …

Read More »