अलिबाग : प्रतिनिधी रेशनकार्ड नसलेल्या व्यक्तींनाही धान्याचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यासाठी रायगड जिल्हा पुरवठा विभागाने इझिफॉर्मस हे मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले आहे. या अॅपमुळे काम करणे सुकर झाले आहे. त्यामुळे रायगडचे हे अॅप आता राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये वापरले जात आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना धान्य …
Read More »रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी
पाली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात रुग्णांना रक्ताची सातत्याने गरज भासते. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिहूतील युवकांच्या संकल्पनेतून रविवारी (दि. 25) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शिहू बेणसे विभागातील नागरिकांसह तरुण व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. डॉ. पुरुषोत्तम भोईर …
Read More »जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांनी माहिती लपवू नये
प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांचे आवाहन पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणार्या नागरिकांनी आपली माहिती न लपविता प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे. चौथ्या टप्प्यामध्ये लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आल्याने अनेक नागरिक जिल्ह्याबाहेरून …
Read More »नागोठणे ग्रामपंचायतीकडून मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ
नागोठणे ः प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आल्याने येथील ग्रामपंचायतीच्या वतीने नालेसफाईच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. 7 जूनपर्यंत शहराच्या सर्व भागातील कामे पूर्ण होतील, असा विश्वास सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आणि ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांनी व्यक्त केला आहे. कोरोना विषाणूंचा शहरात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात …
Read More »माणगावात कोविड 19 रूग्णालय सज्ज
35 दिवसांत केले नूतनीकरण; रुग्णांना दिलासा माणगाव ः प्रतिनिधी जगभरात थैमान घातलेल्या कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचबरोबर कोरोनाग्रस्त रुग्णांंचे निदान करणारी यंत्रणा शासन तातडीने उभारत आहे. याचाच एक भाग म्हणून माणगाव उपजिल्हा रुग्णालय कोविड 19करिता सुसज्ज करण्यासाठी एक महिन्यापूर्वी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सूचना केली होती. या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यासाठी …
Read More »कोरोनामुळे पालीत कडकडीत बंद
सुधागड : रामप्रहर वृत्तसुधागड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळळल्याने खबरदारी म्हणून पाली बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा ग्रामपंचायत आणि व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. या बंदला मंगळवारी (दि. 26) पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका सुरक्षित होता, मात्र दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातील नागशेत येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह …
Read More »रायगडात दोघांचा मृत्यू; 39 नवे रुग्ण
पनवेल : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, 39 रुग्ण आढळले आहेत. मुरूड व अलिबागमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर अलिबाग नऊ, पनवेल महापालिका व रोहा प्रत्येकी आठ, माणगाव तीन, खालापूर, मुरूड, श्रीवर्धन व पोलादपूर प्रत्येकी दोन, पनवेल ग्रामीण, पेण व तळा प्रत्येकी एक असे नवे …
Read More »रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी; शिहूतील युवकांचा उपक्रम
पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या संकटात रुग्णांना रक्ताची सातत्याने गरज भासते. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिहूतील युवकांच्या संकल्पनेतून रविवारी (दि. 25) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शिहू बेणसे विभागातील नागरिकांसह तरुण व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. डॉ. पुरुषोत्तम …
Read More »रोहा तालुक्यात आठ नवे कोरोना पॉझिटिव्ह
रोहे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात पाच कोरोना रुग्ण आढळल्याची ताजी असताना आणखी आणखी आठ व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या संख्या 13 झाली आहे. मुंबई येथून 23 मे रोजी रोहा तालुक्यातील ऐनवहाळ आणि भालगाव येथे आलेल्या पाच व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्या होत्या. या व्यक्तींच्या संपर्कात …
Read More »महाकाय ट्रेलरने रोखला मुंबई-पुणे महामार्ग
खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील अंबानी रुग्णालयासमोर मंगळवारी (दि. 26) सकाळी एक महाकाय ट्रेलर अडकला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अवजड वस्तू वाहून नेणारा ट्रेलर मुंबई लेनवरून पुणे लेनवर येत होता. त्या वेळी महामार्गाच्या मधील उंचवट्यावर ट्रेलरचा खालील भाग लागला आणि हा …
Read More »