राज्य सरकारने मदत करण्याची अपेक्षा उरण : प्रतिनिधीआधीच पावसाळी हंगामातील दोन महिने मासेमारी बंदी, त्यानंतर खराब हवामानाबरोबरच मासेमारी सुरू करण्याच्या हंगामातच चक्रीवादळांच्या मालिकेमुळे सुमारे पाच-सहा महिन्यांच्या मासेमारीचा हंगाम पुरता वाया गेला असतानाच कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी लॉकडाऊनमुळे मासेमारी व्यवसाय मागील दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. …
Read More »म्हसळा-श्रीवर्धनमधील 50 गावांचा वीजपुरवठा पूर्ववत
म्हसळा ः प्रतिनिधी – दक्षिण रायगडमधील माणगाव, महाड, म्हसळा, पोलादपूर तालुक्यांत मेघगर्जनेसह कोसळलेल्या पावसाने येथील वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला होता. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याच वेळी म्हसळा तालुक्यात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वार्यामुळे श्रीवर्धन व म्हसळा या दोन्ही तालुक्यांतील किमान 50-60 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता, …
Read More »कर्जत पोलीस ठाण्यातर्फे दोन लाख 24 हजारांचा दंड वसूल
कर्जत : प्रतिनिधी – शासन आणि प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच रहा सुरक्षित रहा, असे वारंवार ओरडून सांगत आहेत. मात्र काही विनाकारण, बिनकामाचे नागरिक आजही आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन सर्रास बाहेर पडतात. अशा चालकांवर आणि वाहन जप्त करून कर्जत पोलिसांनी कारवाई केली असून दोन लाख 24 रुपयांचा दंडही वसूल …
Read More »श्रीवर्धन येथील मासेमारी तीन दिवस बंद
मच्छीमारांसह गावकर्यांचा निर्णय श्रीवर्धन : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर हे मच्छीमारी खरेदी विक्रीचा प्रमुख बंदर आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. ते रोखण्यासाठी मच्छिमारांनी आणि गावकर्यांने मासेमारी करण्यास न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रविवार ते मंगळवार हे तीन दिवस पुर्ण बंद ठेवण्यात आले आहे. …
Read More »ऑनलाइन अभ्यासक्रमाला प्रतिसाद
माणगाव : प्रतिनिधी गभरात कोरोना विषाणूंच्या साथीने सारे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साथीचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाने सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. शासनाच्या धोरणानुसार सर्वच शाळांतील विद्यार्थी सुटीवर घरी आहेत. मात्र अनेक शाळेतील विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून त्याला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. …
Read More »महाडमध्ये महिला पोलिसाकडून वृद्धाला आधार
महाड : प्रतिनिधी – पोलीस म्हणजे कडक, निर्दयी आणि निष्ठूर अशी सर्वसामान्यांचा समज असतो, परंतु पोलिसांमध्येही माणुसकी असते याचा प्रत्यय महाडमध्ये आला. तेथील दामिनी पथकात असलेल्या महिला पोलीस शिपाई सोनल बर्डे यांनी निराधान वृद्धाला आधार देत जीवनदान दिले आहे. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून शासनाने त्यावर आळा घालण्याकरिता लॉकडाऊन …
Read More »खोपोलीत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू
खालापूर : प्रतिनिधी – खोपोली शहरात पुन्हा नागरिकांनीच 18 ते 20 एप्रिल असे तीन दिवस कडक जनता कर्फ्यू जाहीर करून त्याचे पालन करण्यास सुरुवात केली. कर्फ्यूमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. केंद्र शासन व राज्य शासनाने 21 दिवसांचा 14 एप्रिलपर्यंत लोकडाऊन केला असताना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र शासनाने या …
Read More »म्हसळ्यात पोलिसांची कडक कारवाई
कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर उगारला बडगा म्हसळा : प्रतिनिधी – लॉकडाऊन व संचारबंदी असूनही रस्त्यावर विनाकारण फिरणारे नागरिक तसेच दुचाकीचालकांवर म्हसळा पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत कारवाई केली. या वेळी नागरिकांना समज देण्यात आली, तर दुचाकी जप्त करून त्यांना दंड करण्यात आला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. असे …
Read More »मुस्लिम बांधवांनी रमजानमध्ये नमाज, इफ्तार, तरावीह पठण घरातच करावे
जिल्हाधिकार्यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी – पुढील आठवड्यात सुरू होणार्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार आदी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात …
Read More »रोह्यात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
पोलिसांनी साहित्य केले घटनास्थळीच नष्ट रोहे : प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर व राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी असून अवैध गोष्टींवर धडक कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारे रोहा पोलिसांनी तालुक्यातील बेलवाडी येथे शनिवारी (दि. 18) छापा टाकून गावठी दारूसह 30 हजार 800 रुपयांचे साहित्य जागीच नष्ट केले. कोरोना विषाणूवर …
Read More »