Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतमध्ये रोजगार मेळावा

कर्जत : बातमीदार येथील इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये रोजगार मेळावा घेण्यात आला. त्यात बँकिंग क्षेत्रातील नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना अंतिम मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहे. कर्जत शहरातील कर्जत इंग्लिश मिडीयम स्कूल आणि  कॉम्पटेक कम्प्युटर यांच्या माध्यमातून रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन केईएस शिक्षण संस्थेचे विश्वस्त सतीश पिंपरे यांच्या हस्ते …

Read More »

पेण नगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर

पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेचा 2020-21 चा 54 कोटी तीन लाख 70 हजार 10 रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 28) विशेष सभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मालमत्ताकर व पाणीपट्टीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पेण नगर परिषदेच्या या विशेष सभेला …

Read More »

पेण तालुक्यातील कालव्यांची दुरुस्ती करा

आमदार रविशेठ पाटील यांची विधानसभेत मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील हेटवणे धरणातून शेती सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी नादुरुस्त कालव्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाया जात असून, या नादुरुस्त कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी विधानसभेत केली. पेण तालुक्यातील हेटवणे धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जाते. मात्र नादुरुस्त कालव्यांमुळे लाखो लिटर …

Read More »

गोठा, मोळ्या जळून खाक

कर्जत : बातमीदार  तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील माले गावातील शेतकर्‍याच्या शेतावर असलेला गुरांचा गोठा आणि साठवून ठेवलेला चारा गुरुवारी (दि. 27) सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माले गावातील शेतकरी हरिचंद्र जानू हिसालगे यांची शेती गावापासून लांब आहे. त्यामुळे …

Read More »

आगीत घर भस्मसात

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील नेराव येथील एका घराला गुरुवारी (दि. 27) रात्री आग लागली. या आगीत हे घर जळून खाक झाल्याने शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर घराची सावली हरपल्याने घरमालकावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. नेराव गावातील तुकाराम कोरपे यांच्या राहत्या घराला गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास आग …

Read More »

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेचे धरणे

अलिबाग : प्रतिनिधी शिक्षकांच्या बदली धोरणात बदल करून ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात याव्यात, यासह राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 27) मुंबईतील आझाद मैदान येथे शिक्षक परिषदेतर्फे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू, कार्याध्यक्ष आमदार नागो गाणार, सहकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठाणकर, संघटनमंत्री भगवानराव साळुंखे, …

Read More »

मासिक रॉकेलपुरवठा न झाल्याने मुरूडमधील नागरिकांची ससेहोलपट

मुरुड : प्रतिनिधी जानेवारीतील मासिक रॉकेलपुरवठा न झाल्याने मुरूड तालुक्यातील गरीब व मध्यमवर्गीयांची ससेहोलपट होत आहे. फेब्रुवारी महिना संपला तरीही जानेवारी महिन्याचा रॉकेल टँकर मिळालेला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यातील रॉकेल टँकर कोणी पळवून नेला याची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. मुरूड तालुक्यात दोन गॅस सिलिंडर असणार्‍यांची संख्या …

Read More »

खोपोलीत मोबाइलचोरांची टोळी गजाआड; लाखोंचा ऐवज जप्त

खोपोली : प्रतिनिधी येथील एसटी स्टॉपवर बुधवारी बसमध्ये चढणार्‍या प्रवाशाच्या खिशातील मोबाइल चोरल्याची घटना घडली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून खोपोली पोलिसांनी खालापूर टोलनाक्यावर सापळा लावला आणि मोबाइलचोरांच्या टोळीला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एक लाख 34 हजार 700 रुपये किमतीचे मोबाइल जप्त करण्यात आले. वावोशी (ता. खालापूर) येथील …

Read More »

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; माणगावमध्ये अधिकार्यांना धरले धारेवर

माणगाव : प्रतिनिधी पाटबंधारे विभागाने साफसफाईची कामे व्यवस्थित न केल्यामुळे डोलवहाळ बंधार्‍याच्या डाव्या कालव्याचे पाणी  माणगाव तालुक्यातील अनेक गावांना मिळत नाही. त्यामुळे या गावांच्या परिसरातील उन्हाळी भातपीक धोक्यात आले आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या देगाव येथील शेतकर्‍यांनी शुक्रवारी (दि. 28)  दुपारी माणगाव येथील पाटबंधारे कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता श्री. भाट …

Read More »

माले येथे गुरांचा गोठा आणि मोळ्या जळून खाक

कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील माले गावातील शेतकर्‍याच्या शेतावर असलेला गुरांचा गोठा आणि साठवून ठेवलेला चारा गुरुवारी (दि. 27) सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माले गावातील शेतकरी हरिचंद्र जानू हिसालगे यांची शेती गावापासून लांब आहे. त्यामुळे …

Read More »