Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पोलादपुरातील तुर्भे विभागात विविध विकासकामांचे भूमिपूजन

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे भागातील तीन कोटी 50 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 28)  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक जनतेने जे सांगितले ते देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही दिलेला शब्द पाळला, असा दावा आमदार गोगावले यांनी या वेळी केला. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे …

Read More »

रामधरणेश्वर डोंगरावर वणवा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा वणवे लागायला सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि. 28) दुपारच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर डोंगरावर लागलेल्या आगीत वनसंपदेची मोठी हानी झाली. स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली. रामधरणेश्वर डोंगरावर आग लागल्याची माहिती मापगांवचे माजी उपसरपंच चंद्रकांत खोत यांनी मुनवली …

Read More »

‘नवीन शिक्षण पद्धतीतील बदल शिक्षकांनी आत्मसात करावेत’

अलिबाग : प्रतिनिधी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास यावर आधारित हे धोरण आहे. देशात कुशल मनुष्यबळ तयार करणे, हा त्या मागचा हेतू आहे. त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असेल.  त्यामुळे शिक्षकांनी नविन शैक्षणिक धोरण समजून घेऊन नवीन बदल आत्मसात केले पाहिजेत, असे मत कौशल्य …

Read More »

दिग्गज क्रिकेपटू कपिल देव झाले कर्जतकर

कोठिंबे येथे जमिनीची खरेदी कर्जत : प्रतिनिधी भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी कर्जत तालुक्यातील कोठिंबे येथे जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे ते कर्जतकर झाले आहेत. कर्जत आणि फार्महाऊस हे समीकरण बनले आहे. येथील प्रदूषणमुक्त वातावरणासोबत निसर्ग, बारमाही वाहणार्‍या नद्या यामुळे विविध क्षेत्रांतील लोक कर्जतमध्ये सेकंड होम बांधून विकेण्डला येत …

Read More »

माटवणमधील हत्येप्रकरणी नऊ जणांना जन्मठेप

न्यायालयाचा निकाल पोलादपूर, अलिबाग : प्रतिनिधी राजकीय वैमनस्यातून पोलादपूर तालुक्यातील माटवण येथील गणपत विश्राम मांढरे यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी माणगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी. एन. जहांगीरदार यांनी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावाली  आहे. विठ्ठल कृष्णा म्हस्के, सखाराम विश्राम मांढरे, विकास विठ्ठल म्हस्के, संकेत नारायण म्हस्के, विलास पांडुरंग गोगावले, नाना नथू …

Read More »

अखेर माथेरानमध्ये ई-रिक्षा धावणार!

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार प्रारंभ कर्जत : विजय मांडे प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ई-रिक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची दमछाक दूर होईल. त्याचबरोबर हातरिक्षाची अमानवी प्रथा हद्दपार होणार आहे. ई-रिक्षेचे विद्यार्थ्यांसाठी पाच रुपये, तर माथेरानचे नागरिक व पर्यटकांसाठी 35 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. माथेरान हे मुंबई …

Read More »

वाहन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

अलिबाग : प्रतिनिधी वाहन चोरी करणारी एक आंतरराज्यीय टोळी रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाने जेरबंद केली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 30 लाख रुपये किमती एकूण 12 वाहने पोलीसांनी जप्त केली आहे. या टोळीला जेरबंद केल्यामुळे राज्यभरातील विवीध भागातील 12 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना …

Read More »

महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकार -चित्रा वाघ

खोपोली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे लोकाभिमुख व सर्वसामान्यांचे सरकार आहे. महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सर्वांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत, ही जबाबदारी तुमची व माझी आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी (दि. 27) खोपोली येथे केले. त्या महिला मेळाव्यात बोलत …

Read More »

पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा समर्थकांसह भाजपमध्ये दाखल

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का मुंबई : प्रतिनिधी पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता पालरेचा यांनी सोमवारी (दि. 28) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पालरेचा आणि …

Read More »

महिलांची बुलंद तोफ रविवारी खोपोलीत

महिला मेळाव्याला चित्रा वाघ करणार मार्गदर्शन खोपोली ः प्रतिनिधी उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने रविवारी (दि. 27) खोपोलीत महिला मेळावा होणार असून या मेळाव्याला महिलांची बुलंद तोफ असलेल्या भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. खोपोलीमधील लोहाणा समाजमंदिराच्या पटांगणात हा मेळावा सायंकाळी 4 वाजता होणार …

Read More »