मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातील थेट सरपंच पदाकरिता 24 तर सदस्यपदासाठी 117 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी (दि. 7) अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी सरपंचपदाचे 11 तर सदस्य पदाचे 46 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. मुरूड तहसीलदार कार्यालयासमोरील दरबार हॉलमध्ये बुधवारी सकाळी …
Read More »कर्जत शहरातील विकासकामांचे आमदार थोरवे यांच्या हस्ते लोकार्पण
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील दहिवली परिसरात करण्यात आलेल्या सुमारे 36 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक संकेत भासे यांच्या माध्यमातून या सर्व विकासकामांच्या निधीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली विभागात छत्रपती शिवाजी महाराज गार्डन, साईनगर गार्डन, …
Read More »महाड क्रांतीभूमीत महामानवाला अभिवादन
महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी (दि. 6) नागरिकांनी अभिवादन केले. सकाळपासूनच चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होण्यासाठी भीमसैनिकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे शहरातील विविध ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »मुरूडमध्ये पाच ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 116 अर्ज तर सरपंच पदाकरीता 25 उमेदवारी
मुरुड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील काकळघर, वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लई या पाच ग्रामपंचायतींसाठी सदस्यपदाकरीता 116 तर सरपंचपदाकरीता 25 अर्ज दाखल करण्यात आले. शेवटच्या दिवशी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती. त्याबरोबर ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा प्रशासनाने दिली होती. त्यामुळे उमेदवारांना फायदा झाला. गर्दी …
Read More »26 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी 110 तर सदस्य पदासाठी 580 उमेदवारी अर्ज
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील 26 गामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी 110 तर सदस्यांसाठी 580 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, पाटणोली व मुंढाणी या ग्रामपंचायतींमध्ये एकच उमेदवारी अर्ज आल्याने या दोन्ही गामपंचायतीत सरपंचपद बिनविरोध झाले आहेत. करोटीमध्ये सरपंचासाठी दोन तर सदस्य 15 अर्ज, आंबिवलीत सरपंचासाठी दोन तर सदस्य 15 …
Read More »कोविड काळातील आरोग्य सुविधा गायब
हिशेब मांडताना अधिकार्यांना अडचणी अलिबाग ः रामप्रहर वृत्त कोरोना काळात शासनातर्फे आरोग्य सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक तालुकास्तरावर आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. विलगीकरणात वाढीव खाटा, कोविड केंद्रात विशेष खाटा, व्हेंटिलेटर सुविधेसह ऑक्सिजन पुरवठ्याची यंत्रणा देण्यात आल्या. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला, मात्र आता दोन वर्षांनंतर ही आरोग्य सुविधा …
Read More »मृत्यूनंतरही पोलीस अधिकार्याने जोपासली सामाजिक बांधिलकी
हृदय, किडनी आणि डोळे केले दान पाली ः प्रतिनिधी मरावे परी अवयव रुपी उरावे ही उक्ती पोलीस उपनिरीक्षक गणपत अंबाजी पिंगळे (वय 57) यांनी मरणोत्तर अवयवदान करून सार्थ करून दाखवली आहे. आपल्या सेवा काळातसुद्धा त्यांनी अनेक सामाजिक कार्यात योगदान दिले आहे. रायगड जिल्ह्यातील ठाकूर समाजतील ते पहिले पोलीस उपनिरीक्षक …
Read More »राजपुरी वाहन पार्किंगचे दरवाजे उघडले
पर्यटकांना मोठा दिलासा; जंजिरा किल्ला पाहण्यासाठी गर्दी मुरूड ः प्रतिनिधी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने राजपुरी नवी जेट्टी येथे असणारे वाहनतळ अखेर खुले केल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यातील गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक मुरूडमध्ये दाखल झाले आहेत. रविवारी (दि. 4) 15 शिडाच्या बोटींतून पर्यटकांना जंजिरा किल्ल्यावर नेण्यात …
Read More »खालापूर सेतुला दलालांचा विळखा
नागरिकांची दिशाभूल, खापर अधिकार्यांवर खोपोली : प्रतिनिधी खालापूर तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्राबाहेर दलालांचा उपद्रव वाढला असून, त्यांचा त्रास विद्यार्थी, नागरिकांबरोबर अधिकार्यांनादेखील होत आहे. सध्या शैक्षणिक प्रवेश, पोलीस भरती प्रक्रिया आणि निवडणुकीसाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपर्यातून विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने खालापूरला येताहेत. दाखले प्रक्रियेबद्दल अनेक जणांना असलेला अज्ञानाचा …
Read More »रायगडात थेट सरपंचपदासह सदस्यपदाचे अर्ज दाखल
गोरठण ग्रामस्थांनी रचला इतिहास; ग्रामपंचायत बिनविरोध खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात चौदा ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे. सरपंच थेट निवड असल्याने हौशेनवशांनादेखील सरपंचपदाची स्वप्न पडत आहे. खुर्चीसाठी साठमारी सुरू असताना तालुक्यातील गोरठण ग्रामस्थांनी थेट सरपंचासह नऊ सदस्यांची बिनविरोध निवड करित एक आदर्श घालून दिला आहे. – बिनविरोध निवड झालेले उमेदवार किशोर …
Read More »