Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

आमदार राजन साळवी यांची रायगड एसीबीकडून चार तास चौकशी

अलिबाग : प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गटाचे राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांची  बेकायदेशीर मालमत्ते संदर्भात रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभीगाने (एसीबी) बुधवारी (दि. 12) चार तास चौकशी केली. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार साळवी यांना मालमत्तेच्या उघड चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. 5 डिसेंबर रोजी सकाळी अकरा …

Read More »

गावदेवी कालभैरव विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ

भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांचे मार्गदर्शन पेण : प्रतिनिधी तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गावदेवी कालभैरव ग्रामविकास आघाडी विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली आहे. गावदेवी कालभैरव विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी (दि. 13) कालभैरव मंदिरात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मागील पाच …

Read More »

कर्जतमध्ये एक्स्प्रेस गाड्यांना पूर्ववत थांबा द्यावा,

भाजपचे सुनील गोगटे यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील प्रवाशांची तसेच विद्यार्थी, चाकरमान्यांची गैरसोय होते. भाजप किसान मोर्चाचे कोंकण समन्वयक सुनील गोगटे यांनी केंद्रीय राज्य मंत्र्यांची भेट घेऊन कर्जत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, …

Read More »

पोलादपुरातील महत्वाच्या ग्रामपंचायती बिनविरोध

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायती बिनविरोध जाहीर झाल्याने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या पैशांचा चुराडा टळल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, गोळेगणी, कालवली, कापडे खुर्द, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, धामणदिवी, लोहारे, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले आणि उमरठ या 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर …

Read More »

कनिष्ठ विस्तार अधिकार्‍यांची पदे 31 डिसेंबरपूर्वी भरणार

शिक्षक समन्वय समितीला शिक्षणाधिकार्‍यांचे आश्वासन सेवानिवृत्तीनंतरचे लाभ निवृत्तीच्या दिवशीच मिळणार अलिबाग, माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शिक्षण विभागातील कनिष्ठ विस्तार अधिकार्‍यांची तब्बल 32 पदे आजही रिक्त आहेत. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. ही बाब लक्षात घेवून ही पदे तातडीने भरण्यात यावीत असा आग्रह शिक्षक समन्वय समितीने धरला आहे. …

Read More »

सहलीच्या बसला बोरघाटात अपघात; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 46 जण जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी मुंबईहून लोणावळा येथे आलेली बस परतीच्या प्रवासात बोरघाटातील मॅजिक पॉईंटजवळ रविवारी (दि. 11) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उलटली. या अपघातात बसमधील सर्व 48 विद्यार्थी जखमी झाले. यातील दोन विद्यार्थ्यांचा उपचाराच्यादरम्यान मृत्यू झाला, तर काहींची प्रकृती गंभीर आहे. मुंबई चेंबूर येथील मयांक कोचिंग …

Read More »

माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळांचा पुन्हा थरार

पालिकेच्या प्रस्तावावर मॉनिटरिंग कमिटी सकारात्मक कर्जत : विजय मांडे व्हॅली क्रॉसिंगचा समावेश शासनाने साहसी खेळ प्रकारात केला असून  माथेरानमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळांचा पुन्हा थरार सुरू होण्याची चिन्हे आहेत. याकरिता माथेरान गिरीस्थान नगर परिषदेने मागितलेल्या परवानगीच्या प्रस्तावावर इको सेन्सेटिव्ह झोनच्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली …

Read More »

रायगडच्या किनार्‍यावर मासळी सुकवण्याची लगबग

अलिबाग : प्रतिनिधी सद्या  सुक्या मासळीला मागणी वाढली आहे.  सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत. सुक्या मासळीच्या विक्रीतून यंदा करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. मासळीची मोठी बाजारपेठ असलेल्या रायगड जिल्ह्यातील किनार्‍यांवर सध्या मासळी सुकवण्याची लगबग पहायला मिळत आहे. अलिबाग, मुरूड, उरण आणि श्रीवर्धनच्या समुद्र किनार्‍यावरील कोळीवाड्यात मासळी सुकवण्यास टाकल्याचे चित्र सर्वत्र …

Read More »

रायगड जिल्ह्यात 50 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. महाड तालुक्यात सर्वाधिक 22 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याखालोखाल पोलादपूर तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. रायगड जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत उमदवरी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर होती. …

Read More »

बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करा

रोहा ज्वेलर्स असोसिएशनचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन रोहे : प्रतिनिधी शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करा, अशी मागणी रोहा-कोलाड ज्वेलर्स असोसिएशनने  मंगळवारी (दि. 6) रोहा अष्टमी नगर परिषदच्या  मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली. रोह्यात नुकतेच ज्वेलर्सचे दुकान फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने सराफा व्यावसायिकांत भितीचे वातावरण आहे. दरम्यान, …

Read More »