Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

चौल भोवाळे पर्वतवासी श्री दत्त मंदिरात चोरी; 24 लाखांचा ऐवज लंपास

रेवदंडा : प्रतिनिधी चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्त मंदिरात गाभार्यातील 24 लाख किमतीचा 40 किलो वजनाचा चांदीचे भिंतीवरील नक्षीकाम अज्ञात चोरट्याने गुरुवारी मध्यरात्रीचे सुमारास चारून नेले आहे. नुकतीच चौल भोवाळे श्री दत्त यात्रा उत्साहात झाली. यात्रेच्या निमित्ताने दत्तजयंतीच्या दिवशी मंदिराच्या गाभार्‍याचे भिंतीवर नक्षीकाम केलेली चांदीच्या पत्राची सजावट केली जाते, …

Read More »

जिल्ह्यात 30 ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या संवेदनशील; निवडणूकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 190 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि. 18)  मतदान होणार आहे. त्यापैकी रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील 30 ग्रामपंचायतींमध्ये चुरशीची निवडणूक होणार असून त्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. निवडणुकीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून 2400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 310 शस्त्रे जाम करण्यात आली आहेत.  जिल्ह्यात 1700 …

Read More »

रायगडात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची

कर्जतमध्ये सरपंच पदासाठी सहा ठिकाणी तिरंगी तर एका ग्रामपंचायतीत सरळ लढत कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीमध्ये रविवारी  मतदान होणार आहे. या सात ग्रामपंचायतींमधील सदस्य पदाच्या 69 जागांपैकी 14 सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याने आता 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यावेळी सात ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदासाठी 20 उमेदवारांनी मतदारांना कौल …

Read More »

विकासाला प्राधान्य न देणार्‍यांना मतदार जागा दाखवतील

कोर्लई येथील बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ग्रामपंचायत उमेदवार आक्रमक मुरूड ः प्रतिनिधी गेली अनेक वर्ष कोर्लई ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. सरपंच प्रशांत मिसाळ यांनी विकास न करता भकास केला आहे. अनेक कामात भ्रष्टाचार केला आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत असावी म्हणून आम्ही कोर्लई ग्रामपंचायतीची …

Read More »

आरसीएफचा विस्तारीत प्रकल्प थळ येथेच होणार -पालकमंत्री

अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायझर्सचा (आरसीएफ) विस्तारीत प्रकल्प थळ येथेच होणार आहे. हा प्रकल्प अन्य राज्यात जाणार नाही. लवकरच या प्रकल्पाची जनसुनावणी घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि. 15) येथे दिली. पालकमंत्री उदय सामंत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात …

Read More »

नवीन शासननिर्णयामुळे काजू फळबागा बहरणार

राज्यातील नवीन शिंदे फडणवीस सरकारने 100 टक्के अनुदानाची फळपिक योजना काजूपीकासाठी लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे. नव्या धोरणामुळे महाराष्ट्रामध्ये काजूप्रक्रिया आणि काजूपिक घेण्यासाठी शेतकर्‍यांना चांगले दिवस येण्यासोबतच मोठ्या प्रमाणात काजू लागवडीला प्रोत्साहन मिळण्याची लक्षणं दिसून येत आहेत. काही वर्षांपूर्वी कोकणात सुमारे 5000 हेक्टर जमिनीवर काजू फळलागवड यशस्वी झाली …

Read More »

कर्जत तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील रस्त्यांचे तसेच नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ही विकासकामे तीन कोटी 82 लाख रुपयांची आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून  एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून चिंचवली-एकसळ आणि सुमारे एक कोटी वीस लाख रुपये खर्च करून एकसळ-भानसोली हे रस्ते तयार करण्यात येत …

Read More »

पेण-नागोठणे मार्गावर एसटीच्या फेर्‍या वाढवण्याची मागणी

विभाग नियंत्रक दिपक घोडे यांना निवेदन पेण : प्रतिनिधी पेण-पाली-नागोठणे आणि रोहा-पनवेल या मार्गांवर गाड्यांच्या संख्येत वाढ करुन फेर्‍या वाढवाव्यात, अशी  मागणी गडब, कासू प्रवाशी संघटन व विद्यार्थ्यांनी एसटीचे विभाग नियंत्रक दीपक घोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालखार-पेण, पेण-नागोठणे, पेण-पाली, पेण -रोहा, पालखार-पनवेल या बस फेर्‍या वाढविण्यात याव्यात. पेण, रामवाडी व …

Read More »

अवैध रेती उत्खननाविरोधात पेण तहसील कार्यालयाची कारवाई

पेण : प्रतिनिधी धरमतर खाडीलगत होत असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे व कर्मचार्‍यांनी कारवाई करीत 41 ब्रास अनाधिकृत वाळूसाठा जप्त केला आहे. पेण तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृत गौणखनिज उत्खननाचे काम होत असून या विरोधात उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनखाली पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे व कर्मचारी यांनी …

Read More »

खोपोलीत अवकाळी पाऊस;नागरिकांची तारांबळ

खोपोली : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून असणार्‍या ढगाळ वातावरणनंतर अखेर बुधवारी (दि. 14) खोपोलीत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास आलेल्या या अवकाळी पाऊसाने नागरिक, शेतकरी, व्यापार्‍यांची चांगलीच धावपळ उडाली. मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊसाची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे बांधकामाशी संबंधित …

Read More »