Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 172 मि.मि. पावसाची नोंद

अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 172.41 मि.मि पावसाची नोंद झाली आहे.  तसेच 1 जूनपासून एकूण  सरासरी 874.70 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतचे दैनंदिन पर्जन्यमान : अलिबाग 64.00 मि.मि., पेण-214.00 मि.मि., मुरुड-145.00 मि.मि., पनवेल-234.20 मि.मि., उरण-227.00 मि.मि., कर्जत-136.00 मि.मि., खालापूर-157.00 मि.मि., माणगांव-270.00 मि.मि., रोहा-188.00 मि.मि., …

Read More »

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली ; पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी, पाच तास वाहतूक ठप्प

पाली : प्रतिनिधी  सुधागड तालुक्याला सोमवारी (दि.1) मुसळधार पावसाने झोडपले. मंगळवारी (दि.2) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे तालुकयातील जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी पहाटे वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले होते. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पाच तास ठप्प झाली होती. सकाळी सव्वा नऊ वाजता पाणी ओसरल्यावर वाहतूक …

Read More »

नेरळमधील रस्ते गेले पाण्याखाली

कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशन लगत असलेल्या निर्माण नगरी भागात असलेले रस्ते पावसात पाण्याखाली गेले आहेत. यावर्षी पाडा भागातून स्टेशनकडे वाहणारे पाणी रेल्वेने नवीन मोरी खोदून निर्माण नगरी भागात सोडले आहे. त्यामुळे निर्माण नगरी भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून, नेरळ ग्रामपंचायतीने तात्पुरती सोय म्हणून नाला तयार करून पाणी वळविले …

Read More »

नागोठण्यात मुसळधार पाऊस, अंबा नदीला पूर

नागोठणे : प्रतिनिधी मागील पाच दिवस संततधार पडणार्‍या मुसळधार पावसाने येथील अंबा नदीने पहाटे आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने एसटी बसस्थानक, मरिआई मंदिर परिसर, कोळीवाडा तसेच हॉटेल लेक व्ह्यू परिसरात पुराचे पाणी भरले होते. मंगळवारी पहाटे सहा वाजता भरलेले पुराचे पाणी दुपारी ओसरायला सुरुवात झाली असली, तरी दुपारपर्यंत नदी …

Read More »

रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ ; रोह्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्या

रोहे ः प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागाला गेल्या चार दिवसात पावासाने झोडपून काढले असून, सोमवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने कुंडलिका नदीला पुर आला असून, तालुक्यात ठिकठिकाणी झाडे उन्माळुन पडली आहेत. तर रोहा -मुरूड मार्गावर कवळटे गावच्या हद्दीत व पालेखुर्द गावाच्या पश्चिम भागात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली …

Read More »

कोसळधार कायम

रायगडातील जनजीवन विस्कळीत; अतिवृष्टीचा इशारा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सलग चार दिवस कोसळणार्‍या पावसाचा जोर सोमवारी (दि. 30) पाचव्या दिवशीही कायम होता. संततधारेमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. दरम्यान, कोकणात येत्या चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा फटका अलिबाग तालुक्याला बसला. तालुक्यातील श्रीगावमध्ये …

Read More »

कर्जतजवळ मालगाडीचे डबे घसरले

कर्जत : रामप्रहर वृत्त – मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतजवळ मालगाडीचे डबे घसरल्याची घटना सोमवारी (दि. 1) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत.  कर्जत ते लोणावळादरम्यान असलेल्या जामरुंग व ठाकूरवाडी रेल्वेस्थानकांच्या मध्ये ही घटना …

Read More »

चाईल्ड फंड संस्थेची किमया

महाड : प्रतिनिधी – अवघ्या नऊ महिन्यात महाड तालुक्यातील 900 महिलांना कुक्कुटपालन व्यवसाय निर्माण करून देणार्‍या चाईल्ड फंड संस्थेचे महिला सक्षमीकरण कामात महत्वाचे योगदान असल्याचे मत आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केले.  चाईल्ड फंड इंडिया या संस्थेच्या ‘गरीबीतून समृद्धीकडे‘ या प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन आमदार गोगावले यांच्या हस्ते नुकतेच महाडमधील …

Read More »

माथेरान वीज वितरण कार्यालयात पाणी

कर्जत : बातमीदार – वीज वितरण कंपनीचे माथेरान येथील कार्यालय अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेले आहे, त्यामुळे येथे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना पाण्यामध्ये राहूनच जनतेच्या समस्या सोडवाव्या लागत आहेत. माथेरानमधील राजाराम साळुंखे रोड व पंचवटी नगरच्या बाजूला वीज वितरण कंपनीचे कार्यालय व कर्मचार्‍यांचे निवासस्थान आहे. नागरिकांची वीज बिल देयके याच कार्यालयात घेतली जातात. …

Read More »

रायगडात वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ

अलिबाग : जिमाका – शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळी अंतर्गत अलिबाग तालुक्यातील वावे गावाच्या परिसरात सोमवारी (दि. 1) जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन, रायगड जिल्ह्यातील वृक्ष लागवड अभियानास सुरुवात करण्यात आली. लावलेले झाड हे माझे आहे, या भावनेने त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी …

Read More »