Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

चाईल्ड फंड संस्थेची किमया

महाड : प्रतिनिधी – अवघ्या नऊ महिन्यात महाड तालुक्यातील 900 महिलांना कुक्कुटपालन व्यवसाय निर्माण करून देणार्‍या चाईल्ड फंड संस्थेचे महिला सक्षमीकरण कामात महत्वाचे योगदान असल्याचे मत आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केले.  चाईल्ड फंड इंडिया या संस्थेच्या ‘गरीबीतून समृद्धीकडे‘ या प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन आमदार गोगावले यांच्या हस्ते नुकतेच महाडमधील …

Read More »

माथेरान वीज वितरण कार्यालयात पाणी

कर्जत : बातमीदार – वीज वितरण कंपनीचे माथेरान येथील कार्यालय अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेले आहे, त्यामुळे येथे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना पाण्यामध्ये राहूनच जनतेच्या समस्या सोडवाव्या लागत आहेत. माथेरानमधील राजाराम साळुंखे रोड व पंचवटी नगरच्या बाजूला वीज वितरण कंपनीचे कार्यालय व कर्मचार्‍यांचे निवासस्थान आहे. नागरिकांची वीज बिल देयके याच कार्यालयात घेतली जातात. …

Read More »

रायगडात वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ

अलिबाग : जिमाका – शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळी अंतर्गत अलिबाग तालुक्यातील वावे गावाच्या परिसरात सोमवारी (दि. 1) जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन, रायगड जिल्ह्यातील वृक्ष लागवड अभियानास सुरुवात करण्यात आली. लावलेले झाड हे माझे आहे, या भावनेने त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी …

Read More »

ट्री हाऊस स्कूलची गो ग्रीन नर्सरीला भेट

पेण : प्रतिनिधी – येथील ट्री हाऊस स्कूल तर्फे ज्ञानवर्धक नेचर डेटिंग एज्युकेशन ट्रीप नुकतीच तारा (ता. पनवेल) येथील गो ग्रीन नर्सरी येथे काढण्यात आली होती. तेथे विद्यार्थ्यांना वृक्षांचे फायदे व पर्यावरणाचे संतुलन याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व निरनिराळ्या वेलींचा परिचय करून देण्यात आला. संस्थेच्या …

Read More »

विजेचे जीर्ण खांब बदलावेत

कर्जत डेक्कन जिमखान्यातील नागरिकांची मागणी कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार – पावसाळ्यात सडलेले लोखंडी विजेचे खांब पडून जीवित हानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त करुन कर्जत डेक्कन जीमखाना परिसरातील नागरिकांनी, जीर्ण झालेले पोल बदलावेत, अशी मागणी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. नगरसेविका मधुरा चंदन -पाटील यांनी वीज वितरण कंपनीचे …

Read More »

नागोठण्यात पावसाची संततधार

नागोठणे : शहरासह विभागात पावसाची संततधार चालूच असून गेल्या चोवीस तासात नागोठणे शहरात 190 मि. मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तलाठी अनंत म्हात्रे यांनी दिली. रात्रभर पडलेल्या पावसाने नागोठणे – पोयनाड मार्गावर कडसुरे – कुहिरे गावांदरम्यान रस्त्यावर पाणी साचल्याने सकाळी सहा – सात वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली …

Read More »

झाड कोसळल्याने खोपोली रेल्वेसेवा काही काळ ठप्प

खालापूर : प्रतिनिधी  – लौजी व खोपोली स्थानका दरम्यान असणार्‍या फाटकाजवळ सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक महाकाय वृक्ष रेल्वे रुळांवर कसळला. त्यामुळे कर्जत -खोपोली रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. खालापूर, खोपोली परिसरात दोन दिवस संततधार पडत असून, त्यामुळे रेल्वे व महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोमवारी …

Read More »

म्हसळ्यात प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा; रिक्त पदे भरण्याची मागणी

म्हसळा ः प्रतिनिधी – तालुक्यांत गट शिक्षण अधिकार्‍यांसह विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर व उपशिक्षक अशी अनेक पदे रिक्त  आहेत. त्यामुळे म्हसळा तालुक्यात प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा वाजला आहे.  म्हसळा तालुक्यात एकूण 125 शाळा असून त्यात जि. प. प्राथमिक शाळा 102, माध्यमिक शाळा 20, तसेच खाजगी अनुदानित,  विना अनुदानीत व …

Read More »

पेण न्यायालयात मध्यस्थ कक्षाचे उद्घाटन

पेण : प्रतिनिधी  – येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये मध्यस्थ मंडळ कक्षाचे उद्घाटन नुकतेच न्या. विवेक कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या मध्यस्थी कक्षाच्या वतीने न्यायालयात येणारी कौंटुंबिक प्रकरणे दाखल होण्यापूर्वीच तडजोडीने मिटविण्याची प्रक्रिया पार पडणार असून, यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. या कार्यक्रमास न्या. निनाद काकडे, मानसी …

Read More »

खालापूर-खोपोलीतील डेंग्यू रुग्ण सामान्य

एकत्रितपणे उपचारासाठी वावोशी येथे यंत्रणा उभारली खोपोली, खालापूर : प्रतिनिधी  – खालापूर तालुक्यातील छत्तीशी ग्रामीण भागात असणार्‍या दहा गाव करंबेली येथे ‘डेंग्यू’ची लागण असलेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आल्याने तालुका व जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली. त्याचप्रमाणे खोपोली शहरातही काही रुग्ण निष्पन्न झाल्याने नगरपालिका आरोग्य विभागाकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात …

Read More »