मेलबर्न : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. मराठमोळ्या स्मृती मंधानाने झळकावलेले अर्धशतक व तिला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाने दिलेले 174 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले. सात विकेट्स राखत भारतीय महिलांनी हा सामना जिंकला.नाणेफेक जिंकत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने …
Read More »न्यूझीलंडने रोखला भारताचा अश्वमेध
‘विराटसेने’ने वन-डे मालिका गमावली ऑकलंड : वृत्तसंस्थाटी-20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवत नवीन वर्षात पहिल्या परदेश दौर्याची धडाकेबाज सुरुवात करणार्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. ऑकलंड वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 22 धावांनी मात करीत वन-डे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 274 धावांचे आव्हान भारतीय …
Read More »आयपीएलमध्ये आर्चरच्या रिक्त जागी तिघे शर्यतीत
मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 च्या मोसमाला सुरुवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर याने कोपर्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. जोफ्राच्या तंदुरुस्तीबाबत संघमालक इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी बोलणार आहेत, पण तोपर्यंत दुसरीकडे जोफ्राच्या जागी कोणाला अंतिम …
Read More »रणजी स्पर्धेतून मुंबईचे आव्हान संपुष्टात
मुंबई : प्रतिनिधी स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी संघ अशी ओळख असलेल्या मुंबईचे रणजी क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेले आहे. सौराष्ट्राविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे मुंबईचा संघ बाद फेरीच्या शर्यतीमधून बाहेर फेकला गेला आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाला बडोद्याविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या डावात मुंबईने सर्फराज …
Read More »न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी वन-डे : भारतासाठी ‘करो या मरो’
ऑकलंड : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात 347 धावांचा डोंगर उभारूनदेखील पराभव झाल्याने भारतीय संघाला झटका बसला. टी-20 मालिकेत 5-0ने धमाकेदार विजय मिळवणार्या भारतीय संघाला हा पराभव पचनी न पडणारा होता. आता तीन सामन्यांच्या वनडेत शनिवारी (दि. 8) होणारी लढत टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ अशी आहे. …
Read More »राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत मोरे, अपूर्वाला जेतेपद
जळगाव : प्रतिनिधी येथील श्री शिव छत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात खेळल्या गेलेल्या 48व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला सेट गमाहूनही खेळणारा विद्यमान विश्वविजेता प्रशांत मोरे (रिझर्व्ह बँक)ने अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या संदीप दिवेचा चुरशीच्या लढतीत 16-25, 25-10, 25-07 असा पराभव केला. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात विद्यमान …
Read More »बांगलादेशची फायनलमध्ये धडक; युवा विश्वचषकात उद्या भारताविरुद्ध महामुकाबला
केपटाऊन : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत दोन आशियाई देश विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. दुसर्या उपांत्य सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचे आव्हान परतवून लावत अंतिम फेरी गाठली. विजयासाठी दिलेले 212 धावांचे आव्हान बांगलादेशने चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. बांगलादेशच्या महमदुल हसन जॉयने शतकी खेळी केली. त्यामुळे अंतिम फेरीत …
Read More »मैदानाबाहेरही विराट सरस; भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये अव्वल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाज रन मशीन विराट कोहली फक्त मैदानावरच नाही, तर मार्केट व्हॅल्यूबाबत सुपरहिट आहे. फलंदाजीत आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करणारा विराट भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये सर्वांना मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे विराटने …
Read More »कुलदीपची चूक संघाला भोवली
हॅमिल्टन : वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत 347 धावांचा डोंगर उभा करूनदेखील भारताचा चार विकेट्सनी पराभव झाला. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने नाबाद 109 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाच्या या पराभवाला एक चूक कारणीभूत ठरली. न्यूझीलंडच्या डावात कुलदीपने टेलरचा एक झेल सोडला ज्याचा फटका संपूर्ण संघाला बसला आणि …
Read More »भारतीय महिला हॉकी संघाचा न्यूझीलंडवर विजय
ऑकलंड : वृत्तसंस्था : नवनीत कौरच्या दोन गोलच्या जोरावर भारताच्या महिला हॉकी संघाने अखेरच्या पाचव्या लढतीत 3-0 असा विजय मिळवत न्यूझीलंड दौर्याची यशस्वी सांगता केली. भारताने पाच लढतींपैकी तीन सामने जिंकत यश मिळवले. टोकियो ऑलिम्पिकची तयारी म्हणून या दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. भारताला या सामन्यात पहिल्या दोन सत्रांत गोल …
Read More »