नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतररराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (दि. 11) टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्मा कर्णधार, तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यामुळे संघात परतले आहेत. विशेष म्हणजे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक …
Read More »रविवारी पुन्हा रंगणार भारत-पाक लढत
दुबई : वृत्तसंस्था आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये पुन्हा एकदा रविवारी (दि. 3) सुपर-4चा महामुकाबला होणार आहे. याआधी उभय संघात झालेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील लढती रोमहर्षक …
Read More »झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत भारताची विजयी आघाडी
हरारे : वृत्तसंस्था भारताने झिम्बाब्वेचे 162 धावांचा आव्हान पाच फलंदाजांच्या मोबदल्यात पार करीत दुसरा वनडे सामना पाच विकेट्सनी जिंकला. झिम्बाब्वेने भारताची अवस्था चार बाद 97 धावा अशी करून चांगली झुंज दिली होती, मात्र संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा (25) यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या समिप पोहचवले. …
Read More »इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेनंतर झुलन होणार निवृत्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज इंग्लंड विरूद्धच्या तिसर्या वनडे सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. इंग्लंड दौर्यासाठी नुकताच भारतीय महिला संघ घोषित झाला. या संघात भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा देखील …
Read More »स्वातंत्र्य दिनानिमित्त पेणमध्ये जलतरणपटूंकडून परिक्रमा
पेण : प्रतिनिधी येथील मामा वास्कर जलतरण तलाव हौशी जलतरणपटूंनी शहरातील कुंभार तलावात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 परिक्रमा मारून आगळावेगळा स्वातंत्र्य दिन साजरा केला. या उपक्रमात सहा महिला, तर 19 पुरुष अशा एकूण 25 जलतरणपटूंनी सहभाग घेतला. याबद्दल बोलताना पेण पालिकेचा जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय सार्थकी ठरल्याचा अभिमान वाटत …
Read More »रायगडच्या कराटेपटूंकडून राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लयलूट
उरण : बातमीदार कर्नाटकमधील बंगळुरू येथे झालेल्या 34व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात कुमिते व काता प्रकारात पदके पटकाविली. या स्पर्धेत विविध 17 राज्यांतील 350 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये अमिता घरत, विनया पाटील, शुभम ठाकूर, श्रेय मोकल, श्रेयस वटाणे दोन सुवर्ण, अमिषा घरत, आर्वी केदारी, समीक्षा पाटील, …
Read More »भारत-झिम्बाब्वे वनडे मालिकेचा गुरुवारी पहिला सामना
हरारे : वृत्तसंस्था केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौर्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामन्यांची मालिका गुरुवार (दि. 18)पासून सुरू होत आहे. आशिया चषक स्पर्धेआधी ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. अनुभवी फलंदाज राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौर्यासाठी …
Read More »चौल येथील पोहण्याच्या शर्यतीत अमर पाटील प्रथम
रेवदंडा : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चौल रामेश्वर पुष्करणीत पोहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत खुल्या गटात अमर वासुदेव पाटील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. व्दितीय क्रमांक भारत कुथे व तृतीय भूषण शिर्के यांनी पटकाविला. स्पर्धा एकूण 14 गटात घेण्यात आली. गट क्रमांक एकमध्ये मुले डबल …
Read More »उरण तायक्वांडो अकॅडमीचा गौरव
उरण : बातमीदार आमदार चषक जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत उरण तायक्वांडो अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. याबद्दल त्यांचा आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला. सर्व पदक विजेतेे व मास्टर तेजस पाटील यांना भाजप तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर यांनी, तर मास्टर प्रथमेश यांना उपनगराध्यक्ष जयविन कोळी यांच्या हस्ते …
Read More »पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खालापूरच्या कुणाल पिंगळेला कांस्यपदक
खोपोली : प्रतिनिधी पॉवरलिफ्टिंग ऑफ इंडिया आणि केरळ स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सब ज्युनिअर-ज्युनिअर स्पर्धा केरळमध्ये झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्या कुणाल सुभाष पिंगळे याने 53 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. कुणाल हा खालापूर तालुक्यातील घोडीवली गावचा रहिवासी आहे. या यशाबद्दल कुणाल पिंगळेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा …
Read More »