मुंबई ः प्रतिनिधी कोरोना संकटाचा सामना करत असताना सध्या देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कोरोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. 250 उद्योजक तरुणांनी सुरू केलेल्या मिशन ऑक्सिजनसाठी सचिनने तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे. मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत …
Read More »पृथ्वी वादळात कोलकाता गारद
अहमदाबाद ः वृत्तसंस्था सलामीवीर मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर आयपीएलच्या साखळी सामन्यात सात गडी राखून विजय नोंदवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्लीने 16.3 षटकांतच विजय साकारला. पृथ्वीला …
Read More »मुंबई इंडियन्स राजस्थानवर भारी
साकारला ’रॉयल’ विजय नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मुंबई इंडियन्सने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 7 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. चेन्नईच्या खेळपट्टीवर डगमगलेल्या मुंबई इंडियन्सची गाडी ह्या सामन्यात रुळावर आल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे संघासाठी ही चांगली गोष्ट मानली जात आहे. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकने …
Read More »मुंबई प्रीमिअर लीग टी-20 लांबणीवर
अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांची माहिती मुंबई ः प्रतिनिधी देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई प्रीमिअर लीग टी-20 मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई प्रीमिअर लीगचे गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील व मुंबई प्रीमिअर लीगचे गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष …
Read More »सुरेश रैनाच्या नावे चौकारांचा विक्रम
चौथ्या स्थानी झेप मुंबई ः प्रतिनिधी चेन्नई सुपर किंग्जमधून खेळत असलेला आणि मिस्टर आयपीएल म्हणून ख्याती असलेल्या सुरेश रैनाच्या नावावर आणखी एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सनराइजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 15 चेंडूंत 17 धावा केल्या. त्यात त्याने 3 चौकार लगावले. त्याच्या या 3 चौकारांमुळे त्याच्या नावावर 500 चौकार झाले आहेत. …
Read More »खेळाडूंनंतर पंचांचीही आयपीएलमधून माघार
नितीन मेनन, पॉल रेफेल घरी परतले नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएलवरील कोरोना संकट आता आणखी गडद होत चालले आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडत असताना आता पंचदेखील माघार घेताना दिसत आहेत. आयसीसीच्या एलिट पॅलनमधील सदस्य असलेले भारताचे नितीन मेनन व ऑस्ट्रेलियाचे पॉल रेफेल यांनी …
Read More »चेन्नईची विजयी घोडदौड; हैदराबादची हाराकिरी सुरूच
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी लागोपाठ पाचवा विजय नोंदविला. फाफ डुप्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने हैदराबादने दिलेले 171 धावांचे आव्हान अगदी सहज पूर्ण केले. ऋतुराज गायकवाडने 44 चेंडूंत 75 धावा आणि फाफ डुप्लेसिसने 38 चेंडूंमध्ये 56 धावांची खेळी केली. हैदराबादकडून फक्त राशिद …
Read More »कोरोनावाढ रोखण्यासाठी आयपीएलबंदी अयोग्य
पॅट कमिन्सचा दावा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज तीन लाखांच्या घरात वाढत आहे. अशा परिस्थितीत आयपीएल 2021 सुरू असल्यामुळे अनेक जण टीका करीत आहेत, पण आयपीएल बंद करणे हा कोरोना संकट रोखण्यासाठीचा उपाय नाही, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स याने व्यक्त केले आहे. कोलकाता …
Read More »धोनीकडून बाकावरील खेळाडूंना यशाचे श्रेय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी आयपीएलच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 7 विकेट्स व 9 चेंडू राखून सहज विजय मिळवला. या विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विजयाचे श्रेय अंतिम 11 खेळाडूंव्यतिरिक्त बाकावर बसलेल्या प्रत्येक खेळाडूला दिले. फलंदाजांची कामगिरी दमदार होती, परंतु याचा अर्थ असा नाही की गोलंदाजांनी निराश केले. दिल्लीची …
Read More »आंद्रे रसेल पीसीएलमध्ये खेळणार!
स्टार परदेशी खेळाडूंचा सहभाग इस्लामाबाद ः वृत्तसंस्थाकोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) जूनमध्ये पुन्हा खेळवण्यात येणार आहे. या लीगसाठी परदेशी खेळाडूंच्या बदली खेळाडूंची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल याच्यासह अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यात सुरू झालेली ही स्पर्धा पहिल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper