Breaking News

क्रीडा

प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत कोंढवी पळचिल संघ विजेता

पोलादपूर : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिका क्षेत्र) या नोंदणीकृत संघटनेतर्फे यंदा प्राथमिक शिक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यामध्ये कोंढवी पळचिल केंद्र संघाने कापडे देवळे केंद्र संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले.छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी विविध गुणदर्शन सोहळा आयोजित …

Read More »

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर जोकोव्हिचचेपुन्हा एकदा वर्चस्व  

मेलबर्न : वृत्तसंस्थाजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा सरळ तीन सेटमध्ये सहज धुव्वा उडवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले. जोकोव्हिचचे हे कारकिर्दीतील 18वे, तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे नववे जेतेपद ठरले.33 वर्षीय जोकोव्हिचने आपल्या दमदार सर्व्हिस, तसेच जोरदार फटक्यांनिशी मेदवेदेवचे आव्हान परतवून लावले. …

Read More »

मोटेरातील खेळपट्टीवर इंग्लंडचा लागणार कस

अहमदाबाद : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 24 फेब्रुवारीपासून जगातील सर्वांत मोठ्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चेन्नईतील दुसर्‍या कसोटीप्रमाणेच येथील खेळपट्टीवरही चेंडू फिरेल, किती गवत असेल, वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरेल की नाही, या काही प्रश्नांची उत्तरे मिळवणे इंग्लंडच्या संघाला कठीण झाले आहे. …

Read More »

महाराष्ट्राची हिमाचल प्रदेशवर मात; विजय हजारे ट्रॉफी : ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी नुकत्याच झालेल्या लिलावानंतर भारताच्या एका युवा खेळाडूने धमाकेदार शतकी खेळी केली. देशात सध्या विजय हजारे ट्रॉफी 2021 स्पर्धा सुरू असून, या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने शानदार शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर मात केली. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई …

Read More »

रबाडा म्हणतो, आयपीएलपेक्षा देश महत्त्वाचा

मुंबई ः प्रतिनिधीमुंबई इंडियन्ससमोर आयपीएल 2020मध्ये अंतिम फेरीत दिल्लीचा पराभव झाला. स्पर्धेत युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने धडाकेबाज कामगिरी केली, मात्र आता दिल्लीच्या स्टार खेळाडूच्या वक्तव्यामुळे टेन्शन वाढले. दिल्लीने कायम राखलेल्या खेळाडूंत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कगिसो रबाडाचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीचा भार त्याच्यावर आहे, पण नुकतेच एका मुलाखतीत त्याने …

Read More »

कृष्णाप्पा गौतमसाठी चेन्नईची सव्वा नऊ कोटींची यशस्वी बोली

मुंबई : प्रतिनिधी ख्रिस मॉरिस हा आयपीएलमधला आजवरचा सर्वांत महागडा क्रिकेटर ठरला, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसतानाही कृष्णाप्पा गौतमने आजवरची सर्वांत मोठी बोली लागलेला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने गौतमवर तब्बल सव्वा नऊ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली आहे.कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामधील चढाओढीने गौतमची किंमत सात कोटींच्या वर …

Read More »

आयपीएलपूर्वी इशानची तुफानी फलंदाजी

चौकार, षटकारांचा वर्षाव मुंबई ः प्रतिनिधीआयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचे धडाकेबाज फलंदाज आता चांगल्या फॉर्मात आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आयपीएलपूर्वी होणार्‍या बीसीसीआयच्या एका स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा दमदार फलंदाज इशान किशनने फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावरच 142 धावा फटकावल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सच्या संघानेही या वेळी आपल्या खेळाडूचे या धडाकेबाज …

Read More »

जोकोव्हिच नवव्यांदा अंतिम फेरीत

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा सिडनी : वृत्तसंस्थागतविजेता आणि अग्रमानांकित सर्बिया नोव्हाक याने रशियाच्या अस्लान करात्झेव्ह याचा 6-3, 6-4, 6-2 असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या 33 वर्षीय जोकोव्हिचने कारकीर्दीत 28व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आजे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत आठ …

Read More »

अर्जुन म्हणतो, मुंबईच्या संघात सहभागी होण्यास खूपच उत्सुक

मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या 14व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खरेदी केले. मुंबईने अर्जुनला त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच 20 लाख रुपयांना खरेदी केले. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संधी मिळाल्याने आणि मुंबईसारख्या तगड्या संघाने खरेदी केल्यानंतर अर्जुन चांगलाच आनंदात आहे.लिलावानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. …

Read More »

आयपीएल लिलावात अष्टपैलूंचे वर्चस्व

आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या खेळाडूंना प्राधान्य चेन्नई : वृत्तसंस्थाचेन्नईतील हॉटेल आयटीसी ग्रँड छोला येथे झालेल्या आयपीएल लिलावाच्या रणधुमाळीत अष्टपैलू खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले. यामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना संघमालकांनी प्राधान्य दिले.दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने आयपीएलच्या 14व्या हंगामासाठीच्या लिलावप्रक्रियेत विक्रमी झेप घेतली. आजवरच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरण्याचा मान …

Read More »