Breaking News

क्रीडा

डॉक्टर्स असोसिएशनच्या क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण

खारघर : प्रतिनिधीपनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात झाले. स्पर्धेस दुसर्‍या दिवशी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, नगरसेवक तेजस कांडपिळे आदींनी भेट देत शुभेच्छा दिल्या.क्रिकेट स्पर्धेत पेण संघाने विजेतेपद पटकाविले, तर कर्जत संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट खेळाडू …

Read More »

दुसर्‍या कसोटीवर भारताची पकड

अश्विनचे दमदार शतक; इंग्लंड 3 बाद 53 चेन्नई : वृत्तसंस्था482 धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना दुसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवसअखेर इंग्लंडने 3 बाद 53 धावांपर्यंत मजल मारली. रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकानंतर भारताचा दुसरा डाव 286 धावांवर संपुष्टात आला. आता सामन्यातील दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून, इंग्लंडला विजयासाठी 429 धावांची गरज आहे, …

Read More »

अश्विनची कमाल, इंग्लंड बेहाल!; दुसर्या दिवसाखेर भारताकडे 249 धावांची आघाडी

चेन्नई : वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवसाखेर भारताने दुसर्‍या डावात एका गड्याच्या मोबदल्यात 54 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताने 329 धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव अवघ्या 134 धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला 195 धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसर्‍या डावात भारताचा सलामीवीर शुबमन …

Read More »

जोकोव्हिच, सेरेना चौथ्या फेरीत

सिडनी : वृत्तसंस्थागतविजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसर्‍या मानांकित डॉमिनिक थीम यांनी संघर्षपूणे खेळीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसरीकडे अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सिमोना हॅलेप, सेरेना विल्यम्स यांनी आपापले सामने जिंकत चौथ्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झविरुद्ध पहिले दोन सेट जिंकून शानदार सुरुवात केली, मात्र …

Read More »

ऑलिम्पिक संयोजन समितीच्या अध्यक्षांचा अखेर राजीनामा

टोकियो : वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी महिलांबद्दल अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.मोरी यांनी टोकियो ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची घोषणा लवकरच केली जाणार आहे. ‘महिला खूप बोलतात आणि विनाकारण वाद ओढवून घेतात,’ या त्यांच्या वक्तव्यानंतर …

Read More »

पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल

चेन्नई : वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने 6 बाद 300 धावांपर्यंत मजल मारली. गेल्या काही सामन्यांत टीकेचे लक्ष ठरणार्‍या सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज दीडशतक ठोकले. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात बाद झाले असताना रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने साथ दिल्याने भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता …

Read More »

अलिबागेत सायक्लोथॉनचे आयोजन

अलिबाग ः प्रतिनिधीमाझी वसुंधरा उपक्रमांतर्गत अलिबाग येथे शुक्रवारी (दि. 19) सकाळी 6 वाजता सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लब ऑफ अलिबाग व अलिबाग नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

बीसीसीआयच्या नव्या फिटनेस टेस्टमध्ये सहा क्रिकेटपटू नापास

वर्ल्डकपमधून बाहेर होण्याचा धोका नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतासाठी खेळाडूंच्या दुखापती चिंतेचा मुद्दा ठरला. भारतीय चमूतील 10 खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याचे दिसले. प्रत्येकाच्या दुखापतीचे कारण वेगवेगळे असले तरी बीसीसीआयने याची गंभीर दखल घेत खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत सतर्कतेच्या दृष्टीने खेळाडूंची टाइम ट्रायल टेस्ट घेणार असल्याचे स्पष्ट …

Read More »

‘ज्यो रूट फलंदाजीतील सर्व विक्रम मोडेल’

लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट हा फिरकीचा यशस्वी सामना करणारा देशाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू असून, आतापर्यंत आमच्या फलंदाजांनी नोंदविलेले सर्व विक्रम तो मोडीत काढेल, असे भाकीत माजी कर्णधार नासिर हुसेन याने नुकतेच केले. रूटने चेन्नई कसोटीत भारताविरुद्ध पहिल्या डावात 218 धावांची दमदार खेळी केली. स्काय स्पोर्ट्ससाठी लिहिलेल्या स्तंभात नासिर …

Read More »

पहिल्या सामन्यात झालेल्या चुका सुधारू : कोहली

चेन्नई : वृत्तसंस्थाइंग्लंड संघाने चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 227 धावांनी पराभव करीत दौर्‍याला दणक्यात सुरुवात केली. पहिल्या सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्या सामन्यात झालेल्या चुका आम्ही सुधारू व पुढील सामन्यात आम्ही सर्वस्वी झोकून देऊन सर्वोत्तम कामगिरी करू, असे म्हटले आहे.विराट म्हणाला, आम्हाला पुनरागमन करता …

Read More »