चेन्नई : दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. न्यूझीलंडचा काइल जेमिसन व ऑस्ट्रेलियाचा झाय रिचर्डसन हे दोघे अनुक्रमे 15 कोटी आणि 14 कोटींना बंगळुरू आणि पंजाब संघात …
Read More »खारघर येथे उद्या सिडको मास्टर्स कप गोल्फ स्पर्धा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवानवी मुंबईतील सिडकोच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्स या गोल्फ मैदानावर 20 फेब्रुवारी रोजी सिडको मास्टर्स कप-2021 या गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध टेनिसपटू लिअॅण्डर पेस यांसह मुंबई आणि पुण्यातील बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब (बीपीसीजी), विलिंग्डन गोल्फ क्लब, ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट, पुना गोल्फ क्लब, युएस …
Read More »रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा
पाली : प्रतिनिधीरायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची कुमारी गटाची जिल्हा निवडचाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 24 फेब्रुवारी रोजी पेण तालुक्यातील मुंढाणी येथे होत आहे. जिल्ह्यातील नामवंत 16 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेतया स्पर्धेतून 5 ते 8 मार्च या कालावधीत जळगाव येथे होणार्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेणार्या जिल्ह्याच्या संघाची निवड …
Read More »नदाल, बार्टीचे आव्हान संपुष्टात
सिडनी : वृत्तसंस्थास्पेनच्या दुसर्या मानांकित राफेल नदालचे कारकीर्दीतील 21वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न स्टेफानोस त्सित्सिपास याने उधळून लावले. जेतेपदाचा दावेदार समजला जाणारा नदाल तसेच महिलांमध्ये अग्रमानांकित अॅश्ले बार्टी यांचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.सुरुवातीचे दोन सेट जिंकूनही खेळात सातत्य राखता न आल्याने नदालला पराभवाचे तोंड पाहावे …
Read More »राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड संघाची घोषणा
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत व जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी सिनिअर राज्यस्तरीय व सातवी सबज्युनिअर पुरुष व महिला तसेच मुले व मुली राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 19 ते 21 फेब्रुवारीदरम्यान जळगाव येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी रायगड संघाची घोषणा करण्यात …
Read More »किकबॉक्सिंग स्पर्धेत ‘यूएसकेए’ अजिंक्य
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड किकबॉक्सिंग असोसिएशन आणि पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल समाज मंदिर हॉल येथे मुंबई विभागीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेल, रायगड, नवी मुंबई, वसई, पालघर, मुंबई उपनगर आदी ठिकाणाहून 350 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे …
Read More »प्लेसिसची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
जोहान्सबर्ग : वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिका संघाचा दमदार फलंदाज फाफ डु प्लेसिस याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने हा निर्णय जाहीर केला. पाकिस्तान दौर्यावर आफ्रिकेच्या संघाला कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर प्लेसिसने निवृत्ती स्वीकारली आहे.फाफ डु प्लेसिसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आणि …
Read More »आयपीएल-14साठी गुरुवारी लिलाव
आठ फ्रँचायझी लावणार 292 खेळाडूंवर बोली चेन्नई : वृत्तसंस्थाइंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वासाठी होणार्या लिलावामध्ये (ऑक्शन) आठ फ्रँचायझी 292 खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल 2021च्या मिनी ऑक्शनसाठीच्या 61 रिक्त जागांसाठी 292 खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये 196.6 कोटी आहेत. चेन्नईत गुरुवारी (दि. 18) हे ऑक्शन होणार आहे.आयपीएल 2021 मिनी …
Read More »चेन्नईतील पराभवाची चेन्नईतच परतफेड!
टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय चेन्नई : वृत्तसंस्था येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. पदार्पणवीर अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या भेदक मार्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. 482 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ 164 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय संघाने दुसरा …
Read More »झुंजार त्रिशतकी विजयासह जोकोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत
सिडनी : वृत्तसंस्थाजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पोटाच्या दुखापतीसह खेळताना ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील 300वा विजय साकारला आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सेरेना विल्यम्स यांनीही आगेकूच केली, मात्र डॉमिनिक थीमला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.जोकोव्हिचने स्वित्झर्लंडच्या 14व्या मानांकित मिलोस राओनिकला 7-6 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper