Breaking News

क्रीडा

भारताच्या प्रत्येक खेळाडूविरुद्ध खास रणनीती -जोफ्रा आर्चर

चेन्नई : वृत्तसंस्था आगामी कसोटी मालिकेसाठी आम्ही पूर्ण तयारी केली असून, भारताच्या प्रत्येक खेळाडूविरुद्ध आम्ही खास रणनीती आखली आहे, असे मत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने व्यक्त केले. भारतीय संघातील कोणत्या खेळाडूपासून इंग्लंडला सर्वाधिक धोका आहे, असे विचारले असता आर्चर म्हणाला, ‘भारताच्या संघातील सर्वच खेळाडू एकापेक्षा एक सरस आहेत. ऑस्ट्रेलियाने …

Read More »

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा; फायनलसाठी तीन संघांत चुरस

दुबई : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानी असलेल्या न्यूझीलंडला झाला आणि त्यांना थेट फायनलचे तिकीट मिळाले, पण न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्थानासाठी भारत, …

Read More »

शुभम चवरकरला उत्कृष्ट मल्लखांबपटू पुरस्कार

रेवदंडा : प्रतिनिधीसाळावमधील शिव मर्दानी आखाड्याचा मल्लखांबपटू शुभम किशोर चवरकर याला छावा प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट मल्लखांबपटू पुरस्काराने यथोचित सन्मानित करण्यात आले आहे.वस्ताद अमित गडांकुश संस्थापक-अध्यक्ष असलेल्या छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच छावा प्रतिष्ठानच्या वतीने साळाव येथील शुभम चवरकर याची रायगडमधील उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू 2021 या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात …

Read More »

तामिळनाडूचे दुसरे विजेतेपद

बडोदा : वृत्तसंस्थादिनेश कार्तिकच्या नेतृत्वातील तामिळनाडू संघाने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या जेतेपदावर दुसर्‍यांदा नाव कोरले आहे. डावखुरा फिरकीपटू एम. सिद्धार्धच्या (4/20) प्रभावी गोलंदाजीला फलंदाजांचे योगदान लाभल्याने तामिळनाडूने अंतिम फेरीत बडोद्याचा सात गडी आणि 12 चेंडू राखून पराभव केला.तामिळनाडूने यंदा 13 वर्षांनंतर प्रथमच अजिंक्यपद मिळवले. सिद्धार्थच्या फिरकीपुढे भंबेरी उडाल्याने …

Read More »

टोकियो ऑलिम्पिक होणारच जपानच्या पंतप्रधानांचा दावा

टोकियो : वृत्तसंस्था जपानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत अनिश्चितता वाढू लागली आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत ऑलिम्पिक होणारच, असा दावा जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी केला आहे. जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत दूरचित्रसंवादाद्वारे ते बोलत होते. ‘भविष्यातील विषाणू संसर्गाची तयारी करण्यासाठी आम्हाला धडा मिळाला आहे. गेल्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा …

Read More »

इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी ठरू शकतात धोकादायक!

चेन्नई : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीमध्ये 2-1ने कसोटी मालिकेत हरविणार्‍या टीम इंडियापुढे आता इंग्लंडचे आव्हान आहे. इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. 2020मध्ये कोरोनामुळे फार क्रिकेट खेळले गेले नाही, पण इंग्लंडच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी …

Read More »

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी; भारताचे पारडे जड

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. चेन्नईत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 9 पैकी 5 कसोटीत विजय मिळवला आहे. या दोन्ही संघांतील अखेरच्या लढतीत भारताने 75 धावांनी विजय मिळवला होता. तेव्हा करुण नायरने 303, तर केएल राहुलने 199 धावा केल्या होत्या. या मैदानावर …

Read More »

मालिकेत एकतर्फी लढती होणार नाहीत

जोफ्रा आर्चरचा टीम इंडियाला इशारा चेन्नई ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. या मालिकेमधील पहिला सामना 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर याने यंदा चांगले पिच असेल. या पिचचा इंग्लंडच्या बॉलर्सना फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली …

Read More »

पुजाराकडून रोहित आणि गिलची प्रशंसा

मुंबई ः प्रतिनिधीभारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळविलेल्या ऐतिहासिक विजयात चेतेश्वर पुजाराचे मोठे योगदान आहे. रोहित व गिलने आक्रमक खेळ करीत टीम इंडियाला विजयाचा मार्ग दाखवला. हे दोघेही आक्रमक खेळाडू आहेत. मला त्यांची मदत होते. जोडीदार आक्रमक खेळत असेल तर मला माझा नैसर्गिक खेळ करता येतो, असे पुजाराने स्पष्ट केले. पुजाराने एका मुलाखतीमध्ये …

Read More »

टीम इंडियासाठी गुड न्यूज

कोरोना चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह; कुटुंबाचाही लाभणार सहवास नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या तडाख्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ घरच्या मैदानावर क्रिकेट मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरूद्ध 5 फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. तत्पूर्वीच टीम इंडियासाठी दोन चांगल्या बातम्या आल्या आहेत. तीनपैकी पहिल्या कोरोना चाचणीत सर्व भारतीय खेळाडू निगेटिव्ह आले असून …

Read More »