Breaking News

Ankit Shah

इंधन बचतीसाठी अलिबागकरांचे वॉकेथॉन

निरोगी आरोग्य, पर्यावरण हानी यासंदर्भात अलिबागमध्ये भव्य जनजागृती रॅली अलिबाग : प्रतिनिधी : आपले आरोग्य निरोगी राहावे, पर्यावरण हानी थांबावी आणि इंधन बचत व्हावी यासाठी पायी चाला इंधन वाचवा असा संदेश देत आरोग्य पर्यावरण आणि इंधन वाचवण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी रविवारी (दि. 2) अलिबाग येथे रॅली आयोजीत करण्यात आली होती. ओएनजीसी …

Read More »

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त : पिल्ले एचओसी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व टेक्नोलॉजीच्या एनएसएस यूनिट व ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन रक्तदान  शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमास सरपंच हरिशचंद्र बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, चंद्रकांत ठोकल, मारुती माठळ, नीता महाडिक, उपासना गोठल, …

Read More »

स्वामीनारायण इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी करिअरसाठी अम्बिशन डे

मोहोपाडा : प्रतिनिधी : कोणते करिअर निवडायचे किंवा त्यात पुढे कसा निभाव लागेल, असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांना भेडसावत असतात. आपल्याला पुढे नेमके काय करायचे आहे, आपले ध्येय काय आहे व त्यानुसार कोणते करिअर निवडणे योग्य ठरेल, हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते. यासाठीच चौक येथील श्री स्वामीनारायण …

Read More »

रोजगार मेळावा उत्साहात

उरण : वार्ताहर : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पनवेल, रायगड, अलिबाग, आयटीआय उरण व ऑलकार्गो कौशल्य प्रशिक्षण संस्था, (बोकडवीरा) उरण यांच्या संयुक्त विद्यमाने बोकडवीरा उरण येथे गुरुवारी (दि. 30) जेएनपीटी, सिडको ऑलकार्गो कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात  आला होता. या मेळाव्यात 12 …

Read More »

आरोग्य शिबिराचा 120 आदिवासींनी घेतला लाभ

पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल येथील पाले बुद्रुक गावा नजिक असलेल्या फणसवाडी येथील आदिवासी वाडीतील लोकांसाठी सिटिझन्स यूनिटी फोरम (कफ) पनवेल या सामाजिक संस्थेने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये ब्लड शुगर व ईसीजी अशा तपासण्या ठेवण्यात आल्या होत्या. शिबिराचे उद्घाटन पनवेलचे परिक्षेत्र वन अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे …

Read More »

तळोजा एमआयडीसीत वायुगळती

वसाहतीत अमोनिया गळतीच्या अनेक घटना; ग्रामस्थांकडून माहिती पनवेल : वार्ताहर : तळोजा औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) फोरस्टार फ्रोजन फुड्स या कंपनीमध्ये शनिवारी (दि. 1) सायंकाळी अमोनियाचा तीव्र वास आल्यामुळे देवीचापाडा व ढोंगर्‍याचापाडा येथील ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आरडाओरडा करत गर्दी केली होती. तळोजा औद्योगिक वसाहतीतीत अमोनिया गळती झाल्याच्या अनेक घटना झालेल्या आहेत, …

Read More »

‘एल्फिन्स्टन’चे नामांतर काळाची गरज!

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाविद्यालयाला द्यावे! भारतावर इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्षे राज्य केले आणि हजारो वर्षांच्या आपल्या प्रथा, परंपरा, संकेत यांचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न करून आपल्या अर्थातच ब्रिटिशांच्या पाऊलखुणा उमटविल्या. त्या इतक्या घट्ट बसल्या आहेत की त्या खरवडून खरवडूनसुद्धा जाता जात नाहीत. ब्रिटिशांनी आपल्याला बर्‍याच देणग्या देऊन ठेवल्या आहेत …

Read More »

जीवन गाणे गातच राहावे…

नवीन वर्ष सुरू होऊन पहिला महिना सरलासुद्धा. नववर्षासाठी केलेले अनेकांचे संकल्प कधी विरून गेले ते त्यांनाही कळले नसेल. गमतीचा भाग सोडा, पण मानवी जीवन इतके वेगवान आणि व्यस्त झाले आहे की दैनंदिन धावपळीत स्वत:सह इतरांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. याच धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कळत-नकळत माणूसपण कुठेतरी हरवत चालले आहे. आजच्या …

Read More »

मूकबधिर टेबल टेनिसपटू कार्तिकची गरूडझेप!

पनवेल : रामप्रहर वृत्त : नवीन पनवेल येथील मूकबधिर असलेला टेबल टेनिसपटू कार्तिक पचेत्ती याने कोल्हापूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद मूकबधिर टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले असून, चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.  टेबल टेनिस या खेळात चपळाईबरोबर एकाग्रतेला खूप महत्त्व असते. त्याचबरोबर आवश्यक …

Read More »

कबड्डीत शहापूर संघ विजेता

श्रीगाव : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे गावदेवी क्रीडा मंडळाच्या वतीने आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रौढ गटाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकतीच रंगली. या स्पर्धेत शहापूरच्या म्हसोबा संघाने बाजी मारली. स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक श्री विठ्ठल कोपरपाडा, तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे श्री …

Read More »