Breaking News

Ankit Shah

सिडकोमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा

पाणी फाऊंडेशनला अडीच लाखाची देणगी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त  : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या कार्यामागच्या प्रेरणेचे मूळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दास्यमुक्तीच्या विचारांमध्येच आहे, असे प्रतिपादन पाणी फाऊंडेशनचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले. सिडको भवन, बेलापूर येथे 28 मे 2019 रोजी सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन व सिडको …

Read More »

उरण बस स्थानक झालेय समस्यांचे माहेरघर

उरण : वार्ताहर  : उरण बस स्थानक हे मुंबई विभागात मोडत असून प्रवाशांना भेडसावणार्‍या अनेक समस्या येथे आहेत. त्याकडे आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे, अशी प्रवाशांची तक्रार आहे. उरण बसस्थानक म्हणजे समस्यांचे माहेरघर आहे, असे प्रवाशांकडून बोलले जात आहे. उरण बस डेपोत उरण तालुक्यातील प्रवाशांची जा-ये सुरू असते. डेपोमध्ये कॅन्टिन …

Read More »

सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारीपदी निसार तांबोळी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त  : भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी निसार तांबोळी यांनी दिनांक 27 मे, 2019 रोजी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. सध्याचे प्रभारी मुख्य दक्षता अधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून त्यांना मुख्य दक्षता आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात आला. निसार तांबोळी हे सन 2005च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय पोलीस …

Read More »

सिडको गृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांसाठी अंतिम मुदत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त  : सिडको महागृहनिर्माण योजना 2018 व 2019 मध्ये यशस्वी झालेल्या ज्या अर्जदारांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अशा यशस्वी अर्जदारांना सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सिडको महामंडळातर्फे दिनांक 31 मे 2019 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. अद्यापपर्यंत सदर गृहनिर्माण योजनांतील 953 यशस्वी अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली …

Read More »

उल्हास नदीचे पाणी आणखी दूषित करण्याचा प्रयत्न

गाड्या धुण्यासाठी वाहत्या पाण्यात कर्जत : बातमीदार : टाटा पॉवर हाऊसमधून सोडण्यात येणारे पाणी उल्हास नदीतून  कल्याणच्या खाडीपर्यत वाहत जाते, ते पिण्यासाठी राखीव असल्याने या नदीच्या पाण्यावर काही शहरे आणि शेकडो गावांची तहान भागविली जाते. मात्र या नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले असून, जलपर्णी पाठोपाठ आता या नदी पात्रात गाड्या घुतल्या …

Read More »

कुरूळ ग्रामपंचायत राबविणार कन्या सन्मान योजना

अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील कुरूळ ग्रामपंचायतीमध्ये जन्माला येणार्‍या मुलींसाठी कुरूळ कन्या सन्मान योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच अ‍ॅड. जर्नादन पाटील यांनी मंगळवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत दिली. कुरूळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत 20 वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबातील महिलेस  जर पहिले अपत्य कन्या असेल तर त्या मुलीच्या नावे ग्रामपंचायत …

Read More »

नेरळमध्ये श्रीरंग बारणे यांना मताधिक्य

खासदारांनी केला महायुतीच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार कर्जत : बातमीदार : खासदार श्रीरंग बारणे यांना नेरळ गावातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. विजयानंतर महायुतीचे नेरळमधील पदाधिकारी खासदार बारणे यांचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, खासदार बारणे यांनी या पदाधिकार्‍यांचा सत्कार केला. मावळ लोकसभा निवडणुकीचा कर्जत विधानसभा मतदारसंघातील निकाल हा अपेक्षितपणे लागला आहे. नेरळमधील मतदारांनी …

Read More »

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करा -आ. प्रवीण दरेकर

महाड तालुक्यातील अधिकार्‍यांची आढाव बैठक महाड : प्रतिनिधी : टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर किंवा बोअरवेल या सर्व तात्पुरत्या उपाययोजना असून, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करणे गरजेच्या आहे. संबंधीत अधिकार्‍यांनी छोटे -मोठे बंधारे, विहिरी आणि तलाव बांधण्याचे प्रस्ताव तात्काळ तयार करावेत, अशा सूचना आमदार प्रवीण देरेकर यांनी सोमवारी येथे …

Read More »

व्यापक समुपदेशनाची गरज

वैद्यकीय महाविद्यालयांतील रॅगिंगची गंभीर समस्या डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणाने चर्चेत आली आहे. मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षणाचा उत्तम दर्जा व तेथे मिळणारा बहुमूल्य अनुभव यामुळे या महाविद्यालयांना वैद्यकीय विद्यार्थी आत्यंतिक प्राधान्य देतात. त्यांच्या करिअरमधील दीर्घकालीन यशाच्या दृष्टीने हे सारेच महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्यांचा कल सारे निमूट सहन करण्याकडेच असतो. मुंबईतील नायर …

Read More »

पावसाळ्यापूर्वी विहिरींची स्वच्छता व्हावी -दर्शना भोईर

पनवेल : रामप्रहर वृत्त  : पावसाळा तोंडावर आला असून, त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील विहिरींची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये अनेक विहिरी असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. त्यामुळे या विहिरींचे वापर होत नाही. …

Read More »