Breaking News

Ankit Shah

भीमरूपी महारूद्रा

पवनसुत हनुमंताचे नाव घेताक्षणी रामभक्तांच्या अंगावर भक्तिभावाने रोमांच उभे राहतात तर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या अंगावर काटा उभा राहतो असे चित्र आता महाराष्ट्रात दिसू लागले आहे. हनुमान चालिसा या स्तोत्राची इतकी नावड शिवसेनेमध्ये कशी उत्पन्न झाली हे आता रहस्य उरलेले नाही. ज्या पक्षांसोबत शिवसेना सत्तेमध्ये खुर्चीला खुर्ची लावून बसली आहे, …

Read More »

पेण एसटी आगारात 100 टक्के उपस्थिती

ग्रामीण भागातही सेवा होणार सुरू पेण : प्रतिनिधी न्यायालय आणि राज्य सरकारने कर्मचार्‍यांना  कामावर हजर होण्याचे निर्देश दिल्यानंतर एसटीच्या रायगड विभागातील आठ आगारांमधील जवळपास सर्व गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. विविध …

Read More »

रोहा तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा

लाभार्थी 13 गावांना टँकरने पाणीपुरवठा 15 टँकरद्वारे भागवली जातेय तहान शासनदरबारी मात्र तालुका पाणीटंचाईमुक्त रोहे : महादेव सरसंबे तालुक्यातील कुंडलिका नदीतीरावरील 26 गावांसाठी एमआयडीसीकडून 26 गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील 13 गावांना सध्या पाणी मिळत नसल्याने तेथे एमआयडीसीकडून टँकरने पाणीपुरवठा केले जात आहे, मात्र पंचायत समितीकडे …

Read More »

अधिकार्‍यांना पाजले गढूळ अन् खारे पाणी

पेण प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनकर्त्या महिला आक्रमक पाली, पेण : प्रतिनिधी शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशन व खारेपाट विभागाच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 21) पेण तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी संतप्त आंदोलकांनी उपस्थित अधिकार्‍यांना गढूळ व खारे पाणी पाजले. पेण विभागात भरपूर पाऊस …

Read More »

उरण आगारातील 90 टक्के बससेवा पूर्ववत

181 कर्मचारी पुन्हा कामावर हजर उरण ः वार्ताहर मुंबई विभागाच्या उरण आगारात संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे पुनरागमन झाले आहे. आगारातील 193 कर्मचार्‍यांपैकी जवळजवळ 181 कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. त्यामूळे 90 टक्क्यांहून अधिक बससेवा सुरू झाली असल्याची माहिती उरण आगाराचे व्यवस्थापक सतीश मालचे यांनी दिली आहे. ऑक्टोबर 2021पासून राज्यातील एसटी …

Read More »

पनवेलमध्ये संजय गांधी निराधार योजना समिती गठीत

एकूण 53 प्रकरणे मंजूर पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी 24 मार्च 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार पनवेल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 20) तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संजय …

Read More »

पनवेल प्रभाग 18मधील पाडा मोहल्ल्यात नालेसफाई

नगरसेवक विक्रांत पाटील यांची कार्यतत्परता पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिका प्रभाग 18मधील पाडा मोहल्ल्यात नाले आणि गटारांची दूरवस्था झाली होती. याबाबत नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे नागरिकांनी तक्रार करताच त्यांनी तातडीने या भागातील नालेसफाई करून घेतली. पाडा मोहल्ल्यात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत होते. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेवक …

Read More »

‘सीकेटी’च्या एनसीसी विभागातर्फे शहिदांना नमन

पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय कॅडेट्स कोप्स (एनसीसी)च्या शहिदांना शतश: नमन कार्यक्रमांतर्गत 8 महाराष्ट्र गर्लस बटालियन मुंबई गट व सीकेटीच्या एनससीसी विभागातर्फे शहीद नाईक हनुमंत कदम यांचे भाऊ श्रीकांत कदम यांना कृतज्ञता फलक प्रदान केले. कर्नल एम. एल. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली स्मृतिचिन्ह आणण्यात आले. शहीद नाईक हनुमंत कदम यांना 17 …

Read More »

भाजप खोपटे गाव अध्यक्षपदी नवनाथ ठाकूर

उरण ः बातमीदार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तथा खोपटे गावचे सुपुत्र नवनाथ नारायण ठाकूर यांची खोपटे गाव अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नवनाथ ठाकूर यांना दिले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी यांनी नवनाथ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. …

Read More »

अनधिकृत फुलविके्रत्यांवर तातडीने कारवाई करावी

नगरसेविका रूचिता लोंढे यांची मागणी पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीतील जुने भाजी मार्केट विभागातील कृष्णाळे तलाव व त्यासमोरील गाडी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या फुलविक्रेत्यांनी आपले बस्तान बसविले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका रूचिता …

Read More »