Breaking News

Ramprahar News Team

खोपोलीत टोईंग यंत्रणा पुन्हा सुरू

खोपोली ़: प्रतिनिधी मागील दोन महिन्यांपासून खोपोलीतील टोईंग यंत्रणा बंद होती.त्याबाबतचे वृत्त दै. ‘रामप्रहर‘ मध्ये प्रसिध्द होताच सोमवार (दि. 10) पासून ही टोईंग यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.  खोपोली बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी नियमबाह्य वाहने पार्किंग करण्यावर नियंत्रण ठेवणे व कारवाई करण्यासाठी खोपोली नगरपालिका व पोलीस ठाणे यांच्या संयुक्तपणातून …

Read More »

तोफगाडा दुर्गार्पणामुळे कोथळीगडाला पुनर्वैभव ; सह्याद्री प्रतिष्ठानच्या सोहळ्याला सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांची उपस्थिती

कर्जत : बातमीदार छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात विशेष महत्व असलेल्या कर्जत तालुक्यातील कोथळीगडावर सापडलेल्या तोफांचे पुनरुज्जीवन करून त्या रविवारी (दि. 9) लाकडी गाड्यावर बसविण्यात आल्या. सह्याद्री प्रतिष्ठानने राबविलेला हा उपक्रम येणार्‍या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार असून तोफगाडा दुर्गार्पणामुळे कोथळीगडाला पुनर्वैभव प्राप्त झाले, असे प्रतिपादन मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलचे सुयश ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सुयश संपादित केले असून, सिडको अध्यक्ष, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  दहावीचा मार्च …

Read More »

भारतीय जनता पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ब्रिजेश पटेल यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, दिलीप जाधव, विपुल चौटालिया, कुणाल संगाणी, राजकुमार चौधरी, अशोक जांगिड, नवनीत मारू, गुरुनाथ म्हात्रे, सुदीपकर, विनोद ठाकूर, संतोष …

Read More »

सिडकोच्या रेल्वेस्थानक संकुलातील कार्यालयांची ई-लिलाव पद्धतीने विक्री

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महामंडळाच्या गृहनिर्माण योजना, तसेच वाणिज्यिक व रेल्वेस्थानक संकुलांतील दुकानांची आणि कार्यालयांची विक्री ई-लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला सिडको संचालक मंडळाने डिसेंबर 2018 मध्ये मान्यता दिली आहे. सिडकोतर्फे दुकाने वा कार्यालयांच्या विक्रीकरिता यापूर्वी पारंपरिक मानवीय निविदा पद्धतीचा वापर करण्यात येत होता. सदर विक्री …

Read More »

छत्रपती शिवाजी विद्यालयाचा एसएससीचा निकाल 93.12 टक्के

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजच्या दहावी परीक्षेचा निकाल 93.13 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक शिवानी शरद काबुगडे (92.20), द्वितीय क्रमांक विशाखा राजेंद्र सुर्वे (91.80) व तृतीय क्रमांक ऋतुजा शरद कर्णे (89.40) या विद्यार्थिनींनी पटकावला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा …

Read More »

खांदा वसाहतीतील विविध प्रश्न मार्गी लागणार -सीता पाटील

पनवेल : प्रतिनिधी खांदा वसाहतीत विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत. या संदर्भात सोमवारी नगरसेविका सीता पाटील यांनी कार्यकारी अभियंता व्ही. एल. कांबळे यांची भेट घेतली. त्यानुसार मान्सूनपूर्व साफसफाई, रस्त्यासह इतर कामे त्वरित करण्याची मागणी केली. त्यानुसार कार्यवाही करण्याची ग्वाही देण्यात आली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदभार स्वीकारल्यापासून …

Read More »

प्रभाग क्रमांक 1मध्ये महास्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये सोमवारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते योग ग्राऊंडचे भूमिपूजन

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त पतंजली योगपीठ ट्रस्ट, हरिद्वार यांच्याद्वारे खांदेश्वर स्टेशनसमोरील मैदानावर योग ग्राऊंडच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. 9) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा झाला. यावेळी पंतजली योग ट्रस्ट कामोठेचे अध्यक्ष आर. पी. यादव यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार …

Read More »

उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा ; सरकारच्या सूचनेनंतरच पेरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

नाशिक ः प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्रात वादळी वार्‍यासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनेनंतरच शेतकर्‍यांनी पेरण्या करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 8 जून रोजी केरळात मान्सूनचे आगमन …

Read More »