Breaking News

Ramprahar News Team

रायगडातील जनताच तटकरेंना नेस्तनाबूत करेल -ना. अनंत गीते

अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर मी काय कामे केली याचा जाब विचारण्याचा अधिकार सुनील तटकरे यांना नाही. माझी कामे रायगडातील जनतेला माहीत आहेत. तटकरेंनी काय केले हेदेखील जनता ओळखून आहे. त्यामुळे येत्या 23 एप्रिल रोजी जनता मी केलेल्या कामांची पोचपावती देईल आणि तटकरेंना या निवडणुकीत पराभूत करून राजकीय पटलावरून नेस्तनाबूत करेल, …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये

कळंबोली : सबका साथ सबका विकास या ध्येयाने कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचा ओघ सातत्याने वाढत असून, कळंबोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 21) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील …

Read More »

साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंका हादरली; 207 लोक ठार

कोलंबो : जगभरात रविवारी (दि. 21) ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेची राजधानी कोलंबोत चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये सुमारे 207 जणांचा मृत्यू; तर 450हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी आणि मृतांमध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश अधिक असून, त्यातील 35 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी …

Read More »

…तर ती पाकिस्तानसाठी ‘काळरात्र’ असती : मोदी

पाटन (गुजरात) : वृत्तसंस्था पाकिस्तानने जर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सोपवले नसते, तर ती काळरात्र ठरली असती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गुजरातमधील पाटन येथे रविवारी (दि. 21) झालेल्या सभेत ते बोलत होते. या विधानानंतर सभेतील लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणांनी सभास्थान दणाणून सोडले. या वेळी पंतप्रधान मोदींनी …

Read More »

नेतृत्वबदल राजस्थानच्या पथ्यावर; मुंबईवर मात

जयपूर : वृत्तसंस्था कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि रियान पराग यांनी केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर पाच गडी राखून मात केली आहे. मुंबईने दिलेले 162 धावांचे आव्हान राजस्थानने सहज पूर्ण केले. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे या सामन्यातही लवकर माघारी परतला. संजू सॅमसनने काही सुरेख फटके …

Read More »

डी कॉक-यादव जोडीने मोडला रायुडू-धोनीचा विक्रम

मुंबई : प्रतिनिधी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला. दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना अंबाती रायुडू व महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. डी कॉक आणि यादव यांनी दुसर्‍या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. यासोबत आयपीएलच्या बाराव्या हंगामात जयपूरच्या सवाई …

Read More »

दिल्लीचा पंजाबवर विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिखर धवन (56) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (58*) यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला पाच गडी राखून पराभूत केले. पंजाबने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामना अटीतटीचा झाला, पण अखेर दोन चेंडू शिल्लक ठेवून दिल्लीने पंजाबला मात दिली. 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग …

Read More »

मेडिकल स्टोर चोरट्यांनी फोडले

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रसमोरील वेंकटेश मेडिकल स्टोरचे मुख्य शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. येथील अरुण मालपाणी यांच्या वेंकटेश मेडिकल स्टोअरच्या बंद दुकानाचे मुख्य शटर सहा अज्ञात चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील रोख रक्कम पहाटेच्या सुमारास …

Read More »

न्यायालयीन बेलीफास शिवीगाळ करून धक्काबुक्की, गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार अटक वॉरंटबाबतची नोटीस देण्यासाठी गेलेल्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पनवेल येथील प्रोसेस अमलदाराला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुरूशरणजित सिंग याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गणू पाटील (वय 46 वर्षे) हे गुरूशरणजित सिंग यांना त्यांच्या जवळ असलेल्या नोटीस व अटक …

Read More »

विद्यार्थ्यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहास भेट

ठाणे : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दि. 19 एप्रिल 2019 रोजी विद्यार्थ्यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृह या भारतातील एका जुन्या कारागृहास भेट दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर अधिकारी होता. त्याने अनेक …

Read More »