Breaking News

Ramprahar News Team

महाडच्या काळीज-खरवली ग्रामपंचायतीत सरपंच आघाडीचा, तर बहुमत शिंदे गटाचे

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील महत्त्वाच्या काळीज खरवली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंचपदी  काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, तर सदस्य पदाच्या 13 पैकी 10 जाग जिंकून बाळासाहेबांची शिवसेनेने बहुमत मिळविले. महाड तालुक्यातील श्रीमंत आणि शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या काळीज खरवली या ग्रामपंचायत निवडनुकीचा निकाल सोमवारी (दि. 17) जाहीर करण्यात …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात शांततेत मतदान; आज मतमोजणी

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 16) तुरळक घटना वगळता मतदान प्रकिया शांततेत पार पडली. थेट सरपंचपदाच्या 16, तर सदस्यांच्या 184 जागांसाठी मतदान झाले. सोमवारी (दि. 17) मतमोजणी होणार आहे. मतदानास सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरुवात झाली. सकाळी मतदारांचा उत्साह फारसा नव्हता. 11नंतर मतदान केंद्रावर गर्दी दिसू …

Read More »

पनवेलमध्ये ‘आयएनएस विक्रांत’ची प्रतिकृती

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांची गर्दी पनवेल ः प्रतिनिधी, वार्ताहर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशात प्रथमच घरोघरी तिरंगा झेंडा फडकला. त्यामुळे या वर्षीची दिवाळीदेखील विशेष असून नागरिकांच्या मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवण्यासाठी पनवेल शहरात ओरियन मॉलमध्ये भारतीय नौदलातील युद्धनौका आयएनएस विक्रांतची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष …

Read More »

आरोग्य महाशिबिराचा 10,500हून अधिक जणांना लाभ

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सहकारी सातत्याने समाजसेवा करताहेत -ना. रवींद्र चव्हाण पनवेल ः हरेश साठे प्रथा आणि परंपरेने सर्व समाजाची सातत्याने निस्वार्थीपणे सेवा करण्याचे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, त्यांचे सहकारी आणि पक्ष करीत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व …

Read More »

पनवेलमध्ये किल्ले स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन

संस्कृतीचे महत्त्व वाढावे यासाठी आयोजन -परेश ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेच्या …

Read More »

खेरणे ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात भाजपची आघाडी

शेकापच्या भूलथापांना जनता कंटाळली -शैलेश माळी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात येत्या रविवारी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी होणार्‍या एकमेव खेरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून यात भाजपने मुसंडी मारली आहे. 25 वर्षांपासून भोळ्याभाबड्या ग्रामस्थांची फसवणूक करणार्‍या शेकापची सत्ता उलथवून टाकण्याचा ग्रामस्थांनीही निर्धार केल्याचे पहावयास मिळत आहे, असे भाजपचे …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत साथ द्या -आमदार महेश बालदी

खालापूर ः प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघात 2019ची निवडणूक लढवत असताना उरणला पनवेलसह खालापूर तालुकाही जोडला गेला. त्यामध्ये चौक आणि रसायनी-मोहोपाडा हा परिसर अनोळखी असतानाही या विभागात प्रचंड बहुमत मिळाले. याची परतफेड या परिसरातील सर्वसमावेशक विकासकामातून करणार आहे. यासाठी येथील मतदारांनी चारही ग्रामपंचायतींची सत्ता भाजप आघाडीला द्यावी, अशा शब्दांत विकासाचे व्हीजन …

Read More »

माजी आमदार अवधूत तटकरे भाजपमध्ये उद्धव सेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’

मुंबई ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील माजी आमदार अवधूत तटकरे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 14) मुंबईत हा पक्षप्रवेश झाला. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि माजी …

Read More »

खांदा कॉलनीत रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 16) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. …

Read More »

उद्धव गटाचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईरांना धक्का

पदाधिकारी शिंदे गटात दाखल पनवेल ः वार्ताहर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आम्ही हलणार नाही. उरण विधानसभा मतदारसंघातील एकही पदाधिकारी कुठे गेला नाही आणि जाणार नाही, अशी वलग्ना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी पक्षप्रमुखांसमक्ष केली, मात्र काही तासांतच त्यांना धक्का बसला आहे. उलवे शहर प्रमुख मनोज घरत यांच्यासह महिला शहर प्रमुख, शाखा प्रमुख …

Read More »