कर्जत : बातमीदार शासनाच्या आधारभूत भात खरेदी केंद्रावर हमी भावाने भात देण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करताना शेतकर्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी. हमी भावाने भाताची खरेदी मार्च 2022 पर्यंत करण्याचे सरकाराचे निर्देश आहेत त्यालादेखील मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कर्जत तालुक्यातील शेतकर्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना …
Read More »कोरोनासंबंधी दिशानिर्देश
वैश्विक महामारी कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन देशात पोहचलेला असून आपले हातपाय पसरत आहे. ही संख्या सुरुवातीला नगण्य होती, पण हळूहळू आकडा वाढतोय. कोरोनाचा पूर्वानुभव पाहता केंद्र सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळेच केंद्राने राज्यांना नव्याने दिशानिर्देश देऊन अलर्ट केलेले आहे. वर्ष संपायला आले आणि कोरोनारूपी संकट पुन्हा एकदा आपला …
Read More »अक्षरबंध हायकू संग्रहाचे प्रकाशन
पेण : रामप्रहर वृत्त येथील साहित्यिक वैभव धनावडे यांच्या अक्षरबंध हायकू संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ गीतकार अरुण म्हात्रे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, कवी पत्रकार दुर्गेश सोनार यांच्या हस्ते 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे झाले. या वेळी कवी श्रीकांत पेटकर, रवींद्र सोनावणे, वैभव चौगुले, सीमा पाटील, संगीता …
Read More »कर्जतमधील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमधील सदस्यपदाच्या 15 जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. यामधील चार ग्रामपंचायतीच्या जागा बिनविरोध झाल्या. दोन ग्रामपंचायतीच्या जागेसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल झाली नाहीत. तीन ग्रामपंचायतींमधील चारपैकी तीन जागांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले होते, त्यांची मतमोजणी बुधवारी (दि. 22) झाली. त्यात माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत (प्रभाग 4) …
Read More »नियमांचा भंग करणार्या व्यक्तीवर कारवाई करणार -विक्रम देशमुख
कर्जत : प्रतिनिधी ख्रिसमस, नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नियमांचा भंग करणार्या व्यक्तीवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सूचित केले आहे.कोरोना अजून पूर्णतः संपलेला नाही. ओमायक्रॉनमुळे चिंतेत वाढ झाली आहे, अशा वेळी विनाकारण नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्तीविरोधात प्रशासकीय कारवाई केली जाईल. कर्जत तालुक्यात …
Read More »वर्तमानपत्राचा कागद खाद्यपदार्थ ठेवण्यास वापरू नका; अन्न व औषध प्रशासन विभागाचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी वर्तमानपत्राचा वापर खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी करण्यात येऊ नये. अशा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शि. स. देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 5 ऑगस्ट 2011पासून लागू करण्यात आला. या कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेला सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न …
Read More »कोपर येथे स्वयंम सहायता समूहांची बैठक उत्साहात
गव्हाण : रामप्रहर वृत्त स्वयंम सहायता समूहांची बैठक बुधवारी (दि. 22) कोपर येथे झाली. यामध्ये गव्हाण, कोपर, शिवाजीनगर येथील 25 स्वयंम सहायता समूह सहभागी झाले होते. या वेळी बचत गटांकडून फिरता निधी 15 हजार रुपये मिळविण्यासाठी फॉर्म भरून घेतले आणि महिला स्वयंरोजगार करण्यासाठी महिलांना तयार करण्यात आले. या बैठकीत पंचायत …
Read More »विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीविरोधात अभाविप आक्रमक
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर स्वतःचे नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल करीत मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेतले. या निर्णयाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गेले दोन दिवस साखळी आंदोलन करीत आहे. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस येथे अभाविपने बुधवारी (दि. 22) शिक्षणातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध निदर्शने केली. …
Read More »रायगड जिल्ह्यात लसीकरणाला उत्तम प्रतिसाद; 93.41 टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोस
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 93.41 टक्के नागरिकांचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस पूर्ण झाला असून, 62.41 टक्के लाभार्थ्यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. जिल्ह्याचे 100 टक्के लसीकरण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. रायगड जिल्ह्यात 18 वर्षांवरील 21 लाख 92 हजार 500 लाभार्थी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत …
Read More »बार कौन्सिलचे अॅड. गजानन चव्हाण यांचा पनवेल वकील संघटनेतर्फे सत्कार
पनवेल : प्रतिनिधी बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन अॅड. गजानन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन अॅड. संग्राम देसाई यांनी सोमवारी (दि. 21) रोजी पनवेल कोर्टाला भेट दिली असता त्यांचा पनवेल वकील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन अॅड. गजानन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन अॅड. संग्राम देसाई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper